Thursday, 19 August 2021

आज रविवार रे, जोतिबाचा वार रे

श्री केदाराय नमः

आज रविवार रे ,जोतिबाचा वार रे 
जोतिबाचा चांगभला ,करा जयजयकार रे  ll

ब्रह्म विष्णु शिव अग्नी ,ज्योतिस्वरूप धारी रे
ज्योती स्वरूप धारी  l
उत्तरेचा केदारेश्वर ,आला रत्नागिरी रे 
आला रत्नागिरी  l 
चतुर्भुज राजा दयाधन, घोड्यावरती स्वारी रे 
घोड्यावरती स्वारी रे  l आज रविवार रे ........

त्रिशूल डमरु खड्ग हाती,असुरांसि संहारी रे 
असुरांसि संहारी  l 
अमृतपात्र घेऊनी आला ,भक्तांचा कैवारी रे 
भक्तांचा कैवारी  l 
सह्याद्रीवरी ऊभा राहिला ,पंचगंगेच्या तीरी रे 
पंचगंगेच्या तीरी रे  l

आज रविवार रे ,माझ्या देवाचा वार रे 
जोतिबाचा चांगभला ,करा जयजयकार रे  ll

Wednesday, 18 December 2019

*नवग्रह स्तोत्र*

🌹 *नवग्रह स्तोत्र* 🌹

सायंकाळी देवासमोर दिवा लावल्यावर रामरक्षा, गणेशस्तोत्र, मारूती स्तोत्र इ. अनेकांच्या घरामध्ये म्हटली जाते. त्याप्रमाणे नवग्रहस्तोत्र म्हटल्याने सर्व ग्रहांची कृपा प्राप्त होते. हे स्तोत्र अर्थासहित . 

*१) सूर्य :- जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् । तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ॥*

जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणारा दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.

*२) चंद्र :- दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव-संभवम् । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम् ॥*

दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणारा, क्षीरसागरांतून निर्माण झालेला, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणारा आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.

*३) मंगळ :- धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ॥*

धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.

*४) बुध:- प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम् । सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥*

अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.

*५) गुरू :- देवानांच ‍ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम् ।बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥*

देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.

*६) शुक्र :- हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परम् । सर्वशास्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥*

हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.

*७) शनी :- नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥*

निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.

*८) राहू :- अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् । सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥*

अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.

*९) केतु :- पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम् । रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ॥*

पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.

*इतिव्यासमुखोद्गीतं य: पठेत् सुसमाहित:। दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यति ॥*

-याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.

*नरनारि नृपाणांच भवेत् दु:स्वप्ननाशनम् । ऎश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् ॥*

– नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.

*ग्रहनक्षत्रजा: पीडास्तस्कराग्निसमुद्भवा:। ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासोब्रूते न संशय: ॥*

– ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.
अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.
नवग्रह स्तोत्र हे व्यास ऋषींनी रचलेले आहे. हे स्तोत्र म्हणजे नऊ ग्रहांचे नऊ मंत्रच आहेत. आपल्या आयुष्यावर नवग्रहांचा परिणाम होत असतो, असे ज्योतिषशास्त्र म्हणते. नवग्रहांचा आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा होऊन हे नवग्रह आपल्याला अनुकूल व्हावेत म्हणून या नवग्रह स्तोत्राचा एक पाठ रोज श्रद्धेने, भक्तिभावाने व मनापासून करावा. त्यामुळे आपली संकटे, अडचणी नाहीशा होतात व वाईट स्वप्नेही पडत नाहीत. उत्तम व निरोगी आयुष्याचा लाभ होतो. आपण धनवान व आयुष्यमान होतो.

मंत्र शास्त्रात उच्चाराला महत्व असल्याने अधिकारी, जाणत्या व्यक्तिकडून शुद्ध उच्चार शिकून घेऊन नंतर पाठ करावे. आता नवग्रहांचे नाम मंत्र, जपसंख्या, दानाच्या वस्तू सांगतो .

*सूर्य*

*मंत्र :-* सूर्यायनम: 
 *जपसंख्या :-* सात हजार.

*दाने*

*धातु-* सुवर्ण 
*उपधातु :-* तांम्र(तांबे)
*रत्न :-* माणिक
*धान्य :-* गहू 
*पशु :-* रक्तधेनु(लाल रंगाची गाय.
*रस :-* गुळ. 
*वस्त्र :-* केशरीरंगाचे वस्त्र 
*पुष्प :-* रक्तकमळ(लालकमळ)

*चंद्र*

*मंत्र :-* सोमायनम: 
*जपसंख्या :-* अकरा हजार.

*दाने :-* 

*धातु :-* सुवर्ण 
*उपधातु :-* रौप्य(चांदी)
*रत्न :-* मोती 
*धान्य :-* मूग
*पशु :-* श्वेतवृष(सफ़ेदरंगाचा रेडा)
*रस :-* तूप 
*वस्त्र :-* श्वेतवस्त्र 
*पुष्प :-* श्वेतपुष्प 

*मंगळ*

*मंत्र:-* अंगारकायनम:
*जपसंख्या :-* दहा हजार.
*दाने :-* धातु :- सुवर्ण 
*उपधातु :-* ताम्र(तांबे)
*रत्न :-* प्रवाळ
*धान्य :-*अख्खा मसुर 
*पशु :-* रक्तवृष(लालरंगाचा रेडा)
*रस :-* गूळ 
*वस्त्र :-* रक्तवस्त्र(लालरंगाचे वस्त्र) 
*पुष्प :-* रक्तकमळ(लालकमळ)

*बुध*

*मंत्र :-* बुधायनम: 
*जपसंख्या :-* चार हजार.

*दाने :-* 

*धातु :-* सुवर्ण 
*उपधातु :-* कांस्य(कासे)
*रत्न :-* पाचू
*धान्य :-* राजगिरा
*पशु :-* हत्ती 
*रस :-* तूप 
*वस्त्र :-* नीलवस्त्र(निळ्यारंगाचे वस्त्र 
*पुष्प:-* सर्वप्रकारची फ़ुले 

*गुरू*

*मंत्र :-* बृहस्पतयेनम: 
*जपसंख्या :-* एकोणीस हजार. 

*दाने*

 *धातु :-* सुवर्ण 
*उपधातु :-* कांस्य(कासे)
*रत्न:-* पुष्कराज 
*धान्य :-* हरबरा डाळ 
*पशु :-* अश्व (घोडा)
*रस :-* साखर 
*वस्त्र :-* पीतवस्त्र(पिवळ्यारंगाचे वस्त्र)
*पुष्प :-* पीतपुष्प , पिवळ्यारंगाचे फ़ूल. 

*शुक्र*

*मंत्र-* शुक्रायनम: 
*जपसंख्या :-* सोळाहजार. 

*दाने*

*धातु :-* सुवर्ण 
*उपधातु :-* रौप्य(चांदी)
*रत्न :-* हिरा 
*धान्य :-* तांदूळ 
*पशु :-* श्वेताश्व(सफ़ेदघोडा)
*रस :-* तूप 
*वस्त्र :-* चित्रवस्त्र(निरनिराळ्यारंगाचे)
*पुष्प -* श्वेतपुष्प(सफ़ेद)

*शनी*

 *मंत्र-* शनैश्चरायनम: 
*जपसंख्या :-* तेवीस हजार 

*दाने*

*धातु :-* सुवर्ण 
*उपधातु :-* लोखंड
*रत्न :-* नीलमणी 
*धान्य :-* काळे उडीद
*पशु :-* म्हैस 
*रस :-* तेल 
*वस्त्र :-* कृष्णवस्त्र(काळ्यारंगाचे) 
*पुष्प :-*  कृष्णपुष्प(काळ्या/जांभळ्या रंगाचे फ़ूल 

*राहू*

*मंत्र :-*  राहवेनम: 
*जपसंख्या :-* अठरा हजार 

*दाने*

*धातु :-* सुवर्ण 
*उपधातु :-* शिसे 
*रत्न:-* गोमेद 
*धान्य :-* काळे तीळ
*पशु :-* घोडा 
*रस :-* तेल 
*वस्त्र :-* नीलवस्त्र(निळ्यारंगाचे)
*पुष्प :-* कृष्णपुष्प(काळ्या/जांभळ्या रंगाचे फ़ूल 

*केतु :-*

 *मंत्र :-*  केतवेनम: 
*जपसंख्या :-*  सतरा हजार. 

*दाने :-* 

 *धातु :-*  सुवर्ण 
*उपधातु :-*  पोलाद 
*रत्न:-*  लसण्या
*धान्य :-*  कुळीथ (हुलगा)
*पशु :-*  बोकड 
*रस :-* तेल 
*वस्त्र :-* कृष्णवस्त्र(काळ्यारंगाचे)
*पुष्प :-* राखाडी/भुरा रंग

Thursday, 12 December 2019

दत्ताचा पाळणा


दत्ताचा पाळणा

जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥

कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।

सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥

प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।

हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥

पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।

पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥

षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।

कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥

Sunday, 10 November 2019

मंगलाष्टके

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखंमोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहंचिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदंविघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिःकुर्यात् सदा मङ्गलं || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुनागोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदीख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिताकुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजोरंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुंशंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनमकुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनीदेखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवराकवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरात्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणेकुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हेअंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधादेवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हराउच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदाकुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हांलाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्याव्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजाकृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिकाचंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशीसावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसेहर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितांदोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणेलक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

विश्वकर्मा आरती

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
सकल सृष्टि के करता,
रक्षक स्तुति धर्मा ॥

आदि सृष्टि मे विधि को,
श्रुति उपदेश दिया ।
जीव मात्र का जग मे,
ज्ञान विकास किया ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

ध्यान किया जब प्रभु का,
सकल सिद्धि आई ।
ऋषि अंगीरा तप से,
शांति नहीं पाई ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

रोग ग्रस्त राजा ने,
जब आश्रय लीना ।
संकट मोचन बनकर,
दूर दुःखा कीना ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

जब रथकार दंपति,
तुम्हारी टेर करी ।
सुनकर दीन प्रार्थना,
विपत हरी सगरी ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

एकानन चतुरानन,
पंचानन राजे।
त्रिभुज चतुर्भुज दशभुज,
सकल रूप साजे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

ध्यान धरे तब पद का,
सकल सिद्धि आवे ।
मन द्विविधा मिट जावे,
अटल शक्ति पावे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

श्री विश्वकर्मा की आरती,
जो कोई गावे ।
भजत गजानांद स्वामी,
सुख संपाति पावे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
सकल सृष्टि के करता,
रक्षक स्तुति धर्मा॥

Saturday, 9 November 2019

वर्तुळ

वर्तुळ –

  1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
  2. वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
  3. वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
  4. जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
  5. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
  6. वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
  7. वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
  8. वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
  9. अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
  10. अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
  11. वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
  12. वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   
  13. वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
  14. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
  15. अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
  16. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
  17. दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

चांग भल रे देवा चांगभल

चांग भलं र देवा चांग भलं र

जोतिबाच्या नावान चांग भलं र

हे...नाव तुझ मोठ देवा कीर्ती तुझी भारी...

डंका तुझा ऐकुनी गा आलो तुझ्या दारी...

किरपा करी.माझ्या वरी.हाकेला तू धाव र

चांग भलं...

जोतिबाच्या नावान...चांग भलं र

देवा चांग भलं र

जोतिबाच्या नावान

चांग भलं र

(1)----------

हे भल्या उंच डोंगरात देवा तुझा वास र...

मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खास र...

चांग भलं

चांग भलं...

हे...

आलो देवा घेऊन मनी भोळा भाव र

देवा कोड माझी हि मानुनिया घे

नाही मोठ मागण

नाही कुडी हाव र

बापा वाणी माया तू

लेकराला दे

डोई तुझ्या पायावर मुखी तुझ नाव र

चांग भलं ...जोतिबाच्या नावान...

चांग भलं र देवा चांग भलं र

जोतिबाच्या नवान

चांग भलं र .