नारायण नागबली हे विधान कोणी व का? करावी
नारायण बली व नागबली दोन्ही वेगळे आहेत. याचा उल्लेख स्कंदपुराण, गरूड , इत्यादी पुराणांतून येतो. गरूड पुराणात याचे विस्तृत विवरण दिले असून याचा जन्मकुंडलीशीही संबध जोडलेला आहे असा उल्लेख भृंगुसविता मध्ये असे संगितले की जातकाच्या कुंडलीत शापित योग असल्यास हा विधी करावा. व विधी कोणी करावा या विषयावर लिहीले आहे की या मध्ये
80 प्रकारचे दोष आहेत.
दोष पुढील प्रमाणे:-
निपुत्रिका चे धन,घर,शेती, जमीन, मालमत्ता, मिळाल्यास व फक्त कन्या संतान होत असल्यास व पुत्र संतान होत नसल्यास, विवाहास विलंब होत असल्यास, ज्याचा मृत्यू वेळेआधी अर्थात अपघाती , खून ,भ्रूणहत्या.अपमृत्यू (अकाली मृत्यू)
दुर्मरण (भाजून, अपघाताने, आत्महत्येने, बुडून, खितपत पडून, खून झाल्याने)
घरात भांडणे होणे,सुवासिनीला पीडा होणे (अन्न गोड न लागणे, खिन्नता येणे, भीती वाटणे, स्वप्नात साप दिसणे, स्वप्नात अघटित घडताना दिसणे, सतत अस्वस्थता असणे), सवतीचा त्रास होणे (यजमानाचे संसारातले लक्ष उडणे)
घरातून व्यक्ती पळून जाणे
(तरणीताठी मुलगी/मुलगा, म्हातारी व्यक्ती, प्रमुख व्यक्ती)
धंद्यात नुकसान होणे. कर्ज होणे, वसुलीसाठी माणसे घरी येणे.
कोर्ट कचेर्या मागे लागणे
नोकरी जाणे, प्रमोशन न मिळणे, कामात लक्ष न लागणे, कामाच्या ठिकाणी त्रास होणे.सततची आजारपणे घरात असणे,
लहान मुलांना त्रास होणे (झोपेत ओरडत उठणे, अभ्यासात लक्ष न लागणे)
वाममार्गाला लागणे (परदारा-परधन-परनिंदा)घरात सतत अशांति असणे.
लग्ने मोडणे, घटस्फोट होणे.
आत्महत्या , या प्रकाराने , तसेच दीर्घकाळ आजारपणाने , झाला असेल तर अशा लोकांच्या वासना अंतरीक्षात फिरतात ज्या त्या व्यक्तीच्या मुलांना , भावांना स्वकीयांना त्रास देतात . यांच्या मुक्तीसाठी हा विधी करावा असे सांगतात या विधीस नारायण बली असे म्हटले जाते .
तसेच सर्पास मारल्याचा दोष हरण व्हावा या करीता नागबली करावा असे लिहीले आहे .
विधान:-
नारायणबली या विधीत सर्व प्रथम गंगास्नान , भस्मस्नान ,मृत्तीकास्नान व पुन्हा गंगास्नान केले जाते . येथे पितृमुक्तीसाठी हे करीत आहे हा संकल्प केला जातो . नंतर ओल्या सफेद नूतन वस्त्राने शिवालयात दर्शन घेऊन मग पुन्हा पाणी घेऊन जेथे हा विधी करावयाचा आहे तेथे जातात .
येथे ब्रह्मा , विष्णू , महेश ,यम व प्रेत यांच्या प्रतिमा असतात या अनुक्रमे सोने , चांदी , तांबे , लोह , व शिसे यांच्या असतात . तसेच एक कणकेचा पुतळा बनवलेला असतो जो अपघातात गेलेल्या व्यक्तीचे प्रतीक असतो . या सर्वांचे पूजन व हवन होते . नंतर तो पुतळा व्यवस्थित समंत्रक दहन केला जातो . नंतर दशक्रियादी विधी होतात . नंतर दहन केलेल्या पुतळ्याची राख सावडून ती गंगेत सोडली जाते .
नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा स्नान करून पहिल्या दिवशी जेथे कार्य झाले तेथेच जाऊन नागबली केला जातो . यात ब्रह्मा , विष्णू , महेश, काल व सर्प यांच्या प्रतिमा असतात . यांचेही पूजनादी होऊन अष्ट पिंडदान करतात . सर्पाची कणकेची प्रतिमा दहनादी प्रकार वरीलप्रमाणेच होतात .
तीसऱ्या दिवशी सुस्नात होऊन गुरूजींच्या घरी पुण्याहवाचनादी नवग्रहादी जन्मनक्षत्रादी शांतीकर्म केले जाते . नंतर ब्राह्मण भोजनादी कृत्य केले जाते . या दोन दिवसात कर्त्यास सुतक असते . हा विधी कोणासही करता येतो . आई वडिल असणाऱ्यासही हा विधी करता येतो . या विधीस सगळे नातेवाईकच हवे वगैरे समज आहेत जे खोटे आहे एकटा कर्ता व्यक्तीही चालतो .
हा विधी कुठे करावा याबद्दल लिहीतात की जेथे तुळशीची वने आहेत वा अश्वत्थवृक्ष , पंचमहानदी(गंगा, यमुना,सरस्वती,गोदावरी,नर्मदा, याचा उगम स्थानी) शिवालय संगम , समूद्र किनारा , तिर्थक्षेत्र , या ठिकाणी चालते .
हा विधी त्र्यंबकेश्वरला का करावे (या विषयावर कुठे प्रणाम नाहीत पण श्रीगुरु चरित्र मध्ये अ.13 श्रीगुरू महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितले)
श्रीगुरू आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य फार मोठे आहे. पुराणांत ते विस्ताराने सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक." असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदामाहात्म्य सांगू लागले.
"भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्याकाळी गौतमऋषीसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत असत.एकदा त्या सर्वांनी विचार केला.भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल. तयमुले सर्व लोकांचे कल्याण होईल; पण ती गंगा कोण आणू शकेल ? हे कार्य मोठे कठीण आहे. गौतमऋषी भगवान शंकरांचे परमभक्त आहेत. महातपस्वी आहेत.त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे. पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत." असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवत्स गाय मिर्माण केली व ती गौतम ऋषींच्या भातशेतीत सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषींच्या योगबलाने तय काडीचे शस्त्र झाले. त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप, ते गौतामांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, "तुम्ही गंगानदीला पृथ्वीवर आणा.तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणा नाही." गौतमऋषींनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर 'हवा असेल तो वर माग' असे म्हणाले.तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, "भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पाप क्षालनासाठी या त्र्यंबकक्षेत्री प्रकट कर." शंकरांनी 'तथास्तु' असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबकक्षेत्री अवतीर्ण केली.गौतामांच्या तपश्चर्येने ती अवतीर्ण झाली म्हणून तिला गौतमी असे म्हणतात.गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो असे या नदीचे थोर माहात्म्य आहे. या नंतर गौतमऋशीनी त्र्यंबकेश्वर ला गौ हत्या परिहार्थ येथे नारायण नाग बालि केली होती.
या वरून असे वाटते की श्री गौतमऋषी ने सर्व प्रथम ही विधी येथे केली असावी
या सोबत आता नाशिक , गोकर्णमहाबळेश्वर , काशी , प्रयाग , व नरसोबाची वाडी येथे करता येतो . जर गुरजी उपलब्ध असतील व वरील पैकी एखादे ठिकाण करवी . फक्त गुरूजी जाणकार हवे.
मुहूर्त:- हे विधानसाठी पुनर्वसु/पुष्य/अश्लेषा/मघा या नक्षत्रात करावा तीन दिवसाचे विधी आहे जीवनात एकदा तरी करावी.
नोट:- हा विधी वक्तीगत (सेपरेट) करवा सार्वजनिक (कॉमन) करू नयेत व कालसर्प ही शांति आपल्या घरातच करावी या विषयावर पुढील लेखात माहिती देतो.
नमो श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज
ज्योतिष आकाश नारायणराव पुराणि