Wednesday, 31 October 2018

स्वभाव आणि आजार संबंध

स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे ?

     तर आता आपण जाणून घेऊ की मनाचा,भावनेचा,विचारांचा,स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो......

१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.

२).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.

३)अतिराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.

४)अति ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.

५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.

६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात.

७) आपलं तेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता होते.

८) दु:ख दाृबुन ठेवल्याने फुफुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.

९)अधिरता,अतिआवेश,घाईगडबड अशा सवईमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.

१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.

११) प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.

१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.

१३) हासत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.

तर मग आता आपल्या  रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण   करण्याचा प्रयत्न करा. हासत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल.

🌹🌹From the root of Homoeopathy🌹🌹🌹🌹🌹🌹

Monday, 29 October 2018

देवी कवच

🕉 देवि उपासना 🕉
          ■देवीकवच■

मागच्या भागात आपण देवी कवचाचे नऊ(९) मंत्र व त्याचा भावार्थ पाहिला.हे कवच धारण करून आपण सामान्य माणसे कौटुंबिक, संसारीक समस्यांनी युक्त असणाऱ्या युद्धात उतरणार आहोत हे लक्षात घ्यावे. दुर्गासप्तशतीच्या अनेक बाबी क्रमाक्रमाने आपण समग्र जाणून घेणार आहोत.बहुतांश तज्ञमंडळीनी आता या आपल्या पाठाला.पाठिंबा दिला आहे असे दिसून येते.हळूहळू त्यांचा विरोध मावळत आहे हे पाहून आनंद वाटला.
आता आपण देवीकवचाचे पुढील मंत्र व त्याचा मराठी भावार्थ पहाणार आहोत.------

माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना । लक्ष्मीःपद्मासना देवी पदमहस्ता हरिप्रिया।।१०।।


वृषभावर (बैलांवर) आरूढ झालेली माहेश्वरी, मोरावर बसलेली कौमारी देवी, कमळावर बसलेली लक्ष्मीदेवी हातात कमलपुष्प घेऊन भक्तरक्षणासाठी  सदैव तत्पर आहेत.

श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषभ वाहना । ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता ।।११।।

हिमकणांप्रमाणे स्वच्छ व तेजस्वी असलेली माहेश्वरी देवी
बैलावर आरूढ झालेली आहे तिने शुभ्रवस्त्रे परिधान केली आहेत. ब्राह्मी  देवी  सर्वालंकार रत्नसाजांनी युक्त हंसावर बसलेली दिसत आहे.

इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः ।
नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः ।।१२।।

या सर्व नवदुर्गा या आपणा  सर्वांसाठी सर्वानुकूल सिद्धी व सुयोगांनी समृद्ध असून सर्वालंकार व दिव्य अशा नाना रत्नसाजांनी सुशोभित
सालंकृततेने शालीन व ममतेने परिपूर्ण दिसत आहेत.

दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः ।
शङ्खं चक्र गदां शक्तिं हलं च मुसलायुधम् ।।१३।

परमदिव्य अशा बांधणीच्या रथावर त्या आरूढ झालेल्या दिसत असून दैत्याविरुद्ध
संग्रामात उतरण्यासाठी त्यांच्या मुखावर क्रोध, त्वेष, चीड व आवेश  या भावना एकत्रित होऊन त्यांनी आपापल्या हातात,शंख चक्र,गदा, शक्ती,हल,(नांगर),मुसळ इत्यादी अनेक प्रकारची आयुधे धारण केलेली आहेत.

खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च । कुन्तायुधं त्रिशूलं च शारंगमायुधमुत्तमम् ।।१४। ।

याचबरोबरीने ढाल, तोमर परशु (फरशी) फास, त्रिशूळ, कुन्त आणि शारंग धनुष्य हातात घेऊन त्या रणांगणात सज्ज झालेल्या आहेत.

दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च ।
धारयन्त्यायुधानित्थं
देवानां च हिताय वै ।।१५।।

दैत्यांचा नाश करून त्यांना देहदंड देऊन,त्यांचे समूळ उच्चाटन करून आपल्या भक्तांना निर्भय करण्यासाठी व देव देवतांच्या हिताचे रक्षणासाठी एक कल्याणकारी व्रत घेऊन ती दुर्गा शस्त्राने सज्ज झाली आहे.

नमस्तेअस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे ।
महाबले महोत्साहे
महाभयविनाशिनी ।।१६।।

हे देवी माते,या तुझ्या अतिशय रौद्र रूपाकडे पाहून महाप्रचंड अशा पराक्रमाकडे पाहून तसेच तुझा तो अपूर्व उत्साह पाहिल्यानंतर केवळ तूच आमच्या वर आलेल्या संकटाचा नाश करशील या ठाम विश्वासाने तुझ्या या सर्व रूपांना मी नमन करतो.

त्राहि माम् देवि दुष्प्रेक्ष्ये
शत्रुणां भयवर्धिनि ।
प्राच्यां रक्षतु मामैंद्री
अग्नेय्यामग्निदेवता ।।१७।।

माझ्या पूर्व दिशेकडून माझ्या वर चाल करून येणाऱ्या शत्रुला "ऐंद्री"देवि तसेच अग्नेय दिशेकडून येणाऱ्या  शत्रुंना भयंकारी बनून या युध्दात ,व माझ्या कौटुंबिक संकटात माझे रक्षण करोत.

दक्षिणे$वतु वाराही
नैऋत्या खड्गधारिणी।
प्रतीच्यां वारुणी रक्षेद्
वायव्या मृगवाहिनी ।।१८।।

आमच्या दक्षिण दीशेकडून येणाऱ्या संकटसमयी"वाराही" देवी.नैऋत्येस खड्गधारिणीदेवी पश्चिमेला वारूणीदेवी,तर वायव्य दीशेस मृगवाहिनीदेवी आमचा सांभाळ करोत.

उदिंच्या पातु कौमारी
ऐशान्यां शूलधारिणी।
ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेद्धस्ताद् वैष्णवी तथा ।।१९।।

उत्तर दिशेकडून येणाऱ्या संकटात कौमारीदेवी ईशान्य दिशेकडून शूलधारिणीदेवी, आकाश दिशेकडून ब्रह्माणीदेवी,तर भूमी दिशेकडून वैष्णवीदेवी आमचे रक्षण करोत.

एवं दश दिशो रक्षेच्चामुंडा शववाहना ।
जया मे चाग्रतः पातु
विजया पातु पृष्ठतः ।।२०।।

याप्रमाणे दाही दिशांना प्रेतावर आरूढ झालेली चामुण्डा आम्हा सर्वांचे रक्षण करो. जयादेवी ही समोरील बाजूस तसेच विजयादेवी ही  पाठीच्या बाजूस आमचे रक्षण करो.

अजिता वामपाश्र्वे तु दक्षिणे चापराजिता ।
शिखामुद्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता ।।२१।।

डाव्या बाजूस अजिता देवी, दक्षिणबाजूस अपराजिता देवी,ब्रह्मरंध्री भागाचे शिखेचे उद्योतिनी देवी व उमादेवी आमच्या मस्तकाचे रक्षण करो.

मालाधरी ललाटे च भ्रुवौ रक्षेद् यशस्विनी ।
त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके ।।२२॥

ललाट भागाचे मालाधरी देवी, भुवयांचे यशस्विनीदेवी तर भुवया मधील भृकुटींचे त्रिनेत्रादेवी  आणि नाकाचे यमघण्टादेवी रक्षण करो.

शंखिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी ।
कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शांकरी ।।२३।।

दोन्ही डोळ्यामधील भूमध्यस्थानाचे रक्षण  शंखिनीदेवी, दोन्ही कानांचे द्वारवासिनीदेवी  कपाळाचे कालिकादेवी, तर कानांच्या मूळ भागाचे रक्षण शांकरीदेवी  करो.

नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका ।
अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती ।।२४।।

दोन्ही नाकपुड्यांचे रक्षण  सुगंधादेवी, वरच्या ओठाचे चर्चिकादेवी अधर भागाचे अमृतकलादेवी, तर जिभेचे रक्षण सरस्वतीदेवी करो.

दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका ।
घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके ।।२५।।

बत्तीस दातांचे रक्षण कौमारीदेवी, कंठप्रदेशाचे रक्षण चंडिका देवी,
गळयाच्या घटीचे रक्षण चित्रघंटादेवी ,तर टाळूचे रक्षण महामायादेवी करोत.

कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं मे सर्वमङ्गला ।
ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी ।।२६ ।।

हनुवटीच्या भागाचे कामाक्षीदेवी,वाचास्थानाचे सर्वमंगला देवी,मानेचे भद्रकाली देवी तर पाठीच्या मणक्याच्या भागाचे म्हणजे मेरुदंडाचे रक्षण धनुर्धारी देवी करो.

             ★क्रमशः★

        ■ शिवाजी व्यास ■
      संपर्क 9975706922

Sunday, 28 October 2018

ऊसाच्या मुलांची लग्न

*ऊसाच्या मुलांची लग्न*
*कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान आहे वाचा सर्वानी एकदा*

ऊसाला झाली दोन दोन पोरं,
मोठा मुलगा *'गुळ'* अन्
धाकटी मुलगी *'साखर'*.

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,
गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर.

साखर तशी स्वभावाला गोड,
तिच्यात उणेपणा शोधणं अवघड.

गुळ मात्र स्वभावाला चिकट,
समोर दिसला की ईतरांना वाटे संकट.

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई,
गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही.

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,
गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता 'ओबडधोबड'.

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,
बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले.

तीला झाला एक मुलगा
दिसायला होता तो गोरागोरा,
यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले *'शिरा'.*

ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची,
त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ?

ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग,
सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग.

बर्‍याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना,
काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना.

ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप,
त्याने प्रयत्न केले खुप,
अन् ऊसाला आला हुरुप.

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,
जी दिसायला होती बेत्ताची.

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,
होते ऊसाच्या तोलामोलाचे,
ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे.

अंगाने ती होती लठ्ठ नी जाडजुड,
रुपाला साजेसे, नांंव होते तीचे *'भरड.*

गव्हाला मुलीच्या रुपाची होती कल्पना,
तो कशाला करतो नसत्या वल्गना ?

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,
लग्न जमले अन् सारे तयारीला लागले.

किचन ओटा झाला,
लग्नासाठी बुक,
स्वयंपाकघर पण सजविले खुप.

'भरड' ला तूप कढईत घेउन गेले,
तेथेच् तीचे खरपुस मेक-अप पण केले.

भरपुर लाजली 'भरड', अन् झाली गुलाबी,
गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली 'शराबी'.

लग्नाची तयारी पहायला आलेले दुध सुद्धा कढईत शिरले,
अन् हळुच् त्याने गुळाला कढईत पाचारीले.

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश.

मनाने दगड असलेल्या भावनाशुन्य गुळाला,
'भरडी'चे रुप पाहुन, वेळ नाही लागला पाघळायला.

काजु बदाम किसमीच्या पडल्या अक्षता,
कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता.

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,
थाटामाटात बारसे झाले,
नांव ठेवले *लापशी*

आवडली ना 😁

Saturday, 27 October 2018

नवरात्रीची आरती

*🌺 नवरात्रीची आरती*🌺
--------------------------------------

*अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो*
*प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो*
*मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो*
*ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो  || १ ||*

*उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो*
*उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||*

*द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो*
*सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो*
*कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो*
*उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||*

*तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो*
*मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो*
*कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो*
*अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||*

*चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो*
*उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो*
*पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो*
*भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||*

*पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो*
*अर्ध पाद्य​ पूजेने तुजला भवानी स्तवती हो*
*रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो*
*आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||*

*षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो*
*घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो*
*कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो*
*जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||*

*सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो*
*तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हों*
*जाईजुई शेवंती पूजा रेखियली ,बरवी हों*
*भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||*

*अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो*
*सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो*
*मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो*
*स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||*

*नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो*
*सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो*
*षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो*
*आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||*

*दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो*
*सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो*
*शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो*
*विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||*
========================

Friday, 26 October 2018

हनुमान चालीसा मे छिपे मैनेजमेंट के सूत्र

हनुमान चालीसा में छिपे मैनेजमेंट के सूत्र...

कई लोगों की दिनचर्या हनुमान चालीसा पढ़ने से शुरू होती है। पर क्या आप जानते हैं कि श्री *हनुमान चालीसा* में 40 चौपाइयां हैं, ये उस क्रम में लिखी गई हैं जो एक आम आदमी की जिंदगी का क्रम होता है।

माना जाता है तुलसीदास ने चालीसा की रचना मानस से
पूर्व किया था
हनुमान को गुरु बनाकर उन्होंने राम को पाने की शुरुआत की।

अगर आप सिर्फ हनुमान चालीसा पढ़ रहे हैं तो यह आपको भीतरी शक्ति तो दे रही है लेकिन अगर आप इसके अर्थ में छिपे जिंदगी  के सूत्र समझ लें तो आपको जीवन के हर क्षेत्र में सफलता दिला सकते हैं।

हनुमान चालीसा सनातन परंपरा में लिखी गई पहली चालीसा है शेष सभी चालीसाएं इसके बाद ही लिखी गई।

हनुमान चालीसा की शुरुआत से अंत तक सफलता के कई सूत्र हैं। आइए जानते हैं हनुमान चालीसा से आप अपने जीवन में क्या-क्या बदलाव ला सकते हैं….

*शुरुआत गुरु से…*

हनुमान चालीसा की शुरुआत *गुरु* से हुई है…

श्रीगुरु चरन सरोज रज,
निज मनु मुकुरु सुधारि।

*अर्थ* - अपने गुरु के चरणों की धूल से अपने मन के दर्पण को साफ करता हूं।

गुरु का महत्व चालीसा की पहले दोहे की पहली लाइन में लिखा गया है। जीवन में गुरु नहीं है तो आपको कोई आगे नहीं बढ़ा सकता। गुरु ही आपको सही रास्ता दिखा सकते हैं।

इसलिए तुलसीदास ने लिखा है कि गुरु के चरणों की धूल से मन के दर्पण को साफ करता हूं। आज के दौर में गुरु हमारा मेंटोर भी हो सकता है, बॉस भी। माता-पिता को पहला गुरु ही कहा गया है।

समझने वाली बात ये है कि गुरु यानी अपने से बड़ों का सम्मान करना जरूरी है। अगर तरक्की की राह पर आगे बढ़ना है तो विनम्रता के साथ बड़ों का सम्मान करें।

*ड्रेसअप का रखें ख्याल…*

चालीसा की चौपाई है

कंचन बरन बिराज सुबेसा,
कानन कुंडल कुंचित केसा।

*अर्थ* - आपके शरीर का रंग सोने की तरह चमकीला है, सुवेष यानी अच्छे वस्त्र पहने हैं, कानों में कुंडल हैं और बाल संवरे हुए हैं।

आज के दौर में आपकी तरक्की इस बात पर भी निर्भर करती है कि आप रहते और दिखते कैसे हैं। फर्स्ट इंप्रेशन अच्छा होना चाहिए।

अगर आप बहुत गुणवान भी हैं लेकिन अच्छे से नहीं रहते हैं तो ये बात आपके करियर को प्रभावित कर सकती है। इसलिए, रहन-सहन और ड्रेसअप हमेशा अच्छा रखें।

आगे पढ़ें - हनुमान चालीसा में छिपे मैनेजमेंट के सूत्र...

*सिर्फ डिग्री काम नहीं आती*

बिद्यावान गुनी अति चातुर,
राम काज करिबे को आतुर।

*अर्थ* - आप विद्यावान हैं, गुणों की खान हैं, चतुर भी हैं। राम के काम करने के लिए सदैव आतुर रहते हैं।

आज के दौर में एक अच्छी डिग्री होना बहुत जरूरी है। लेकिन चालीसा कहती है सिर्फ डिग्री होने से आप सफल नहीं होंगे। विद्या हासिल करने के साथ आपको अपने गुणों को भी बढ़ाना पड़ेगा, बुद्धि में चतुराई भी लानी होगी। हनुमान में तीनों गुण हैं, वे सूर्य के शिष्य हैं, गुणी भी हैं और चतुर भी।

*अच्छा लिसनर बनें*

प्रभु चरित सुनिबे को रसिया,
राम लखन सीता मन बसिया।

*अर्थ* -आप राम चरित यानी राम की कथा सुनने में रसिक है, राम, लक्ष्मण और सीता तीनों ही आपके मन में वास करते हैं।
जो आपकी प्रायोरिटी है, जो आपका काम है, उसे लेकर सिर्फ बोलने में नहीं, सुनने में भी आपको रस आना चाहिए।

अच्छा श्रोता होना बहुत जरूरी है। अगर आपके पास सुनने की कला नहीं है तो आप कभी अच्छे लीडर नहीं बन सकते।

*कहां, कैसे व्यवहार करना है ये ज्ञान जरूरी है*

सूक्ष्म रुप धरि सियहिं दिखावा, बिकट रुप धरि लंक जरावा।

*अर्थ* - आपने अशोक वाटिका में सीता को अपने छोटे रुप में दर्शन दिए। और लंका जलाते समय आपने बड़ा स्वरुप धारण किया।

कब, कहां, किस परिस्थिति में खुद का व्यवहार कैसा रखना है, ये कला हनुमानजी से सीखी जा सकती है।

सीता से जब अशोक वाटिका में मिले तो उनके सामने छोटे वानर के आकार में मिले, वहीं जब लंका जलाई तो पर्वताकार रुप धर लिया।

अक्सर लोग ये ही तय नहीं कर पाते हैं कि उन्हें कब किसके सामने कैसा दिखना है।

*अच्छे सलाहकार बनें*

तुम्हरो मंत्र बिभीसन माना, लंकेस्वर भए सब जग जाना।

*अर्थ* - विभीषण ने आपकी सलाह मानी, वे लंका के राजा बने ये सारी दुनिया जानती है।

हनुमान सीता की खोज में लंका गए तो वहां विभीषण से मिले। विभीषण को राम भक्त के रुप में देख कर उन्हें राम से मिलने की सलाह दे दी।

विभीषण ने भी उस सलाह को माना और रावण के मरने के बाद वे राम द्वारा लंका के राजा बनाए गए। किसको, कहां, क्या सलाह देनी चाहिए, इसकी समझ बहुत आवश्यक है। सही समय पर सही इंसान को दी गई सलाह सिर्फ उसका ही फायदा नहीं करती, आपको भी कहीं ना कहीं फायदा पहुंचाती है।

*आत्मविश्वास की कमी ना हो*

प्रभु मुद्रिका मेलि मुख माही, जलधि लांघि गए अचरज नाहीं।

*अर्थ* - राम नाम की अंगुठी अपने मुख में रखकर आपने समुद्र को लांघ लिया, इसमें कोई अचरज नहीं है।

अगर आपमें खुद पर और अपने परमात्मा पर पूरा भरोसा है तो आप कोई भी मुश्किल से मुश्किल टॉस्क को आसानी से पूरा कर सकते हैं।

आज के युवाओं में एक कमी ये भी है कि उनका भरोसा बहुत टूट जाता है। आत्मविश्वास की कमी भी बहुत है। प्रतिस्पर्धा के दौर में आत्मविश्वास की कमी होना खतरनाक है। अपनेआप पर पूरा भरोसा रखे

       🙏 जय श्री राम 🙏

Wednesday, 24 October 2018

किस दिन कर्ज लेना शुभ अशुभ है

कर्ज लेते या देते समय ध्यान रखे ज्योतिष के ये नियम

सोमवार
साेमवार को कर्ज लेने या देने का शुभ वार माना गया है, क्योंकि इस दिन की अधिष्ठात्री देवी मां पार्वती है और संबंधित ग्रह चंद्रमा है।

मंगलवार
मंगलवार को कर्ज लेना बिल्कुल भी शुभ नहीं होता है, बल्कि इस दिन यदि कोई पुराना कर्ज हो तो उसे चुकाना शुभ होता है।

बुधवार
इस दिन पर बुध ग्रह का प्रभाव है जिसे की नपुंसक माना गया है इसलिए बुधवार को कर्ज लेना व देना शुभ नहीं होता है।

गुरुवार
इस वार को लघु संज्ञक शुभ वार माना गया है। गुरुवार को कर्ज देना नहीं चाहिए मगर इस दिन कर्ज लेना लाभदायक हो सकता है, क्योंकि मान्यता है कि इस दिन लिया गया कर्ज जल्दी चुक जाता है।

शुक्रवार
शुक्रवार पर शुक्र का प्रभाव होता है इसलिए ये एक सौम्य संज्ञक वार है यही कारण है कि इस दिन कर्ज लेना और देना दोनों शुभ माना गया है।

शनिवार
शनिवार के दिन किए काम लंबे समय तक स्थिर रहते हैं इसलिए इस दिन लिया या दिया गया कर्ज लंबे समय में चुकता है। यही कारण है कि कर्ज लेने व देने के लिए ये दिन शुभ नहीं है।

रविवार
ये वार सूर्य से प्रभावित है इसलिए इसे क्रूर संज्ञक माना गया है। इस दिन कर्ज लेना और देना दोनों शुभ नहीं होता है।

Tuesday, 23 October 2018

पहिली माझी ओवी ग गणेशाला वंदीन

ओवी…

पहिली माझी ओवी ग
श्री गणेशाला वंदिन
शुभकार्या द्यावी वृद्धी
बाप्पा गणाला नमन…

दुसरी माझी ओवी ग
विनायकाच्या पायाशी
भाव भक्तीत रंगूनी
पुर्ण तल्लीन होईन…
कृपा करा कृपा करा , गणपती बाप्पा कृपा करा…

तिसरी माझी ओवी ग
नव संकल्प सांधीन  
गीत नवे जगण्याचे
ताला सूरात बांधीन…

चवथी माझी ओवी ग
प्रपंच तो विसरेन
साऱ्यांचे मंगल होण्या
सर्व प्रयत्न करीन…
कृपा करा कृपा करा , गणपती बाप्पा कृपा करा…

पाचवी माझी ओवी ग
सत्कर्म हाती घेईन
सुविचारांच्या सन्मार्गी
प्रत्येकास मी लाविन…

सहावी माझी ओवी ग
प्रेम जगाला वाटीन
ज्ञानाच्या अमृताने मी
माणुसकी जगविन…
कृपा करा कृपा करा , गणपती बाप्पा कृपा करा…

सातवी माझी ओवी ग
उपदेशाचे संस्कार
सावरण्या जीवनाला
मिळेल त्यांचा आधार…

आठवी माझी ओवी ग
कुणी घडावा श्रेष्ठसा
भक्तीमध्ये दंग व्हावा
जगी ठरावा ज्येष्ठसा…
कृपा करा कृपा करा , गणपती बाप्पा कृपा करा…

नववी माझी ओवी ग
अभय देण्या स्त्रियांना
क्रूरतेने माखलेल्या
मारायला दानवांना…

दहावी माझी ओवी ग
स्वप्नपूर्ती साठी प्यारी
विघ्नहर्त्या गणेशाची
लिहिली आरती न्यारी…
कृपा करा कृपा करा , गणपती बाप्पा कृपा करा…

- निलेश संगिता अनंत उजाळ.
            {७०४५३९८५६१}
             दापोली/पिसई.

Saturday, 20 October 2018

मुखाने हो म्हणा तुम्ही स्वामी समर्थ

ll श्री  स्वामी  समर्थ  ll
नाचू गाऊ आनंदे स्वामी समर्थ ।
नाम त्यांचे घेता मनी होय हर्ष ॥ धृ ॥

घटका जाती पळे जाती वेळ जातो व्यर्थ ।
मुखाने हो म्हणा तुम्ही स्वामी समर्थ ॥ १ ॥

राम नाम घेता वाल्या झाला सार्थ ।
'स्वामी' नामे भरा तुम्ही जीवनात अर्थ ॥ २ ॥

नाम किती सोपे अक्षरे ती दोन ।
जाणूनिया घ्या रे तुम्ही त्याचे सामर्थ्य ॥ ३ ॥

स्वामी लिला असती अगम्य अतर्क्य ।
चाखा तुम्ही तयातील सुक्ष्म मधूअर्क ॥ ४ ॥

गुरुपदी लीन होणे हाचि एक धर्म ।
सदगुरुची सेवा हेचि निष्काम कर्म ॥ ५ ॥

   🏵 ll  श्री  स्वामी  समर्थ  ll 🏵