Sunday, 24 February 2019

चांगभलं र चांगभल देवा जोतिबा चांगभलं

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ....... 
  भैरवनाथाच्या नावानं चांगभलं .......
  चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं....
  माया ममता गुलाल उधळू, भावभक्तीची फुलं रं .....
  चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं ॥धृ॥

  तुझ्या नामाचा रं डंका, बारा ज्योतिर्लिंगा मधी रं .....
  तुझ्या चरणाचं तीर्थ,माय पंचगंगा नदी रं.....
  दर्शन घ्याया तुझं गं या या .....
  मन हे येडं खुळं रं ....
  चांगभलं रं चांगभल
  चांगभलं रं चांगभलं, देवा भैरवनाथा चांगभलं ॥१॥

  ह्या दक्षिण काशीला रं, राजा राहिला डोंगरी रं.....
  घाट जरी  वळणाचा,  चढू मोक्षाची पायरी रं ....
  भगवंताच्या देवपणाला, हात आमुचा जुळं रं ...
  चांगभलं रं चांगभल
    चांगभलं रं चांगभलं, देवा केदारा चांगभलं ॥२॥

  बारा गावाचं भगतं, तुझी वाहती पालखी रं......
  नऊ खंडाचा तू स्वामी, सा-या जगाची मालकी रं.....
  जत्र मंदी पुण्याईची, सासण काठी डुलं रं .....
  चांगभलं रं चांगभल
  चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं  ॥३॥

Monday, 18 February 2019

दिगंबरा दिगमबर श्रीपाद

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.....!
दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,

तुच माझा सवंगडी अन् तुच माझा सखा...
दत्तात्रेय  तुझ्याविना माझा नाही कोणी वारी,
तुच माझा पाठीराखा अन् तुच माझा कैवारी...

दत्तात्रेय तुझ्या चरणी झुकवितो माझे शिर,
तुच माझ्या जगण्याचे कारण अन् तुच धिर...

दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी मायबाप,
दत्तात्रेय माझी माय अन् दत्तात्रेय माझा बाप...

दत्तात्रेय तुझ्या दर्शनासाठी झुरले माझे प्राण,
देऊन दर्शन कर संतुष्ट माझे आतूर मनं...

दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,
तुच माझा सखा अन् तुच पाठीराखा...
दत्त तुच पाठीराखा...

Digambara Digambara Shripada Vallabha Digambara!

Digambara Digambara Narsinh Yativar Digambara!

Digambara Digambara Shri Gopal Guruvar Digambara!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा नरसिंह यतीवर दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा श्री गोपाल गुरुवर दिगंबरा!

शिवजयंती गीत

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
════════════════
*आपणास शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा...!*

_सूर्योदय झाला शिवनेरी वर_
_शिव सूर्याचा जन्म झाला_
_सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात_
_शिव वादळाचा जन्म झाला_
_पारतंत्र्याचा अस्त करण्या_
_शिव शक्तीचा जन्म झाला_
_धन्य झाली आई जिजाऊ_
_शिव पुत्र हा जन्मास आला_
_धन्य धन्य झाला महाराष्ट्र_
_शिव राज्याचा जन्म झाला_
_या मायभूमीचे रक्षण करण्या_
_शिवप्रभु जन्मास आला_
_जात पातीचे तोडन्या बंध_
_शिवरायांचा जन्म झाला_
_हिंदवी स्वराज्य घडविण्या_
*_शिव छत्रपतींचा जन्म झाला......_!!*

*शिवजयंतीच्या हार्दीक - हार्दीक शुभेच्छा .....!!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Wednesday, 13 February 2019

अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो

अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे  तुम्ही ,
स्वामी राया माझे हो,
पंढरपुरीत विठ्ठल तुम्ही,
दक्षिणेत बालाजी हो
कैलासावर तुम्हीच बसला,
सदगुरु स्वामी राया हो!!!
स्वामी समर्था तुम्हीच पाठी,
निर्भय असा मी झालो हो
संकटात उभा पुढे मी,
सावरले राया तुम्ही हो
चूक झाली माझी समर्था,
हात जोडतो तुम्हा हो
अनंत पाप गिळूनी माझे ,
माफ करा
स्वामी राया हो !!!
तेज डोळे बघती मजला ,
रुद्राक्ष हाती शोभते हो
कंबरेवर  हात  ठेवून ,
जणू विठ्ठल दारी उभा हो
पावन झाले अक्कलकोट ,
स्पर्श तुमचा झाला हो
नतमस्तक मी चरणी तुमच्या, 
सदगुरु स्वामी राया हो !!!
आज आलो दारी तुमचा,
पापमुक्त मी झालो हो
अशीच कृपा असू द्या राया
आपल्या या स्वामीभक्ता हो
बालक  तुमचा आई तुम्ही,
रडतो तुमचा चरणी हो
तूची एक स्वामी समर्था अगाद तुमची करणी हो !!!
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे  तुम्ही ,स्वामी राया माझे हो !!!

🌺!! श्री  स्वामी  समर्थ  !!🌺

Thursday, 7 February 2019

पांडुरंगाचा पाळणा

पांडुरंगाचा पाळणा (pahilya divashi palana)


पहिल्या दिवशी आनंद झाला । टाळ-मृदंगाचा गजर केला ॥


चंदन बुक्क्याचा सुवास त्याला । पंढरपुरात रहिवास केला ॥ जो. ॥१॥

दुसर्‍या दिवशी करुनी आरती । दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

वरती बसविला लक्ष्मीचा पती ॥ जो.॥२॥

तिसर्‍या दिवशी दत्ताची छाया । नव्हती खुलली बाळाची छाया ।

आरती ओवाळू जय प्रभूराया । जो. ॥३॥

चवथ्या दिवशी चंद्राची छाया । पृथ्वी रक्षण तव कराया ।

चंद्रसूर्याची बाळावर छाया ॥ जो.॥४॥

पाचव्या दिवशी पाचवा रंग । लावूनि मृदंग आणि सारंग ।

संत तुकाराम गाती अभंग ॥ जो.॥५॥

सहाव्या दिवशी सहावा विलास । बिलवर हंड्या महाली रहिवास ।

संत नाचती गल्लोगल्लीस ॥जो.॥६॥

सातव्या दिवशी सात बहीणी । एकमेकीचा हात धरुनी ।

विनंती करिती हात जोडूनी ॥जो.॥७॥

आठव्या दिवशी आठवा रंग । गोप गौळणी झाल्या त्या दंग ।

वाजवी मुरली उडविसी रंग ॥जो.॥८॥

नवव्या दिवशी घंटा वाजला । नवखंडातील लोक भेटीला ।

युगे अठ्ठवीस उभा राहिला ॥जो.॥९॥

दहाव्या दिवशी दहावीचा थाट । रंगित फरश्या टाकिल्या दाट ।

महाद्वारातून काढिली वाट ॥जो.॥१०॥

अकराव्या दिवशी आकार केला । सोन्याचा कळस शोभे शिखराला ।

रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला ॥जो.॥११॥

बाराव्या दिवशी बारावी केली । चंद्रभागेत शोभा ही आली ॥

नामदेव ते बसले पायारीला चोखोबा संत महाद्वाराला ॥जो.॥१२॥