Saturday, 29 June 2019

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

सुबह सबेरे लेकर तेरा नाम प्रभु


सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू

सुबह सवेरे  लेकर तेरा नाम प्रभु,
करते है हम शुरु आज का काम प्रभु,

शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाये हम,
विद्या का वरधान तुमि से पाए हम,
तुमि से है आगाज तुमि से अंजाम प्रभु,
करते है हम शुरु आज का काम प्रभु....

गुरों का सत्कार कभी न भूले हम,
इतना बने महान गगन को छु ले हम,
तुमि से है हर सुबह तुम्ही से शाम प्रभु.
करते है हम शुरु आज का काम प्रभु......

श्रेणी

विविध भजन

Thursday, 13 June 2019

जवस - गुड़घेदुखीवर उपाय

🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

🌿जवस🌿

🌿 *गुढगे दुखीवर रामबाण उपाय* 🌿

(एक अनुभव शेअर करत आहे....करून पाहण्यास काहीच हरकत नाही.)

            मित्रांनो माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होता.
त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरफटत चालायची .

पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक  गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या.

मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .

   त्यावर त्यांनी महिन्याला 1400/_ रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि सोबतच काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .

आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .

     एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना  माझ्या घरी आले , त्यानी आईला लंगडतांना पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला गुढगे दुखीचा त्रास आहे  व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला *जवस* खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
     जे गुढग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल *जवसामधून* आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे *जवस* आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला *जवस*  आणण्याचे आदेशच् दिले .
          मला माझ्या मूळ व्याध   वेळचा आयुर्वेदिक औषधीची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो *जवस* आणून दिले .
    आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे *जवस* खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि.....

विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला *जवस* खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी *मांडी घालून बसते* .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
          आता *जवस* खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस खाते.

आता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गुढगेही सहन होणार् नाही असे दुखतंही नाही व आँलोपँथिक गोळ्यांप्रमाणे काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .

   मी धन्यवाद देतो माझे मित्र अशोक शिंदे सर यांना खूप खूप थँक्स .....

   खूप वयस्कर लोकाना हा त्रास आहे कृपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा .

🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸