Saturday, 26 December 2015
सनातन- समीर गायकवाड़- पानसरे हत्येतील संशयित आरोपी
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'पानसरे एक धर्मद्रोही था. वो सनातन के खिलाफ था,' असे विखारी उद्गार गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी, सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याने मानसशास्त्रीय चाचणीवेळी काढले होते. पोलिसांनी आरोपपत्रात या फॉरेन्सिक सायकॉलॉजिकल असेसमेंटचा अहवाल जोडला आहे. पथकाने विचारलेल्या प्रश्नांना समीरने सावध आणि अस्वस्थपणे उत्तर दिल्याचा उल्लेख केला आहे.
मानसशास्त्रीय चाचणी घेणाऱ्या पथकाने समीरशी त्याची मैत्रिण ज्योती कांबळे, मानलेली बहीण अंजली झरकर व सनातनचा साधक समीर उर्फ सागर खामनकर यांच्याशी केलेल्या मोबाइलवरील संभाषणाबाबत हिंदीत प्रश्न विचारले होते. पानसरे यांच्याबद्दल जास्त माहिती नाही, असा दावा समीरने केला होता, पण पथकाने पानसरेंविषयी तुला काय माहिती आहे, असा प्रश्न केला असता 'कोल्हापुरात पानसरेंची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती, असे वृत्तपत्रात वाचले होते.' कोणत्या तारखेला बातमी वाचली, असा प्रश्न केला असता त्याने आठवत नसल्याचे सांगितले.
ज्योती कांबळेशी समीरने पानसरे व वागळे यांच्याबाबत संभाषण केले होते. याबाबत प्रश्न विचारला असता ज्योतीला टेंशन देण्यासाठी बोललो होतो. पानसरे यांना मी ओळखत नव्हतो. थोड्या वेळाने पुन्हा याबाबत प्रश्न विचारला असता, निखिल वागळे सनातन विरूध्द बोलत असत. म्हणून वागळे नाव घेतले. अंजली झरकरशी केलेल्या संवादातही पानसरे व वागळेंचे नाव घेतले होते, असा प्रश्न केला असता, त्याने मी मजेने बोललो होतो असा दावा केला. माझा कधीही पानसरे व वागळेंना मारण्याचा विचार नव्हता, असे त्याने म्हटले. पानसरे व सनातन संस्थेबाबत प्रश्न केला असता, समीरने, आमच्या धर्मप्रसार व कार्याविषयी पानसरे यांच्यात मतभेद होते. पानसरे हत्येत माझा व संस्थेचा हात नव्हता, असा दावाही केला आहे.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
No comments:
Post a Comment