Saturday, 19 December 2015

पीक विमा योजनेचे स्वरुप बदलणार - खडसे

eknath-khadse AAA म.टा. प्रतिनिधी, नागपूर पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांकडून हप्ता वसूल केला जातो. मात्र नुकसान होऊनही शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच मिळत नसल्याचे वास्तव आमदार शोभाताई फडणवीस यांनी विधानपरिषदेत मांडले. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही हे वास्तव मान्य करत पीक विमा योजनेचे सूत्रच बदलण्याची गरज असल्याचे सांगत लवकरच यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यावरून शोभाताई फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारचे लक्ष वेधले. सोयाबीनच्या पिकासाठी शेतकऱ्यांकडून ६०२ रुपये पीक विम्यासाठी हप्ता वसूल करण्यात आला. मात्र नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांच्या हातात केवळ १०० रुपये देण्यात आले. शेतकऱ्यांची ही फसवणूक असल्याचा मुद्दा फडणवीस यांनी मांडला. उंबरठा उत्पन्नाच्या आधारावर शेतकऱ्यांना विमा दिला जातो. कमीत कमी १० क्विंटर प्रतिहेक्टरी उत्पादन शेतकरी घेतो. मात्र उंबरठा उत्पन्न ७ क्विंटल आहे. जागतिक पातळीवर धानाच्या उत्पादन प्रतिहेक्टरी ३१.१२ क्विंटल येते. अशा स्थितीत ३० टक्के नुकसान झाल्यास नुकसानभरपाई कशी मिळणार असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. नियम होणार शिथिल आणेवारी आणि विम्याचा काहीही संबंध नाही. ३ वर्षांची सरासरी काढली जाते. १० कापणीचे प्रयोग केले जातात. मात्र आता विमा कंपनीचे सूत्र बदलण्याची गरज आहे. हवामानावर आधारित पीक विमा योजनेत ६५ मिलिमिटर पाऊस झाल्यास नुकसान भरपाई मिळते. पाऊस सलग तीन दिवस झाल्यानंतरच नुकसानभरपाई मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाई मिळावी यासाठी नियमांत शिथिलता आणण्याची गरज असून विमा कंपनीही यासाठी तयार असल्याचे खडसे यांनी सांगितले. दरम्यान केंद्रसरकारने सुरू केलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबियांना दान लाख रुपये मिळणार असल्याची शाश्वती खडसे यांनी दिली. उंबरठा उत्पन्नात अनेक त्रुट्या असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सभापती रामराजे निंबाळकर यांनीही यावेळी सभागृहात सांगितले. मोबाईल अॅप डाउनलो

No comments:

Post a Comment