Tuesday, 16 February 2016
रशियात आगीमधे महाराष्ट्रातील 2 विद्यार्थिनींचा मृत्यु
राज्यातील २ विद्यार्थिनींचा रशियात मृत्यू
Maharashtra Times | Feb 16, 2016, 05.00 AM IST
Whatsapp Facebook Google PlusTwitter Email
pic
AAAम. टा. प्रतिनिधी, मुंबई
रशियातील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये रविवारी रात्री लागलेल्या आगीत नवी मुंबईतील पूजा कल्लूर, व पुण्यातील करिष्मा उदय भोसले या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू ओढवला.
पश्चिम रशियात स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या सहामजली होस्टेलच्या चौथ्या मजल्यावर रविवारी आग लागली. आग लागली तेव्हा पूजा व करिष्मा एकाच खोलीत होत्या. आगीमुळे झालेल्या धुरात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दोघींचे मृतदेह स्थानिक हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टेमसाठी पाठविण्यात आले असून याची माहिती भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
पूजा ही नवी मुंबईतील विद्यार्थिनी असून तिने आपले शिक्षण वाशी येथील फादर अग्नेल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केले होते. करिष्मा ही पुण्याच्या मुकुंदनगरमधील कटारिया हायस्कूलची माजी विद्यार्थिनी होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तिने चमकदार कामगिरी नोंदविली होती. डॉक्टर व्हायचे स्वप्न घेऊनच ती रशियाला गेली होती. तिथे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तिला स्कॉलरशिपही मिळाली होती.
'व्हॅलेंटाइन डेला रात्री उशिरापर्यंत करिष्माने घरच्यांशी गप्पा मारल्या. आईसाठी एक पर्स खरेदी केल्याचे सांगितले. नंतर नेहमीप्रमाणेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणार असल्याचे तिने सांगितले. रविवारी उशिरापर्यंत आराम करणे शक्य असल्याने ती नेहमी असे करत असे. आता यापुढे मात्र तिच्याशी कोणताही संवाद होणार नाही...' अशी दुःखभावना करिष्माचे काका कोंडीराम मालुसरे यांनी व्यक्त केली. या दोघींचे पार्थिव भारतात कधी येते, याची प्रतीक्षा त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.
मोबाईल अॅप डाउ
No comments:
Post a Comment