श्री जोतिबाय नमः l
सौदागर माझा दयाधन ज्योतिर्लिंग माझा
रत्नागिरिवर शोभतो दख्खनचा राजा ll धृ ll
पंचगंगेच्या उत्तर तीरी, सह्याद्रीच्या पठारावरी
महापुर आहे रत्नागिरी, रत्नागिरी राजा ll1ll
चर्पटअम्बा अणि यमाई, तशी तुकाई अन मंगळाई
महाकाली ही धावत येई, सहाय्य करिती राजा ll2ll
करवीर कोल्हासुर गयासुर, रत्नागिरिवर तो रत्नासुर
दैत्य माजले अनेक भुवर, त्यास वधितो राजा ll3ll
दुष्टांचा संहार करितो, भक्तांसाठी धाऊन येतो
कृपा तयावारि नित्य करितो, ज्योतिर्लिंग माझा ll4ll
दीनानाथ धरी आस पदांची,नाही दूसरी आस कशांची
नित्य घडावी सेवा तुमची, दयाधन राजा ll5ll
No comments:
Post a Comment