Monday, 7 March 2016

दख्खनच्या राजा तुज दंडवत माझा

श्री केदाराय नमः l

दख्खंनच्या राजा तुज दंडवत माझा
धाऊनिया नित्य जासी भक्तांचीया काजा ll धृ ll

रविवारी पौर्णिमेसि, करिती भक्त वारी
तयांच्या संकटा ,ज्योतिबा निवारी ll 1 ll

चैत्रमास यात्रा मोठी, भक्तांचीये दाटी
छत्र चामरे ही ढळती, ज्योतिबा वरती ll2ll

छबिना निघे देवाचा, दर रविवारी
गुलालाची उधळण होते, ज्योतिर्लिंगावरि ll3ll

भालदार चोपदार , हाक देती भारी
सदरेवरती जाऊन बसली, ज्योतिबाची स्वारी ll4ll

जोतिबाचा चांगभला, म्हणती भक्त जन
दीनानाथ भक्त झाला, नाथपदी लीन ll5ll

No comments:

Post a Comment