Wednesday, 18 May 2016
गोधरा हत्याकांडातील मुख्य आरोपी फारूक भानाला अटक
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
गोध्रा येथे २००२ मध्ये झालेल्या साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडाचा मुख्य सूत्रधार फारूख भाना याला गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. फारूख गेल्या १४ वर्षांपासून फरार होता. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे.
गुजरातमध्ये २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्राकांड घडल्यानंतर दंगली उसळल्या होत्या. या जळीतकांडात ५९ जणांचा ट्रेनमध्येच होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मोहम्मद धांतिया, कादिर अब्दुल गनी आणि सुलेमान मोहन या तीन आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती. मात्र या जळीतकांडाचा मुख्य सूत्रधार असलेला फारूख सतत पोलिसांना गुंगारा देत होता. तब्बल १४ वर्षानंतर तो आता पोलिसांच्या हाती लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फारूखला गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील कलोल टोल प्लाझा येथून अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने ही कारवाई केली. याबाबत पत्रकार परिषद घेऊन पोलीस सविस्तर माहिती देणार आहेत.
Whatsapp Facebook
No comments:
Post a Comment