Wednesday, 20 July 2016

दत्त भजन - दत्त दिगंबर दैवत माझे

दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विलासे ॥धृ॥

अनुसूयेचे सत्य आगळे ।
तीन्ही देवही झाली बाळे।
त्रैमुरि अवतार मनोहर ।
दीणोध्दारक त्रिभुवनी गाजे ॥१॥

तीन शिरेम कर सहा शौभती ।
हास्य मधुर शुभ वदनावरती।
जटाजूट शिरी, पायी घडावा ।
भस्मविलोपित कांती साजे ॥२॥

पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ति ।
आनंदाचे आसू झरती ।
सारे सात्विक भाव उमलती ।
हळू हळू सरते मीपण माझे ॥३॥

No comments:

Post a Comment