Sunday, 3 July 2016
English idioms of happiness
English idioms: Happiness:
1. On top of the world - happy and elated.
(खूपच आनंदी आणि उत्साहपूर्ण/जगात अत्युच्च स्थानी असल्यासारखे वाटणे)
E.g. He was interested in her and she felt on top of the world.
(उदा: त्याला ती आवडत होती आणि त्यामुळे तिला खूपच आनंदी आणि जगात अत्युच्च स्थानी असल्यासारखे वाटले.)
2. Tickled pink - very much pleased or entertained.
(खूप खुश किंवा करमणूक झालेला)
E.g. I was tickled pink to have you visit us.
(तुम्ही आम्हाला भेटल्यानंतर मी खूप खुश झालो होतो.)
3. Happy as a clam - To be exceedingly happy and content.
(अतिशय आनंदी होणे)
E.g. I've been as happy as a clam since I moved to the country.
(उदा: मी देशात गेल्यानंतर अतिशय आनंदी होतो.)
4. Buzzing - (of a person) be euphoric or very stimulated.
(अत्यानंददर्शक किंवा अति-उत्तेजित)
E.g. Twenty-four hours later Mark was still buzzing
(उदा: 24 तासानंतरदेखील मार्क अजूनही अति-उत्तेजित होता)
5. Over the moon - extremely happy; delighted.
(आनंदाला उधाण येणे; चंद्रावर पोचल्यासारखे वाटणे)
E.g. They're going on holiday on Wednesday so they're all over the moon.
(उदा: बुधवारी ते सुटीवर जाणार आहेत त्यामुळे ते अतिशय आनंदात आहेत.)
6. In seventh heaven - in a very happy state.
(आनंदाच्या भरात असणे/आनंदाचे भरते येणे)
E.g. Jack was really in seventh heaven when he got a car of his own.
(उदा: जॅकला त्याची स्वतःची मोटारगाडी मिळाल्यानंतर तो खरंच आनंदाच्या भरात होता.)
7. I am thrilled to bits - to be extremely pleased
(अत्यंत संतुष्ट असणे)
E.g. 'So what did your parents say when they heard you were pregnant?' 'Oh, they were thrilled to bits.'
(उदा: 'मग, तू आई होणार असल्याचे समजल्यावर तुझ्या पालकांची प्रतिक्रिया काय होती?' 'ते अतिशय संतुष्ट झाले होते.')
8. Made my day - Something that makes you happy!
(एखादी गोष्ट जी तुम्हाला आनंदी करते!)
E.g. Son: Dad, I bought your favorite pastry for dessert.
Dad: Oh! great u made my day.
(उदा: मुलगा: बाबा, जेवणानंतर मिठाई म्हणून मी तुमची आवडती पेस्ट्री आणली आहे.
बाबा: अरे व्वा! मला फारच आनंद झाला आहे.)
9. Jump for joy - be ecstatically happy.
(आनंदाने उड्या मारणे - हर्षभरित होणे)
E.g. I'm not exactly jumping for joy at the prospect.
(उदा: नुसत्या आशेने मी काही आनंदाने उड्या मारत नाही.)
10. Like a dog with two tails - used to emphasize how delighted someone is.
(एखादी व्यक्ती किती/खूप आनंदी झालेली आहे हे स्पष्ट करण्यासाठी वापरले जाते.)
E.g. Jack: Is he pleased?
Mark: Like a dog with two tails.
(उदा: जॅक: तो आनंदित झाला आहे का?
मार्क: हो, खूपच आनंदित झाला आहे.)
No comments:
Post a Comment