Saturday, 23 July 2016

अरे मनमोहना रे मोहना l

अरे मनमोहना रे मोहना
कळली देवा तुला कळली राधिका
कळली राधिका रे कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मोहना ll

सात सुरावर तन मन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मोहना ll

धुंद सुगंधी यमुना लहरी
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी सरली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही ll
अरे मनमोहना रे मोहना ll

उरात काया मनात छाया
कशी समजाऊ वेडी माया
युग युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी खुलली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मोहना ll

No comments:

Post a Comment