Wednesday, 3 August 2016

विचार दान वास्तु शास्त्र

#विचार_दान

*१) मुख्य दरवाजा जेवढा शुशोभित करता येईल तेवढा करावा, मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवताचे फोटो लावू नये, फक्त शुभ चिन्ह लावावेत. उंबरा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बल चा चालेल, मधोमध लक्ष्मीची पाऊले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी. मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा, दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये. दरवाजा समोर कोणताही अडथळा असू नये.*

*२) स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद-कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे, दोन रंगांची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जावून पुढच्या कामाला सुरुवात करावी. सकाळ-संध्याकाळ उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा,*

*३) स्त्रियांनी सोवळं-ओवळं पाळाव. स्वयंपाक मनापासून करावा. सर्व सण पारंपारिक रित्या साजरे करावे. किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये.*

*४) पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देव-देवतांची पूजा करावी. मंदिरात कुलदैवत-कुलदेवी, घंटी, गणेशमूर्ती, शंकराची पिंड, बाळकृष्ण, शंख, आराध्यदैवत असावे. देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मुर्त्या असू नये. मंदिरात नेहमी तुपाचा(उजव्या)किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा (डाव्याबाजूस) व दोन अगरबत्ती (उजव्याबाजूस) लावाव्यात. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी.*

*६) घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मुर्त्या ठेवू नये. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेतच असावे.*

*७) पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावी. सुखलेलं झाड ठेवू नये. पूर्व / उत्तर / ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे.*

*८) घडयाळ व कॅलेंडर पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे.*

*९) बाहेरून आल्याआल्या लगेचच चप्पला घरात घेवू नये, फ्रेश होवून देवाला नमस्कार करूनच चप्पला आत घ्याव्यात.*

*१०) घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये, नवरा-बायकोंनी भांडू नये. मुलांबद्दल चांगलाच विचार करावा.*

*११) घरात जुन्या वस्तूंचा साठा (जुन्या न वापरात असलेल्या वस्तू, फाटलेले / जुने कपडे, भंगार, रद्दी इ.) जमा करून टेवू नये, जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये.*

*१२) सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठन करावे. घरात सतत मंत्रोप्चार करणारी मशीन लावावी. थोरांचा आदर करावा, कोणालाही दुखवू नये. आई-वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.*

*१३) छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे, जमेल तशी बचत करावी.*

*१४) कर्त्यापुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे.*

*१५) मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये, प्रत्येक वर्षी पितृ पक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे.*

*१६) वर्षातून एकदा सह-परिवार कुलदेवी-कुलदैवताच्या दर्शनास न चुकता जावून यावे, हे करताना नातेवाईकांना भेट देवू नये.*

*१७) एकदा वास्तुशांती व वर्ष-दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी.*

*.........🌸❗🕉❗🌸.........*

No comments:

Post a Comment