ऊठ पंढरीच्या राजा
ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला
पूर्व दिशी उमटे भानू
घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला
कुक्षी घेऊनिया कुंभा
उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाला
पुंडलीक हाका देई
उभ्या राही, रखुमाबाई
निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला
No comments:
Post a Comment