Friday, 2 September 2016

श्रीहरि पांडुरंग भजन

भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ || ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव स्वप्न तरल ते नकळ शैषव, विले त्यांत कधी विठ्ठला || १ || संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी विठ्ठला || २ || सरले शिश्नाव स्वच्छंदीपण, नुरले यौवन उरले मी पण परी न रंगले प्रमप्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ || विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा (VITHTHAL PAHUNA AALA MAJHYA GHARA) MARCH 23, 2013 SHAILESH PANSARE LEAVE A COMMENT  विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिंब लोन करा सावळ्याला ||धृ|| दूरच्या भेटीला बहु आवडीचा जीवन सरिता नारायण ||१|| सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी मी माझ्या माहेरी धन्य झालो ||२|| तुका म्हणे माझा आला सखा हरी संकट निवारी पांडुरंग ||३|| ज्या सुखा कारणे देव वेडावला, (JYA SUKHA KARANE DEV VEDAVALA) MARCH 23, 2013 SHAILESH PANSARE LEAVE A COMMENT  ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ || धन्य धन्य संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ || नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी भक्ती मुक्ती दासी एका जनार्दनी पार नाही सुखा, म्हणोनी देव भुलले देखा || २ || विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत (PAHATACHI HOTI DANG AAJ SARV SANT, VITHTHALACHYA PAYI VIT JHALI BHAGHYAVANT) MARCH 23, 2013 SHAILESH PANSARE LEAVE A COMMENT  पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ|| युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी अनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१|| कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राहे पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत ||२|| पाहुनिया विटेवरी विठू भगवंत दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत गुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ ||३|| कारे देवा उशीर पारकेला (KA RE DEVA USHIR PAAR KELA, TUJHYA SATHI JIV MAJHA JADALA) MARCH 23, 2013 SHAILESH PANSARE LEAVE A COMMENT  कारे देवा उशीर पारकेला तुझ्या साठी जीव माझा जडला|| धृ || तुझ्यासाठी सोडीला घरदार मोडीला संसार जीव माझा जडला || १ || तुझ्यासाठी होईन भिकारी करीन तुझी वारी जीव माझा जडला || २ || तुझ्या साठी राहीन उपवासी करीन एकादसी जीव माझा जडला || ३ || जनी मनी होईन तुझी दासी येईन चरणासी जीव माझा जडला || ४ || बसून कसा राहीला दगडावरी (BASUN KASA RAHILA DAGADAVARI) MARCH 23, 2013 SHAILESH PANSARE LEAVE A COMMENT  बसून कसा राहीला दगडावरी बसून कसा राहीला दगडावरी बसून कसा राहीला शीरडीचा साई कोणी पाहिला बसून कसा राहीला दगडावरी लिंबाखाली प्रगट झाला साईरूपी भगवान तो आला भगवा झेंडा साईने तिथे रोविला चला चला शीरडीला जावू डोळे भरुनी साईला पाहू साई चरणी देह माझा सारा वाहिला मन माझे आनंदी नाचे साई साई बोल माझे वाचे भक्ती मार्ग आम्हाला त्यांनी दाविला

No comments:

Post a Comment