Thursday, 20 October 2016
यमाई देवी आणि औंधासुरासी युद्ध
यमाई देवीच्या अस्तित्वाची कथा :
यमाई देवीच्या अस्तित्वाची कथा सांगितली जाते. तो काळ म्हणजे दंडकारण्याचा. जेव्हा येथे मनुष्य वस्ती फारच विरळ. वृक्षवल्लींची दाट वस्ती. त्यातूनही ऋषी मुनी, देव देवता यांची या शांत परिसरात विश्रांतीसाठी पसंती होती. मनुष्याचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर स्वतः अवतार घेत. विविध लीलया करून दाखवत.
असच एकदा घनदाट अरण्यात शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते. तेव्हा पर्वतीमातेचे एका मानवी आवाजाने लक्ष वेधून घेतले. त्यांनी शंकर भग्वानांना विनंती केली. 'कुणी मनुष्यास आपली मदत हवी आहे तरी तुम्ही तातडीने मदत करा '.शंकरांनी पार्वती मातेची समजूत काढली व स्पष्टीकरण दिले. पार्वती तू ज्यांची काळजी करतेस तो सामान्य माणूस नसून या विश्वाची काळजी करणारा विष्णूचा अवतार रघुवंश राजकुमार श्री राम आहे. त्यांची पत्नी सीता हिच्या शोधात. श्री राम बाहेर पडले आहेत याचा अर्थ रावणात अंतकाळ जवळ आला आहे. ही त्या भगवंताची लीला आहे आणखी काही नाही.
पार्वती मातेला या विधानांवरती विश्वास बसेना. तेव्हा हे दैवी पुरुष मग सीतेसाठी शोक का? सीतेसाठी हा शोध का? श्री रामांची परीक्षा घेण्याचे पार्वती मातेने योजले. शंकराची अनुमती घेतली व सीतेचे रूप धारण केले.व राम लक्ष्मण यांचा राज्यात पार्वती माता सीतेच्या रूपात शोक करत बसली.श्रीरामांनी मात्र अर्त:नयनांनी माता पार्वतीला ओळखले व 'ये माई तू शोक का करते?'असे विचारले व पार्वती मातेला 'यमाई' म्हणून वंदन केले. श्रीरामांना दर्शन देऊन यमाई तेथे अंर्तध्यान पावली. पुढे हीच यमाई भक्तांची यमाई माता व ग्रामदैवत बनली. म्हणून पार्वती मातेची तेथेही स्थापना झाली. तरीही पार्वतीमाता श्रीरामांना फसवण्यासाठी पुन्हा सीतेचे सोज्वळ रूप धारण करते. रस्त्यातील लक्ष्मणाला सीतेच्या प्रेमळ आवाजात 'सोबत नेवून हा वनवास संपवायची विनंती केली' तेव्हा लक्ष्मणलाही हीच आपली सीतामाता हा संपूर्ण विश्वास होता. पर्वतीमातेला सीता मानून लक्ष्मण सीता वाहिनीच्या चरणी माथा टेकवतात.
'यमाई' नावाने ह्यापण पावल्यानंतरही पार्वती मातेने हार मानली नाही. पुन्हा तिने सीतेचे रूप धारण केले.श्रीरामांचे नाव घेत आकांत सुरु केला केस भार संपूर्णपणे मोकळा केलेला डोळ्यात पाणी दाटलेले तसेच अर्त करुनिया आवाज पाहून श्रीराम थक्क झाले व म्हणाले 'ये मोकळ्या माई' असे म्हणून पुन्हा शरीरान व लक्ष्मण यांनी पार्वती मातेला वंदन केले. 'मोकळाई माई' पण श्रीरामांची नजर जेव्हा जेव्हा सितारूपी पार्वती मातेवर पडते तेव्हा त्यांना सत्य उमगते व ते पार्वतीमातेला ओळखतात व म्हणतात "हे माते तू वारंवार रूप बदलून समोर येतेस?" श्रीरामांच्या ह्या प्रश्नांवरून श्रीराम हे मनुष्य नसून दैवीअवतार असल्याचा पार्वती मातेच्या लक्षात आले. पार्वती माता पु पार्वती माता जेव्हा पुन्हा शंकरांना हा वृत्तांत सांगते तेव्हा शंकर पुन्हा पार्वती मातेला कथन करतात-श्रीराम ज्या ज्या वृक्ष वल्लींना सीता मातेचा शोध विचारून आलिंगन देत आहेत, ते वृक्ष बनून वर्षानुवर्ष भागवतांची वाट पाहत तपश्चर्या करत बसलेले ऋषीमुनी आहेत आणि शरीरान तेही त्यांना बरोबर त्यांना मुक्ती मिळत आहेन्हा श्रीरामांना दर्शन देते तेव्हा ती तेथे 'तुकाई' नावाने स्थापित व श्रीरामांवर प्रसन्न होवून त्यांना विजयीभव हा आशीर्वाद देतो. तसेच त्यांना पार्वतीमातेचे श्रीरामांची परीक्षा घेणे हे देखील विधिलिखित होते. 'यमाई' 'तुकाई' 'मोकळाई' यांनी पुढे जाऊन भक्तांचा उद्धार करण्याची मोय्ही जबाबदारी उचलायची आहे हे दंडकारण्यातील या पवित्र भूमीवरील धर्मस्थापना निश्चित आहे. ऐकून पार्वती मातेने शंकरांना भक्तिभावाने वंदन केले.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री यमाई देवी महात्म्य..... श्रीमूळपीठदेवी, तांदळ्यासह गावातील यमाईदेवी
यमाईदेवीचे औंधासूराशी युध्द :
वैकुंठ, स्वर्ग, कैलास, विष्णू निवास अशी विविध देव - देवांची निवासस्थाने असली तरी पृथ्वीतलावर निसर्गाच्या सानिध्यात राहणे परमेश्वर पसंत करतो. जेथे निसर्गमुक्त हलावे आपली कला - कौशल्य उधळतो ....
शांती, गारवा असतो अशा ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य असते. असंच एक ठिकाण - दंडकारण्य म्हणून ओळखले गेलेल्या अरण्याचा कुकुंम तिलक म्हणजे सध्याचा औंधमधील डोंगरपरिसर मूळपीठ.
सूर्यकिरणांमध्ये जमिनीवर उतरण्यासाठी स्पर्धा लागावी अशी दाट झाडी ....त्यात पडणारे कवडेस्वरूपी सूर्यकिरण .... झाडांच्या गर्दीत उताराच्या दिशेने पळणारे मधुरपाणी .... दाट जंगलात ती शांतता भांगावणारे पशु-पक्षी प्राणी .....येथे परमेश्वर वास करत असे देवी यमाईचे हे निवासस्थान म्हणजे जणू तिचे माहेर घरचं मूळपीठ.या निवासस्थानी तिच्या अस्तित्वाच्या खुणा आजही श्रद्धास्थाने बनून आहेत. अगदी अनादी काळापासून ते आजच्या कालयुगाच्या मानव वस्तीत सुद्धा तिचे विविध दाखले आहेत.
पुरातन ( देविदेवतांचा काळ ) काळात येथे देवीचे वास्तव्य आणि अमाप सृष्टीसौंदर्य यामूळ हृषी- मुनींचे तपाचे हे ठिकाण होते. हृषीमुनींचे तप येथेच फळाला जाई. येथील तपसाधनेच्या पुण्याईवर मुलामुलींना इच्छित वरप्राप्ति, मोक्ष प्राप्ती होई. या हृषीमुनींच्या मांदीआळीत एक महत्त्वाचे रत्न म्हणजे अंबहृषी त्यांनी मोरणतीर्थ येथे ध्यानसाधना आरंभली होती. तपाचे तेज चारी दिशांना पसरत होते पुण्याईचा दरवळणारा सुगंध काही दृष्ट राक्षसांना रुचला नाही ......त्यातील एक होते औंधासूर ....कोणी होम हवन करून पुण्या प्राप्त कराव हे त्याला न पटनार कारण तो स्वतः सर्व युद्धकौशल्यात निपुण होता, सर्व शस्त्रात पारंगत होता, मायावी विद्या जाणकार होता, हे सर्व त्याला परमेश्वर कृपेने प्राप्त झाले होते. पण एक असुर असल्याने त्याला सर्व विध्यांचे स्वामित्व येताच स्वतः परमेश्वर झाल्याचा भ्रम झाला होता. ऋषिंनी आता यज्ञ त्याग करून फळ प्राप्ती न करता त्याची उपासना भागावी हेच त्याने मांडले होते. अशा वेळी तो अंब ऋषींचा यज्ञ कसा बरं होऊ देईल?
अंब ऋषिंनी इतर ऋषींना पाचारण करून यज्ञाची तयारी सुरु केली होती. यज्ञासाठी लागणारी समिधा - चंदन, धूप, फुले, पाने इ. प्राप्त झाल्यावर यज्ञ सुरु झाला .... मंत्र उच्चारांनी आसमंत तृप्त झाला तर वातावरणात तेज पसरते. या तेजाने भयभीत राक्षसगण औंधासुराला याची कल्पना द्यायला गेले. गर्वाने आंधळ्या झालेल्या औंधासुराने तो यज्ञ भ्रष्ट करण्यास सांगितले.
राक्षस लोक यज्ञ भ्रष्ट करण्यासाठी मृत पशु घेऊन आले, यज्ञाच्या त्या पवित्र अग्नीत मृत पशूंना फेकण्यात आले. त्यामुळे यज्ञाचे पावित्र्य नष्ट झाले.पवित्र मंत्रोच्चार थांबले यज्ञ भंग झाल्याने हृशिगन दुखी कष्टी झाले. त्यांनी परत यज्ञ मोठ्या कष्टाने सुरु केला पण औंधासुरापुढे तो काही पूर्णत्वास जाईना तेव्हा मात्र यावर उपाय काय करावा हे ऋषींना सुचेना. शेवटी आपली रक्षनकर्ता यमाई देवीची करुणा भाकण्याचा विचार सर्वांनी पक्का केला व सर्वजण मूळपिठावरती आले. तेथे देवाची आराधना सुरु झाली. देवी अंतज्ञानी होती. तिने औंधासुराचा अंत जाणला होता. आता फक्त त्या अंताला कारणमात्र युद्ध होणार होते. आणि पुन्हा एकदा असुरांच्या अन्यायाचा नाश होऊन, प्रेम भक्ती, यांचे प्रभुत्व सिद्ध होणार होते.
युद्धाचा सारीपाठ मांडला गेला यमाईने युद्ध सहकार्याला पराक्रम श्रेष्ट ज्योतीबा, कालभैरवी, कालका, महालक्ष्मी असे विविध देवतांना बरोबर घेतले आणि यज्ञाचे संगरक्षण सुरु झाले.
औंधासूर आपल्या राक्षसगनासह युद्ध मैदानावर उतरला होता. तुंबळ युद्ध सुरु झाले. मायावी राक्षस आणि देव-देवता यांच्यात अस्त्र - शास्त्र निनादू लागली. राक्षसांच्या सांडनारया रक्ताच्या साठ्याने पृथ्वी शांत होत होती.
युद्धवर्णन :
आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भावानिमाता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खड:ग, त्रिशूल, धनुष्य होते. पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण रक्ताच्या तहानेने व्याकूळ झालेला. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधात होते. यज्ञ सुरु झाल्याची बातमी राक्षसांना लागताच राक्षस कल्लोळ माजवत धावले मृत जनावरे हातात होतीच पण मृत जनावरे यज्ञापर्यंत पोहोचण्या आधीच सरसर करत एका बाणाने लाक्षवेधात एक असुर जमिनीवर पडला त्यापाठोपाठ बाणाच्या वर्षावासोबत असूरसेना गारद झाली. काही भयभीत असुर औंधासुरा पर्यंत पोहचले एका स्त्रीने अशाप्रकारे मत द्यावी या विचाराने पेटलेला औंधासुर आपल्या आयुधासह यज्ञाकडे धावला.
अंबेच्या दिशेने कोणी वृक्ष फेकले तर कोणी पाषाण फेकले पण बाणांच्या दणक्याने ते अवाढव्य वृक्षहि हवेतून रोखून जमिनीवर पडले.
मायावी औंधासुराने सैन्यांची माघार लक्षात येताच विद्या बोलण्यास सुरुवात केली एक सोडलेला बाण क्षणात १०० रूपे घेऊन मातेच्या दिशेने जात. यमाई सुध्दा त्याचे उत्तर त्याच मंत्राने परत पटवी. आकाश्यात जणू बाणांची क्षणभर रेलचेल होत आणि क्षणात बाणांचे चुरडे जमिनीवर पडत.
औंधासुराने रागाने खङग मंत्रून फेकला पण खङग आकाशात आहे तोच अंबेने त्रिशूल फेकला त्रिशूल व खङग जेव्हा भिडले तेव्हा त्याच्या ठिकऱ्या उडून खङग नष्ट झाले आणि त्रिशूल अंबेच्या हातात परत विराजमान झाले.
सर्व शास्त्रे नाकाम झाली, औंधासुर हताश झाला. यज्ञ मात्र सुरळीत चालू होता.
शास्त्रे संपल्यावर औंधासुर अरण्याकडे पाळला. औंधासुराने पर्वतास्त्र उगारले... अवाढव्य डोंगर उठू लागले धरणी कंप झाला. अंबेने आपल्या हाती वज्रास्त्र उचलले तसे धरणी कंप थांबला डोंगर पर्वत शांत... जागीच निश्चल झाले.
औंधासुराने अग्नीचा वर्षाव केला तो अंबेने पर्जन्याने विजावला.
औंधासुराची सर्व अस्त्रे सुधा फिकी पडू लागल्याने औंधासुर मायावी युध्द करू लागला अदृश्य राहून वार करू लागला. त्यामुळे ढगातून अचानक अस्त्र प्रवाह होई. औंधासुराने ढगांना भिंत बनवली त्याच्या आड तो लपला होता. जगदंबेने वायूअस्त्र सोडले व सर्व ढगांना पळवून लावले. आता औंधासुराला लपायला जागा नव्हती. हे तुंबळ युध्द सुरु होऊन पाचवा दिवस होता पण याचे भान कोणालाच नव्हते. देवी खूपच क्रुध्द झाली होती. तिने निर्वाणीचा शेवटचा बाण उचलला औंधासुर भीतीने थरथर कपात होता. बाण सळसळत औंधासुराजवळ गेला क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले. एका चीत्काऱ्या बरोबर निरव शांतता पसरली. औंधासुराचे शीर धडावेगळे पडले होते.
आज अन्यायाचा, अधर्माचा अंत होऊन धर्म स्थापना झाली होती. धडावेगल्या मस्तकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. ते मस्तक बोलू लागले - आंबे, आदिमाते, तुझ्या हातून माझा अंत होतोय हि माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अनेक शूरवीर योद्धे, ज्योतिबा यांना युद्धात हरवल्याने मला गर्व झाला होता पण तो गर्व आज नष्ट झाला. माझ्या पापाचे फळ मला मिळाले आहे. आता एकच तुला आई मागणे आहे.
तुझी कीर्ती जशी अजरामर राहील तसे माझे नाव सुध्दा अजरामर राहू दे, या नगरीला माझे नाव राहू दे , तुझे दर्शन मला नित्य नियमित घडू दे तुझ्या मंदिरा बाहेर मला जागा दे आणि माझीही पूजा होऊ दे...
अंतसमयी होणारी हि याचना एकूण देवी द्रविली तिने औंधासुराला वरदान दिले. या नगरीला " औंध" हे नाव अर्पण केले. तसेच देवी जिथे अंतर्धान पावली तेथे देवीची मूर्ति स्थापना झाली, त्यामुर्तीचा समोर औंधासुराचे शीर स्थापले गेले.
आज सुध्दा यमाई मंदिराच्या समोरच देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन घडेल या पद्धतीने औंधासुराचे छोटे मंदिर बांधले गेलेले आढळते. भक्त यमाई दर्शनाबरोबर औंधासुराचे देखील दर्शन आवरुजून घेतात.
हा युद्धाचा कालावधी चैत्रातील पाच दिवसांचा आहे, तो यमाईचा विजय उत्सवाच्या स्वरुपात साजरा होतो. याला 'चैत्र उत्सव', ' वासंतिक उत्सव' म्हणतात. संस्थान काळात या पाच दिवसात भोजनाच्या पंक्ती पडत होत्या, पाच दिवस रात्री कीर्तन, भजन चाले त्यातील तासगावकर हरिदासांचे कीर्तन खूप लोकप्रिय होते.
आज देखी चैतरत अंबेची रथातून मिरवणूक काढली जाते .
No comments:
Post a Comment