Sunday, 9 October 2016

कविता - राजा शिव छत्रपती

अनेक झाले पुढेही होतील अगणित ह्या भुमीवरती जाणता राजा एकची झाला तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।। धर्म मराठा अभय मिळाले सर्व समानभान नित्य आचरले भगवा झेंडा घेऊन हाती केली चहूकडे जनजागृती तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।। जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा गुरू तुकाराम देऊ ज्ञाना धाडसी मावळे भवानी सोबती म्हणे हरहर महादेव गर्जती तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।। स्वारी केली किल्ले घेऊनी काही जिंकुन काही बाधून मोगल नमले शिकस्त संपली भल्याभल्यांची झोप उडवीली तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।। रयतेचं राज्य स्थापनेसाठी मावळे जमले विजयासाठी ऐक्यासाठी दिली आहुती मिळाली ज्यांना विरगती तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।। मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।। || जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे|| marathi kavita on

No comments:

Post a Comment