नमस्कार सेवेकरी हो 🙏🏻🚩
🚩आदिशक्ती दुर्गेचे चौथे रूप (४)🙏🏻
🚩श्री कुष्मांडा माता 🚩
अस्त्र-शस्त्र : कमंडल, धनुष, बाण,
कमल-पुष्प,
अमृतपूर्ण कलश,
चक्र तथा गदा
वाहन : सिंह🙏🏻🚩
🚩 मंत्र :१) या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🙏🏻
२) सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥🚩
३) वन्दे वांछित कामर्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढा अष्टभुजा कुष्माण्डा यशस्वनीम्॥
भास्वर भानु निभां अनाहत स्थितां चतुर्थ दुर्गा त्रिनेत्राम्।
कमण्डलु चाप, बाण, पदमसुधाकलश चक्र गदा जपवटीधराम्॥
पटाम्बर परिधानां कमनीया कृदुहगस्या नानालंकार भूषिताम्।
मंजीर हार केयूर किंकिण रत्नकुण्डल मण्डिताम्।प्रफुल्ल वदनां नारू चिकुकां कांत कपोलां तुंग कूचाम्।
कोलांगी स्मेरमुखीं क्षीणकटि निम्ननाभि नितम्बनीम् ॥🙏🏻🚩
🚩दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ' कुष्मांडा' आहे.
आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्नकेल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते.
संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिकप्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते.🙏🏻🚩
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.
या दिवशी साधकाचे मन'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. यादिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने
कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना
केली पाहिजे. 🙏🏻🚩
सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा यादेवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाचीरचना केली होती. म्हणून ती सृष्टीचीआद्यशक्ती आहे.
या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे
निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे.तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून
निघतात.
ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि
प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच
आहे. 🙏🏻🚩
देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवीअष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे.
तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण,कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे.आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह 🦁 आहे.🙏🏻🚩
🚩कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा
होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणिआरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न
करण्यासाठी फार काही करावे लागत नाही.मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्यालाशांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.कुष्मांडाची उपासना मनु्ष्याला रोगापासूनमुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे
घेऊन जाणारी ही देवी आहे.🙏🏻🚩
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩
🚩 श्री कुष्मांडा माता प्रसन्न 🙏🏻🚩
No comments:
Post a Comment