Thursday, 5 January 2017

कुंडलिनी जागृत प्राणायम भाग 2

||श्री स्वामी समर्थ||

||प्राणायाम भाग २||

कुंडलिनी जागृती प्राणायाम :- या प्रकारामध्ये एक पूरक, चार कुंभक व दोन रेचक अशा पद्धतीने हा प्राणायाम करायचा असतो.
एकदा मंत्र म्हणेपर्यंत डाव्या नाकपुडिने श्वास आत घ्यावा. चार वेळा मंत्र म्हणून होईपर्यंत श्वास रोखून धरावा. डाव्या नाकपुडीने श्वास आत घेतांना अंगठयाने उजवी नाकपुडी बंद करावी व मंत्र म्हणत श्वास आत घ्यावा. नंतर तर्जनी व अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून चार वेळा मंत्र म्हणेपर्यंत श्वास रोखून धरावा. याला 'कुंभक' म्हणतात. नंतर दोन वेळा मंत्र म्हणेपर्यंत उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा, हा झाला अर्धा प्राणायाम. काही क्षण श्वास न घेता थांबावे. याला म्हणतात बहिर्कुंभक. नंतर उजव्या नाकपुडीने एकदा मंत्र म्हणून होईपर्यंत श्वास आत घ्यावा. मधल्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करावी. चार वेळा मंत्र म्हणेपर्यंत श्वास रोखून धरावा व नंतर दोन वेळा मंत्र म्हणेपर्यंत डाव्या नाकपुडीने श्वास सोडून घ्यावा. काही क्षण श्वास घेऊ नये. या संपूर्ण क्रियेला एक प्राणायाम म्हणतात. काही लोक १:४:२ प्राणायाम असे म्हणतात. या प्राणायमाने कुंडलिनी शक्ती जागृत होते. हळूहळू १:४:२ हे प्रमाण २:८:४ अशा प्रकारे वाढवायचे असते. सेकंदाच्या प्रमाणात सांगायाचे ठरविल्यास दहा सेकंद पूरक, चाळीस सेकंद कुंभक व वीस सेकंद रेचक असेही प्रमाण ठरविता येते. याशिवाय खास कुंडलिनी जागृतीसाठी साधक त्रिबंध करतात.

मूलबंध :- गुदद्वार आत ओढून घेणे, यास मूलबंध म्हणतात. श्वास आत घेते वेळी मूलबंध करायचा असतो, याने अपानवायू वर सरकतो.

जालंधरबंध :- कुंभक करते वेळी हा बंध करायचा असतो. हनुवटी कंठाशी लावल्याने हा बंध होतो. याला 'जालंधरबंध' म्हणतात. याने प्राणवायू खाली सरकतो.

उडीयानबंध :- रेचक केल्यानंतर पोट आत खेचून घ्यावे. याला 'उडीयानबंध' म्हणतात. याने बहिर्कुंभक आपोआपच साधला जातो. अशा प्रकारे त्रिबंध केल्याने कुंडलिनी शक्ती लवकर जागृत होते. दररोज किमान वीस प्राणायाम करावेत. हळूहळू प्रमाण वाढवीत जावे; तसेच पूरक, कुंभक, रेचक यांचा वेळही वाढवीत जावे, म्हणजे कुंडलिनी जागृत होऊन वर वर सरकू लागते.
क्रमशः

संकलन :- श्री दत्तावधूत वाड्मय

||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||

No comments:

Post a Comment