Wednesday, 11 January 2017
लिम्बु पाण्याचे फायदे
मध - लिंबुपाण्याचे जादुई गुणधर्म
रिकाम्या पोटी मध-लिंबूपाणी घेण्याचे हे 8 फायदे तुम्हाला माहित आहे का ?
Dipali Nevarekar | Updated: January 4, 2017 8:56 pm
Tags: Lemon and Honey Constipation Marathi weight loss in Marathi Health tips in Marathi Fitness

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत मध आणि लिंबाचा रस घेतल्यास तुमचं वजन नक्कीच घटू शकतं मात्र वजन कमी करण्यासोबतच अनेक जादुई गुणधर्म दडले आहेत या ‘मध – लिंबू’ मिश्रित पाण्यात तर मग पहा काय काय करू शकते मध – लिंबुपाणी…..
कसे बनवाल हे मिश्रण ?
एक मोठा ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक टीस्पून मध घेऊन मिश्रण एकत्र करा. मधुमेही देखील हे मिश्रण घेऊ शकतात. हे मिश्रण घेतल्यानंतर अर्धा तास चहा , कॉफी घेणे कटाक्षाने टाळा. तुम्हाला सुडोल आणि सुंदर दिसण्यासाठी हे मिश्रण नक्कीच मदत करेल .

मध – लिंबुपाण्याचे फायदे -
बद्धकोष्ठता दूर ठेवते
रोज सकाळी मध – लिंबुपाण्याचे मिश्रण घेतल्यास पचनशक्ती सुधारण्यास व शौचास सुलभ होण्यास मदत होते . गरम पाण्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शौचातील कडकपणा दूर होऊन बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो .

झटपट वजन कमी करण्यास मदत करते
मध – लिंबुपाणी पोट साफ करण्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. यामधील पेक्टिन नामक फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवते. मध – लिंबू मिश्रित पाणी पोटात अल्काईन स्थिती तयार करत असल्याने तुमचे वजन झटपट कमी करण्यास मदत होते . (पहा ‘अगंबाईअरेच्चा2′ साठी सोनाली कुलकर्णीने कसं घटवलं 13किलो वजन)
पचनशक्ती सुधारते
निरोगी आरोग्यासाठी उत्तम पचनशक्ती गरजेची असते. मध – लिंबुपाण्याचे मिश्रण पचनप्रक्रियेचा मार्ग सुधारण्यास मदत करते. लिंबू यकृताला जड अन्नपदार्थापासून पित्त निर्माण करण्यास मदत करते. तर मधातील जीवाणू मारण्याची क्षमता शरीरात संसर्ग होऊ देत नाही . याशिवाय हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते .

मोठ्या आतड्याचे कार्य सुधारते
मानवी शरीरात अनेक विषारी घटकांची निर्मिती होत असते त्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा संभव असतो .मध – लिंबुपाण्याचे मिश्रण लहान तसेच मोठ्या आतड्यांना चालना देते व विषारी घटकांचा नाश करते. आयुर्वेदानुसार हे मिश्रण नैसर्गिकरित्या मोठे आतडे स्वच्छ करते, अन्नातील पोषक द्रव्ये ग्रहण करते व विषारी घटक दूर ठेवते.
उत्साहवर्धक व प्रसन्न ठेवते
सकाळी उठाल्यानंतरदेखील जर तुम्ही निरुत्साही राहत असाल तर मध – लिंबुपाण्याचे मिश्रण सकाळी नक्की प्या ! कारण यामधील मध तुम्हाला तत्काळ उत्साही करते तर पाण्यामुळे मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा झाल्याने मनही प्रसन्न राहते . शरीरातील विषारी घटकांमुळे येणाऱ्या सुस्तीपणाला लिंबू दूर ठेवते त्यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटते .

मूत्रमार्गाच्या समस्या दूर करते
रोगजंतूसंसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याचे महत्वाचे काम मध करते. मध – लिंबुपाण्याचे मिश्रण शरीरातील अपायकारक घटक मुत्रामार्गे शरीरातून बाहेर टाकते. तसेच मूत्रमार्ग स्वच्छ करते. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गात इन्फेकशन होण्याचे प्रमाण अधिक असते अशावेळी हे मिश्रण नक्कीच अतिशय उपयुक्त आहे.
मुखातील दुर्गंधी दूर करते
लिंबातील आम्ल तत्व , मध व पाण्याबरोबर मिसळल्याने तात्काळ तोंडातील दुर्गंधी दूर होते. लिंबू तोंड स्वच्छ करून लाळ ग्रंथी प्रवृत्त करतात व रोगजंतुंचा नाश करतो. तोंडात राहिलेल्या अन्नकणांमुळे तसेच जिभेवर तयार होणाऱ्या पांढरया थरामुळे अनेकदा दुर्गंधी येते मात्र मध – लिंबुपाण्याचे मिश्रण नैसर्गिकरीत्या दुर्गंधी दूर करते.
त्वचेची कांती उजळते
लिंबू त्वचेची कांती उजळवण्यास अत्यंत गुणकारी आहेच पण त्याच बरोबर लिंबामुळे होणारी रक्तशुद्धी व नंवीन रक्त पेशी निर्माण करण्याची क्षमता त्वचेचा पोत सुधारते. तर मध आणि पाणी विषारी घटक काढून त्वचेला पुनरुजीवीत करते.
छायाचित्र सौजन्य – Getty Images
Published: February 23, 2015 9:55 am | Updated:January 4, 2017 8:56 pm
Disclaimer: TheHealthSite.com does not guaran
No comments:
Post a Comment