नमस्कार सुप्रभात जय मल्हार श्री गुरुदेव दत्त !
गुरु : ब्रम्हा, गुरू: विष्णू, गुरू" देवा महेश्वरा, |
गुरु :साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरूवे नम:||
|| श्री दत्तस्तुती ||
यतीरूप दत्तात्रयादंडधारी
पदी पादुका शोभती सौख्यकारी
दयासिंधु ज्याची पदें दुःखहारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
पदें पुष्करा लाजवीती जयाचीं
मुखाच्या प्रभे चंद्र मोहुनि याची
घडो वास येथें सदा निर्विकारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू
कटिं मौंज कौपीन ते काय वानूं
गळां माळिका ब्रह्मसूत्रासि धारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
गळां वासुकीभूषणे रुंडमाळा
टिळा कस्तुरी केशरी गंध भाळा
जयाची प्रभा कोटिसूर्यासी हारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
अनुसूया सत्त्व हरावयासी
त्रिमुर्ति जातां करी बाळ त्यांसी
निजे पालखीं सर्वदा सौख्यकारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
दरिद्रें बहु कष्टला विप्र त्यासी
क्षणें द्रव्य देऊनि संतोषवीसी
दिला पुत्र वंध्या असुनी वृद्ध नारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
द्विजाच्या घरी घेवडा वेल ज्याने
मुळापासुनी तोडिला तो तयाने
दिली संतती संपदा दुःखहारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
अनंतावधी जाहले अवतार
परी श्री गुरुदत्त सर्वांत थोर
त्वरें कामना कामिकां पूर्णहारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
मनीं आवडी गायनाची प्रभुला
करी सुस्वरें नित्य जो गायनाला
तयाच्या त्वरें संकटातें निवारी
तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी
काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं
पद्मकरेण शंखम् चक्रं
गदाभूषितभूषणाढ्यं
श्रीपादराजं शरणं प्रपद्येत्
No comments:
Post a Comment