Saturday, 28 January 2017

धन्य सोलापूर, धन्य भुकैलास


धन्य सोलापूर, धन्य भुकैलास
सिद्धराम ईश , येथे नांदे ll
शैलपती शिव, श्री मल्लिकार्जुन
होई आगमन, प्रत्यक्षात ll
अमृतलिंगी करिती जे स्नान
होतील पावन, याच जन्मी ll
सोरटी सोमनाथ, महाकालेश्वर
औंढया नागनाथ, त्र्यंबकेश्वर ll
परळी वैजनाथ, घृष्णेश्वर
शैल मल्लिनाथ, रामेश्वर ll
केदारनाथ, भीमाशंकर
काशी विश्वनाथ, ओंकारेश्वर ll
बारा ज्योतिर्लिंगे, भेटीलागीं गोळा
परी आत्मलिंग , सोलापुरी ll
अडूसष्ट लिंग, ज्याने स्थापियेली
तोच सिद्धरामेश्वर, सोलापुरी ll

No comments:

Post a Comment