करुणात्रिपदी - ॥१॥
शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ ध्रु. ॥
तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥
अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा घरिसी यथार्था ।
तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? ।
सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥ २ ॥
तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी ।
निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥
तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।।
निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता ।
वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥ ४ ॥
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार ।
तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ।
परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥ ५ ॥
करुणात्रिपदी - ॥२॥
श्री गुरुदत्ता जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।
चोरे द्विजासी मारिता मन जे कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥१॥
पोटशुळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥२॥
द्विजसुत मरतां वळले ते मन हो की उदासीन न वळे आतां । श्री गुरुदत्ता ॥३॥
सतिपति मरतां काकुळती येतां वळले ते मन न वळे की आतां । श्री गुरुदत्ता ॥४॥
श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता कोमलचित्ता वळवी आतां । श्री गुरुदत्ता ॥५॥
जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।
करुणात्रिपदी - ॥३॥
जय करुणाघन निज जनजीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन । जय करुणाघन ।
निज अपराधे उफराटी दृष्टि होऊनि पोटी भय धरु पावन । जय करुणाघन ॥१॥
तूं करुणाकर कधी आम्हांवर रुससि न किंकर वरद कृपाघन । जय करुणाघन ॥२॥
वारी अपराध तूं मायबाप तव मनी कोप लेश न वामन । जय करुणाघन ॥३॥
बालकापराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन । जय करुणाघन ॥४॥
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्रिनंदन । जय करुणघन ॥५॥
निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन । जय करुणाघन ।
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु रायाची,
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थही घडली आम्हा आदिकरुनी काशी ||
मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थ गाती
नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती ||
कोटी ब्रम्हहत्या हरती करिता दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात ||
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ||
प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरु रायाची,
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
*अपराध क्षमा*
अपराध क्षमा आता केला पाहिजे | गुरु हा केला पाहिजे |
अबद्ध सुबद्ध गुण वर्णीयले तुझे ||
नकळेची टाळ वीणा वाजला कैसा | गुरु हा वाजला कैसा |अस्ताव्यस्त पडेनाद गेला भल तैसा ||
नाही ताल,ज्ञान नाही कंठ सुस्वर | गुरु हा कंठ सुस्वर, झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ||
निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे | गुरु हे वेडे वाकुडे | गुण दोष न लावावा सेवकाकडे ||
*श्री स्वामी समर्थ*
*अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज श्री सदगुरु अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराज की जय*
भवतारक या तुझ्या पादुका घेईन मी माथा।।
करावी कृपा गुरुनाथा।।
बहु अनिवार हे मन माझे चरणी स्थिर व्हावे।
तव पदी भजनी लागावे।।
काम क्रोधादिक हे षडरिपु समुळ
छेदावे।।
हेचि मागणे मला द्यावे।।
अघहरणा करि करुणा
दत्ता धाव पाव आता।
करावी कृपा गुरुनाथा।।
तुचि ब्रह्मा तुचि विष्णु
तुचि उमाकांत।।
तूचि समग्रदैवत।।
माता पिता इष्ट बंधु तुचि गणगोत।।
तुचि माझे सकळ तीर्थे।।
तुजवीण मी गा काहीच नेणे तूची
कर्ता हर्ता।।
करावी कृपा गुरुनाथा।।
तनमनधन हे सर्व अर्पुनी कुरवंडीन
काया।
उपेक्षु नको गुरुराया।।
कर्महीन मी मतीहीन मी
सकळ श्रम वाया।
लज्जा राखी सदगुरु राया।
मातृबाला परी सांभाळी
तूचि मुक्तिदाता।।
करावी कृपा गुरुनाथा।।
शेषा ब्रह्मया वेदां न कळे
महिमा तव थोर।
तेथे मी काय पामर।
वियोग नसु दे तव चरणांचा
हाचि देई वर।।
शिरी या ठेवी अभयकर।
हिच विनंती दर्शन द्यावे
दासा रघुनाथा।
करावी कृपा गुरुनाथा।।
श्रीसदगुरुचरणार्विंदार्पणमस्तु।।
No comments:
Post a Comment