Wednesday, 11 January 2017

साईबाबांना साई आणि स्वामी समर्थांना स्वामी का म्हणतात ?

*साईबाबांना "साई" का म्हणतात..?*
*स्वामी समर्थांना "स्वामी" का म्हणतात.. ?*
----------------s--------------------

*उत्तर  -:*
दोन्हीही भगवंताचेच अवतार त्यामुळे शिकवण पण एकच पण पद्धत वेगवेगळी

म्हणजेच बघा साईबाबा साईनाथ साई साईराम अशा अनेक नावाने आपण त्यांना संबोधतो.

*कारण*
         साईंनी आपल्या भक्तांवर आई सारखे प्रेम केले.
ते आपल्या भक्तांसाठी प्रेमळ आई झाले तर त्याच भक्तांना संकटातुन बाहेर काढण्यासाठी बाबा झाले.
म्हणुनच ते साईबाबा झाले.

साई - म्हणजे साक्षात आईस्वरुप

असेच प्रेमळ स्वरुपाने त्यांनी सगळ्यांनाच आपल्या छञछायेत घेतले नुसते घेतले नाहीतर त्यांना आईच्या मायेप्रमाणे स्वतःच्या हाताने जेवण बनवुन खाऊ घातले.
एका आईला जशी आपली सर्व लेकरे सारखीच असतात तीचे आपल्या प्रत्येक लेकरावर सारखेच प्रेम असते ती कधिच आपल्या लेकरांमध्ये फरक करत नाही
तसे साईंनी सुध्दा कधिच आपल्या लेकरांमध्ये फरक केला नाही आणि आई प्रमाणेच नेहमी आपल्या लेकरांच्या कल्याणाचा सदैव विचार केला.

एखादे बाबा कसे आपल्या लेकरांना लागणार्या गोष्टिंचा पुरवठा करण्यासाठी घराबाहेर जाऊन दिवसभर ऊन्हातानात काम करतात.

तसेच साई सुद्धा दारोदारी भिक्षा मागुन आणायचे आणि मग त्यातुन मिळालेल्या धान्यातुन स्वतः अन्न शिजवायचे आणि पहीले आपल्या लेकरांना खाऊ घालायचे मगच आपण खरतर लेकरांनी ( भक्तांनि कींवा सेवेकरींनी ) खाल्लेतर त्यातच त्यांचे पोट भरायचे.

एकंदरीत साई हे सगळ्या गोरगरीबांचे आईबाबा बनले.
म्हणुन त्यांना सगळे साईबाबा म्हणतात.

*आता स्वामी समर्थ*
-------------s-----------------

स्वामींचे पण तेच कार्य पण पद्धत वेगळी
स्वामींनी सगळ्यांना भयरहीत केले त्यांनी सगळ्यांना ही शिकवण दीली की तु नेहमी सत्कर्म करत रहा.फळाची अपेक्षा करु नकोस.

नेहमी गरजवंताला अपेक्षारहित मदत करत रहा.त्यातच तुझे कल्याण होणार आहे.स्वामींना जाणिव होती की सत्कर्म करणे म्हणजे खुप अवघड असते त्यात खुप अडचणी येणार म्हणुनच ते सगळ्यांना म्हणायचे 

    *" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."*

याचा अर्थ त्यांनी दीलेली शिकवण नेहमी लक्षात ठेऊन सत्कर्म करत रहा.अडलास तर स्वामी आहेतच.

*सत्कर्म करायचे म्हणजे काय ?*
*गरजवंताला मदत करायची म्हणजे काय ?*

तर सर्वप्रथम तुझातला मी आहे त्याला हटव म्हणजे आपोआपच तुझ्या हातुन सत्कर्म घडायला सुरवात होईल.

लोकांना भयमुक्त करुन त्यांना सत्कर्माच्या मार्गावर चालायला लावले स्वामींनी.
लोकांमधला अहंकार काढुन टाकला स्वामींनी.
एकमेकांना मदत करायची शिकवण दिली स्वामींनी.

*स्वामी :- म्हणजे*

स्वामी  ऊलट करुन बघीतले तर मीस्वा म्हणजेच
तुझ्यातला मी पणाचा अहंभाव जेव्हा तु स्वाहा करशील तेव्हाच तुझे कल्याण होणार आहे.

ह्याची लोकांना त्यांनी जाणिव करुन दीली.

म्हणुनच लोकांनी आपल्यातला मी त्यांच्या चरणी स्वाहा केला.

त्यातुनच पुढे स्वाहा मी स्वाहा मी करत करत लोक त्यांना स्वामी म्हणजे करता करवीता म्हणुन स्वामी असे संबोधु लागले.

असे हे दोन्हीही भगवंताचेच अवतार पण कार्यभाग  वेगवेगळा म्हणुनच कार्भागाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधतात.

*🕉!!  श्री स्वामी समर्थ  !!🕉*
*🕉 !!  ॐ साईनाथाय नमः   !!🕉*

No comments:

Post a Comment