छत्रपती शंभू राजे ll
क्षत्रिय कुलावतंसं, महातेजस्वी,
महापराक्रमी, बुद्धिनिष्ठ, चारित्र्यसंपन्न,
क्षात्रवीर, मुगलसहांरक,रणमर्दविद्वान,
शिवपुत्र संभाजी महाराज ll
सिंहाच्या जबड्यात घालूनिया हात
मोजीत दात ही तर मर्द मराठ्यांची जात ll
तळप तळप तळपते तुझ्या तलवारीची धार
देती सारे झुकून तुला मुजऱ्याचा मान
तू अभिमान तू अभिमान, सकल जणांचा तू अभिमान
भगव्या झेंडयाचा तू अभिमान ll
शंभूराजे, शंभूराजे, शंभूराजे, शंभूराजे ll
घाव घाव शत्रू बस एकच वार
अशी तुझी चाल कापे किल्ले हजार
तू स्वाभिमान, तू स्वाभिमान,
मर्द मराठ्यांचा तू स्वाभिमान ll
मर्दानी तोरा तुझा वाघिणीची कात
फाडूनिया जबडे दात मोजणारी जात
हिंदवी स्वराज्याचा तू राजेशान
भगव्या सेनेचा तू राजेशान ll
No comments:
Post a Comment