*मनोजवम् मारुततुल्यवेगम्,*
*जितेन्द्रियम् बुदि्धमताम् वरिष्ठम् ।।*
*वातात्मजम् वानरयूथमुख्यम्,*
*श्रीरामदूतम शरणम् प्रपद्ये ।।*
--------------s------------------
*अर्थात :*
मनोवेगाने जाणारा, वार्याप्रमाणे वेगवान्, जितेंद्रिय, बुद्धीमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानर समुदायाचा अधिपति आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे.
मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे, हनुमान.
हनुमान हा सर्वशक्तीमान, महापराक्रमी, महाधैर्यवान, सर्वोत्कृष्ट भक्त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणूनही प्रसिद्ध आहे. भाव, भक्ती, शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी असे जीवनाला परिपूर्ण करणारे जे जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे हनुमान.
*हनुमानाची उपासना करण्यापूर्वी वरील मंत्र म्हणून ध्यान करावे.*
यानंतर मारुतीला शेंदूर, रुईची पाने-फुले वहाणे :
ज्या वस्तूंमध्ये देवतेची पवित्रके, म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर साहजिकच देवतेचे तत्त्व मूर्तीमध्ये येते आणि देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो.
शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात.
*मारुतीला फुले वाहाण्याची पद्धत :*
हनुमानाच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, फुलांकडे हनुमानाचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. यानुसार हनुमानाला फुले वहातांना पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांवर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून, ती पाच किंवा पाचच्या पटीत वाहावीत.
*मारुतीच्या पूजेत वापरायच्या उदबत्त्या :*
हनुमानाची पूजा करतांना हनुमानाचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणार्या केवडा, चमेली आणि अंबर या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात. अन्य देवतांप्रमाणेच हनुमानालाही भक्तीच्या पहिल्या टप्प्यात दोन उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे, तर भक्तीच्या पुढच्या टप्प्यात एका उदबत्तीने ओवाळावे. देवाला ओवाळतांना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठा यात धरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी.
*मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत :*
हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. या वेळी हनुमानाची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत, यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्ती अन् कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने हनुमानाच्या सात्त्विक लहरींचा लाभ होतो. काही भाविक देवाला नारळ पूर्णतः अर्पण करतात. नारळ पूर्णतः अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही. यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णतः अर्पण करू नये. त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
*शनिग्रहपीडा निर्मूलनासाठी मारुतीला तेल वाहाणे :*
शनिग्रहपीडा निर्मूलनासाठी हनुमान व सूर्याची आराधना करावी. परंतु शनीची उपासना करू नये. दर्शन घेऊ नये. कारण पौराणिक कथांमध्ये एक अशी कथा आहे , ज्या कथेत हनुमानाने शनि महाराजांचे गर्वहरण केले होते आणि स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी शनि महाराजांनी हनुमानास वचन दिले की “ यापुढे जे भक्त नियमित तुझी सेवा करतात त्यांना मी कधीही त्रास देणार नाही. “ *हनुमानाच्या उपासनेने शनिग्रहपीडाही दूर करता येते. याचा विधी याप्रमाणे आहे.*
एका वाटीत तेल घ्यावे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा चेहरा पहावा. मग ते तेल हनुमानाला वाहावे. एखादी आजारी व्यक्ती जर अनिष्ट शक्तीच्या त्रासामुळे आजारी असल्याने हनुमानाच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही तिने पाहिलेले तेल अन्य व्यक्तीने हनुमानाला वाहिले, तरीही त्याचा परिणाम होतो. तेलात चेहर्याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा अनिष्ट शक्तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल हनुमानाला वाहिल्यावर त्यातील अनिष्ट शक्तीचा नाश होतो.
*मारुतीला वाहायचे तेल घरून घेऊन जाणे :*
हनुमानाला वहायचे असलेले तेल हनुमानाच्या देवळाबाहेर बसलेल्या तेलविक्रेत्याकडून विकत न घेता घरून नेऊन वाहावे. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्ती ज्या अनिष्ट शक्तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेलविक्रेत्याकडून तेल विकत घेऊन ते हनुमानाला वाहात असेल, ती अनिष्ट शक्ती त्या तेलविक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तेल घरून नेऊन वाहावे.
*असुरी त्रासापासून रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना करणे :*
हनुमान हा सर्वशक्तीमान असल्यानेच त्याला भूत, पिशाच, राक्षस, समंध इत्यादी कोणत्याही आसुरी शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते हनुमानाला काही करू शकले नाहीत. आसुरी शक्तींपासून रक्षण होण्यासाठी केलेली हनुमानाची उपासना म्हणूनच विशेष फलदायी ठरते. व्यक्तीला आसुरी शक्तींचा त्रास असल्यास तो दूर होण्यासाठी तिला हनुमानाच्या देवळात नेणे, तिने पाहिलेले तेल अन्य व्यक्तीने हनुमानाला वहाणे, त्रास असणार्या व्यक्तीवरून नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणे, तिला मारुतिस्तोत्र म्हणण्यास सांगणे, तिला हनुमानाचा नामजप करण्यास सांगणे, यांसारखे उपाय करता येतात.
*नारळ उतरवणे आणि तो मारुतीच्या देवळात फोडणे :*
एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास, तो दूर करण्यासाठी त्या व्यक्तीवरून नारळ उतरवावा आणि त्यानंतर तो हनुमानाच्या देवळात फोडावा. व्यक्तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्तीतील अनिष्ट शक्ती नारळात येते. असा नारळ हनुमानाच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी अनिष्ट शक्ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होते.
*मारुतीला प्रदक्षिणा घालणे :*
हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने हनुमानाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.
*मारुतीचा (हनुमंताचा) नामजप :*
*श्री हनुमते नमः ।*
या मंत्राचा यथाशक्ती जास्तीत जास्त जप करणे उत्तम.
देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप. देवतेच्या नामजपाने देवतेचे तत्त्व जास्तीतजास्त ग्रहण होण्यासाठी तसेच भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी नामाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे आवश्यक असते. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते.
*हनुमानाच्या नामजपाचे महत्त्व :*
हनुमानाचा नामजप अखंड करणार्याला हनुमानाची शक्ती अन् चैतन्य अखंड लाभल्याने त्याचे अनिष्ट शक्तींपासून सदैव रक्षण होते; म्हणून हनुमानाचा नामजप हा अनिष्ट शक्तीमुळे होणार्या त्रासांच्या निवारणार्थ करावयाच्या विविध उपायांपैकी सर्वांत प्रभावी उपाय आहे.
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
*श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं*
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें | सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२||
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||
ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, वंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा | वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ||१३||
धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||
॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्
............s........
*तुलसीदासकृत हनुमान चालीसा.*
दोहा
श्रीगुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि।
बरनउँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि विद्या देहु मोहिं, हरहु कलेश विकार।।
चौपाई
जय हनुमान ज्ञान गुन सागर जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥
राम दूत अतुलित बल धामा अंजनि पुत्र पवनसुत नामा॥२॥
महाबीर बिक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी॥३॥
कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुँचित केसा॥४॥
हाथ बज्र औ ध्वजा बिराजे काँधे मूँज जनेऊ साजे॥५॥
शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महा जगवंदन॥६॥
विद्यावान गुनी अति चातुर राम काज करिबे को आतुर॥७॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया॥८॥
सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा बिकट रूप धरि लंक जरावा॥९॥
भीम रूप धरि असुर सँहारे रामचंद्र के काज सँवारे॥१०॥
लाय संजीवन लखन जियाए श्रीरघुबीर हरषि उर लाए॥११॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतहि सम भाई॥१२॥
सहस बदन तुम्हरो जस गावै अस कहि श्रीपति कंठ लगावै॥१३॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहीसा॥१४॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते कवि कोबिद कहि सके कहाँ ते॥१५॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा राम मिलाय राज पद दीन्हा॥१६॥
तुम्हरो मंत्र बिभीषण माना लंकेश्वर भये सब जग जाना॥१७॥
जुग सहस्त्र जोजन पर भानू लिल्यो ताहि मधुर फ़ल जानू॥१८॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं जलधि लाँघि गए अचरज नाहीं॥१९॥
दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥२०॥
राम दुआरे तुम रखवारे होत ना आज्ञा बिनु पैसारे॥२१॥
सब सुख लहैं तुम्हारी सरना तुम रक्षक काहु को डरना॥२२॥
आपन तेज सम्हारो आपै तीनों लोक हाँक तै कापै॥२३॥
भूत पिशाच निकट नहिं आवै महावीर जब नाम सुनावै॥२४॥
नासै रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा॥२५॥
संकट तै हनुमान छुडावै मन क्रम बचन ध्यान जो लावै॥२६॥
सब पर राम तपस्वी राजा तिन के काज सकल तुम साजा॥२७॥
और मनोरथ जो कोई लावै सोई अमित जीवन फल पावै॥२८॥
चारों जुग परताप तुम्हारा है परसिद्ध जगत उजियारा॥२९॥
साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे॥३०॥
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता अस बर दीन जानकी माता॥३१॥
राम रसायन तुम्हरे पासा सदा रहो रघुपति के दासा॥३२॥
तुम्हरे भजन राम को पावै जनम जनम के दुख बिसरावै॥३३॥
अंतकाल रघुवरपुर जाई जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥३४॥
और देवता चित्त ना धरई हनुमत सेई सर्व सुख करई॥३५॥
संकट कटै मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत बलबीरा॥३६॥
जै जै जै हनुमान गोसाई कृपा करहु गुरु देव की नाई॥३७॥
जो सत बार पाठ कर कोई। छूटहिं बंदि महा सुख होई॥३८॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा। होय सिद्धि साखी गौरीसा॥३९॥
तुलसीदास सदा हरि चेरा। कीजै नाथ हृदय मह डेरा॥४०॥
दोहा
*पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रूप।*
*राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥*
♦माहिती संकलन
♦सतिश अलोणी
♦Satishaloni34@gmail.com
No comments:
Post a Comment