नमस्कार श्री गणेश भक्तांनो💐
🚩आज अंगारकी संकष्टी चतुर्थी 🌺
( 🚩सर्व संकटांचा नाश करून इच्छित फळ शीघ्र प्राप्त करून देणारे श्री गणपतीचे व्रत 🚩)
अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रत...🚩🙏🏻
🚩प्रत्येक महिन्यांत दुसर्या पंधरवड्यांत वद्य चतुर्थीच्या दिवशीं "संकष्ट चतुर्थी" असते.
हा श्री गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करून, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळीं श्रीगणपतीचीं पूजा करून, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचें. अशी या व्रताची थोडक्यांत पाळणूक आहे.🙏🏻🚩
"श्री संकष्टहर गणपती" हे या व्रताच्या देवतेचें नांव आहे, हे व्रत करणार्या स्त्री अगर पुरुषानें, व्रताला सुरवात या अंगारकी चतुर्थी पासून किंवा श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशीं करावी.
सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचें उद्यापन करावें.🙏🏻🚩
🚩 कांहींजण इच्छा पूर्ण होईपर्यत तर बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणारांनीं उपोषण सोडवण्यापूर्वी नेहमीं, पुढें दिलेलें
"संकष्ट चतुर्थी माहात्म्य" अवश्य वाचावें.🙏🏻🚩
🚩संकष्ट चतुर्थीचें व्रत करणारानें, त्या दिवशीं पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावीं. दीवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. संध्याकाळीं रात्रौ आवश्यक वाटल्यास आंघोळ करावीं.🙏🏻🚩
🚩नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्यानें भरलेला कलश (तांब्या) ठेवावा; कलशा भोवती दोन वस्त्रें गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यांत "श्रीसंकष्टहर गणपतीचीं" स्थापना करावीं.
(श्रीगणपतीची सोने, चांदी, तांबें वगैरे धातूची मूर्ती अगर तसबीर ) त्याची षोडशोपचारे पूजा करावी.
🚩पूजा करणारानें अंगावर लाल वस्त्र घ्यावें. पूजेत वाहावयाचें "गंध-अक्षता-फूल-वस्त्र" तांबड्य रंगाचें असावें. पूजेत उपचार अर्पण करतांना,
🚩लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरूपाय, नम: म्हणून अक्षता,
सिध्दिप्रदाय नम: म्हणून पुष्प, सर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फळ,
शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र, गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र,
गजमुखाय नम: म्हणून धूप, मूषकवाहनाय नम: म्हणून दीप,
विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून, दक्षिणा अर्पण करावी.🙏🏻🚩
पूजा झाल्यावर पुढील ध्यानमंत्रा म्हणून "श्रीसंकष्टहरगणपतीचें" ध्यान करावें.🌺
🚩रक्तांगं रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै: ॥
क्षीराब्धौ रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थमू ॥
दोर्भि: पाशांकुशेष्टा भयधृतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥
ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेंत प्रसन्नमू ॥
नंतर आपलें संकट निवारण्याची व मनोकामना ( मनांतील इच्छा ) पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. 🙏🏻🚩
🚩मम समस्तविघ्ननिवृत्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थं चतुर्थेसेव्रतांगत्वेन
यथा मीलितोपचार द्रव्यै: षोडशोपचार पूजां करिष्ये ॥
असें म्हणावें.
नंतर पुढें दिलेलें "संकष्ट चतुर्थी माहात्म्य" वाचावें.
२१ मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी.🙏🏻🚩
🚩 आरती झाल्यावर-
अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्यहीनं मया कृतम् ।
तत सर्वं पूर्णतां यातु विप्ररूप गणेश्र्वर ॥
असें म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रदर्शन करून, चंद्राला अर्ध्य, (पाणी) गंध, अक्षता, फूलें वाहून त्याची पूजा करावी. "रोहिणीनाथाय नमः " म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावें. जेवणांत मोदक असावे, गोड पदार्थ असावेत, खारट व आंबट पदार्थ नसावेत. (चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते.) जेवण झाल्यानंतर उत्तरपूजा करून मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.🙏🏻🚩
🚩चला जाणून घेऊ या लेखातून अंगारकी चतुर्थी ची कहाणी 🚩
🚩हा अंगारक कोण ? अंगारक म्हणजे मंगळ .
तो अंगारका सारखा म्हणजेच जळणाऱ्या निखाऱ्यासारखा लाल - लाल दिसतो म्हणून त्याला अंगारक असे म्हणतात . हे मंगळाचे एक नाव आहे . याच्या उत्पत्ती विषयीच्या कथेत भारद्वाज नावाचे ऋषी अवंती नगरात राहात होते त्याचा हा पुत्र असे म्हटले आहे. 💐
🚩हे भारद्वाज ऋषी क्षिप्रा नदीवर स्नानाला गेला असता तिथे सुंदर अप्सरा जलक्रीडा करीत होत्या .
त्यांना पाहिल्यावर ह्या ऋषीच्या मनांत कामवासना निर्माण झाली .
त्या वासने मधून त्यांचा विर्यपात भुमीवर झाला त्यापासून लालभडक अंगकांती असलेला एक पुत्र झाला . तो पुत्र पृथ्वीच्या अंगाखांद्यावर खेळला . भूमातेने त्याचे पालनपोषण केले . 🚩
अशारितीने दिवसाचे दिवस उलटले , वर्षही उलटली .
सात वर्षानंतर त्या भारद्वाज पुत्राने पृथ्वीमातेला विचारले , '' माझ्या त्वचेचा वर्ण इतका लाल का ?''पृथ्वीमातेने त्याला त्याच्या जन्माची कथा सांगितली . 🚩
आपण असे तसे नसून भारद्वाज ऋषीचे पुत्र आहोत
हे कळल्यावर आनंद झालेला तो कुमार भारद्वाज ऋषीं कडे गेला . भारद्वाजांनाही आपला पुत्र आता उपनयना
योग्य झाल्याचे पाहून त्यांना आनंद झाला .
त्यांनी त्याचे शास्त्रशुद्घ व्रतबंधन म्हणजे उपनयन केले आणि त्याला वेदशास्त्रांचे शिक्षण दिले .
उपासनेसाठी म्हणून त्याला गणेशाचा मंत्र दिला .🌺
🚩भारद्वाज पुत्राने गणेशाच्या मंत्राचे अनुष्ठान श्रद्घापूर्वक केले आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणेशाने त्याला ,
' तू मंगळ किंवा अंगारक ह्या नावाने प्रसिद्घ होशील ,' असे सांगितले .🌺
🚩हा अंगारक म्हणजेच आकाशात तळपणारा मंगळ ग्रह होय , अशी श्रद्घा परंपरेने बाळगली जाते . त्याचेच नाव मंगळ . त्याचे भूमातेने पालन केले म्हणून त्याला ' भूमीपुत्र ' किंवा ' भौम ' म्हटले जाते आणि तो चिंता विवंचनांना
नष्ट करणारा , विशेषत : ऋणमोचन करणारा म्हणजे कर्जातून सुटका देणारा असा मानला जातो . ऋणमोचनासाठी , कर्ज फेडण्यासाठी त्याचे अनुष्ठान श्रद्घापूर्वक केले जाते .🌺🚩
🚩 ह्या अंगारक चतुर्थीला उपास केल्यानंतर ११ किंवा २१ संकष्टीचे उपवास केल्याचे पुण्य मिळते , असे महत्त्व या अंगारकी चतुर्थीचे आहे 🌺
🚩आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वानीं करावयाचें, हे एक साधें, सोपें पण शीघ्र फलदायीं व्रत आहे.🚩
श्रावण महिन्यांतील संकष्ट चतुर्थी व आज मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायीं व महत्वाची मानतात. प्रत्येकानें निदान वर्षांतून या दोन संकष्ट्या तरी अवश्य कराव्या.🚩
माहिती संकलन 🚩
श्री . आनंद राजेंद्र मुळे🚩
नमस्कार सेवेकरी हो 🙏🏻
सर्व सेवेकरी भक्तांनी अवश्य लाईक आणी शेअर करा आपल्या स्वामी माऊलीचे अत्यंत सुंदर पेज "ब्रह्मांडनायक" 🚩
👆🏻👆🏻
https://mbasic.facebook.com/Anandrmuley/?_ft_=top_level_post_id.1247241305370798%3Atl_objid.1247241305370798%3Athid.487114884716781%3A306061129499414%3A69%3A0%3A1485935999%3A2480380683702730331&__tn__=C
👆🏻 ब्रह्मांडनायक 🚩
सर्वांना शुभ दिन🚩
🚩 ॐ गं गणपतये नमः 🌺
🚩 बोला गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩
🚩ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 💐
No comments:
Post a Comment