-🌹 *॥ श्रीअनघादत्तव्रत ॥* 🌹
"ॐ श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयाय नम:"
"ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः"
॥अनघालक्ष्मी॥
परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे.श्री दत्तगुरुंचे तत्व कल्पनातीत आहे अवधूत स्वामींच्या रुपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तींचे एक गृहस्थ रुप पण आहे.स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघस्वामी किंवा अनघास्वामी म्हणून ओळखले जातात.त्यांच्या पत्नीचे नांव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे.हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख, तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात.अनघ दंपतिची उपासना पद्धती,कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तर्वीर्यार्जुनाला स्वतः सांगितली.ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे.त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले.या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीहा आहे.पण कोणत्याही अष्टमीला केले तरी चालते.अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन,मन, वाचा, कर्म द्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो.या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्यारुपात येते.अशा पापांना दूर करणारे, जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.|| जय गुरु दत्त ||श्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले ॥ श्रीअनघादत्तव्रत ॥
सर्व स्त्री-पुरुषांनां संतती, संपत्ती, विवाहसौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्धव्रत. अनघाष्टमीव्रत श्रीदत्तसंप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे. फारच कमीजणांना त्याची माहिती आहे.
*॥ श्री अनघादत्तव्रताची माहिती ॥*
*व्रत कोणी व केव्हा करावे* :-
मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस( किंवा शुद्धाष्टमीस ) " अनघाष्टमी" मानुन सकाळी हे व्रतकरावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुन करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे.
*हे व्रत का करावे* :-
ही अष्टमी 'अघ म्हणजे पाप' नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्याने पापनिरसन व दारिद्रनाश होऊन त्याला दैवीसंपत्ती, अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्वपुण्यकर्मफळांची प्राप्तीहोते. मनोकानापूर्ती व निर्मलकीर्तीलाभ होतो. सर्व रोगनिरसन होऊन, सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो. स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते, तसेच गृहकलहनिवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो.
*व्रताची मांडणी* :-
घराची जमीन ( जाडेमीठ, हळद, गोमुत्र किंवा हिंग, गुलाबपाणी ) स्वच्छकरुन घ्यावी.यानंतर स्नानकरुन, नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा सुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालुन, त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालुन पूर्वेपासून आठ दिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेऊन, त्याला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी-नाणे व आंब्याचा डहाळा घालावा, त्याव्र तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी,या दत्तपीठाच्या डावीकडे ( आपल्या उजव्या हातास ) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे ( २ पाने, १ नाणे, १ सुपारी म्हणजे एक विडा ) केळे, फळ इ. मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे.
*व्रतसूत्र :-*
श्रीअनघदत्तात्रेयांच्या मुर्तीजवळ लालदोरा ( व्रतसुत्र ) ठेवावा. ( व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगेसोयर्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत, व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणुन अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमी पूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे.)
*व्रतपूजा :-*
यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीअनघादत्ताचे आवाहन करावे, कलशाभोवती आठ दिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥
या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ. देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़ळ्सीपत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे.
*"ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः"*
No comments:
Post a Comment