ओव्या……………..
May 31, 2011
जात्यावरच्या माझ्या ओव्या……………..
पहिली माझी ओवी ग, विघ्नहर्त्या गणरायाला
नमनाने सुरुवात करते मी, जात ते दळायला !
दुसरी माझी ओवी ग, कुलस्वामिनी अंबेला |
माय भवानी अंबा ती, प्रसन्न होवो आम्हाला||
तिसरी माझी ओवी ग, कुलदेवता खंडेरायाला !
सेवा माझी स्वीकार कर, आयुष्य दे घरधन्याला !!
चौथी माझी ओवी ग ,माझ्या काळ्या आईला
जननी जन्मभूमी माझी, अभिमान सार्थ जाहला !!
पाचवी माझी ओवी ग, सये तुझ्या संगे ग!
मैत्रीच्या या कट्यावर, गुंफ़ु काव्य माला ग!
सहावी माझी ओवी ग, दैवी पंचतत्वाला
ज्याने जनम दिला,जगविला त्या शक्तीला !!
सातवी ओवी तुज समर्पित श्याम
गुंफ़ीन गीत ओवीत करिते काम !!
गोविंद गोविंद ,भजे मी गोविंद
फ़लं,पुष्पं,नेवैद्यं,अर्पिते तुज पदं!!
आजचे दळण संपले, वळण संपले
संसार सुप्रभात सुंदर सुरु जाहले !!
No comments:
Post a Comment