Thursday, 25 May 2017
लसणाचे औषधी उपयोग
लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्वरुपात वापरण्यात येत आहे
१) कॉलेस्ट्रॉल कमी करतो
कॉलेस्ट्रॉलची समस्या असणार्या लोकांसाठी लसणाचे नियमित सेवन अमृत ठरू शकते. कॉलेस्ट्रॉलची समस्या असणार्या लोकांसाठी लसुन संजीवनीपेक्षा कमी नाही. नियमित याचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी १२ टक्क्यांनी कमी होते. हृदयाचे आजार लसणाच्या नियमित सेवनाने दूर राहतात.
२) लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयु्क्त गूण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. ऍन्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.
३) रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.
४) वजन घटविण्यात लसूण गूणकारी आहे. शरिरातील वसा कोशिकांना विनियमित करण्याची क्षमता लसणात आहे. त्यामुळे वजन कमी होते.
५) लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.
६) सर्दी, खोकला – बदलत्या वातावरणात कोणत्याही वयाच्या व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप हे आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही लसणाचे नियमित सेवन केले तर या छोट्या-छोट्या आजारांपासून दूर राहाल.
७) एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल.
८) कॅन्सरपासून संरक्षण होते – कॅन्सरला बरा न होणारा आजार मानले जाते. परंतु आयुर्वेदानुसार रोज थोड्या प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता ऐंशी टक्के कमी होते. लसानामध्ये कॅन्सर विरोधी तत्व आहेत.लसणाच्या सेवनाने ट्युमरला पन्नास ते सत्तर टक्के कमी केले जाऊ शकते.
९) दमा दूर करण्यासाठी उपयुक्त – दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.
१०) गर्भवती महिलांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे.
११) दात दुखीमध्ये लाभदायक – लसणाच्या सेवनाने दात दुखीमध्ये आराम मिळतो. लसुन आणि लवंग एकत्र वाटून घ्या आणि तयार झालेले मिश्रण दुखणाऱ्या दातावर लावल्यास आराम मिळेल.
No comments:
Post a Comment