Tuesday, 6 June 2017

जय मल्हार

► कडेपठारचा राजा मार्तंड माझा◄
पुण्यनगरी दक्षिण दिशेसी
मल्हारी वस्तीस जयाद्री गडासी
सदा भरतो दास-भक्ताचा मेळा
देवाच्या अंगी शोभे लाल शेला
सदा भंडार-खोबर्याचा भडीमार
बेल दवणा पुष्प करती कुलाचार
बानु म्हाळसा नारं देवासोबती
गळ्यात माळ फुलाई घालती
करी नित्य आपुल्या भक्ताचा संभाळ
मालुचे नाम बहु आहे मधाळ
देवाचा सोहळा निघे सोमवती
कह्रे प्रती जाउनी रंभाईस भेटती
मल्हार मल्हार वाचे घोकसी
जन्म मरणाचा फेर्यातुन सुटसी

जय मल्हार

No comments:

Post a Comment