👉 _*बहुमुल्य मेथी खाणे फायदेशीर...*_
मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. चला तर मग बहुमुल्य मेथी खाल्याने काय-काय फायदे होतात ते जाणून घेऊया
1) मेथीचे पान लिव्हच्या फंक्शनला योग्य ठेवण्यासोबतच अपचनाच्या समस्येला दूर करतात. गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर जेवणात मेथीची पाने घ्या.
2) डायरिया आणि डिसेंट्रीच्या इलाजामध्ये देखील मेथी खाणे चांगले असते. मेथी आतड्यांना डिटॉक्स करण्याचे काम करते.
3) एखादी अॅलर्जी असो किंवा श्वास घेण्यात समस्या, मेथी सर्व प्रकारच्या रोगांना दूर करण्यात मदत करते.
4) वाढत्या कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल तर मेथी सर्वात चांगला उपाय आहे. मेथीची पाने रात्रभर पाण्यात भीजवून ठेवा आणि सकाळी याचा ज्यूस बनवून प्या.
5) मेथी आणि दालचीनीमध्ये एक समान तत्त्व मिळतात. यांचे अँटी-बायोटिक तत्त्व बॉडीच्या ग्लूकोज लेव्हलला वाढू देत नाही. यासाठी टाइप-2 डायबिटीजच्या रुग्णांना मेथीची पाने खाने फायदेशीर असते.
6) मेथीमध्ये उपलब्ध ग्लेक्टोमेनन, हार्टला हेल्दी ठेवण्याचे काम करते. यासोबतच यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. जे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरला कंट्रोल करते. ज्यामुळे हाय आणि लो बीपी होत नाही.
7) मेथीचे बीज आणि पाने फायबर आणि अँटी-ऑक्सीडेंटने भरपूर असतात. जे खाल्ल्याने शरीरातील घाण बाहेर पडते. पोट दुखी किंवा डायजेशन खराब झाल्यावर मेथीची पाने चहामध्ये मिळवून घ्या, आराम मिळेल.
8) मेथीच्या पानांना रात्रभर पाण्यात भीजवून ठेवून याचे पाणी सेवन केल्याने बध्दकोष्ठची समस्या दूर होईल.
9) जर लठ्ठपणा कंट्रोल होत नसेल तर सकाळी उपाशीपोठी मेथीचे बीज खाणे सुरु करा. यातील फायबर तत्त्व पोट भरलेले असल्याचा अनुभव देते. ज्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही आणि वजन हळुहळू कमी होते.
10) अॅसीडीटीच्या समस्येवर मात करण्यासाठी जेवणात मेथीचा वापर हवा. मेथीची पाने पाण्यात भीजवून थोडा वेळानंतर याचे सेवन करा.
11) एक चमचा मेथी लिंबू आणि मधासोबत खा, यामुळे बॉडीला न्यूट्रिशन मिळते आणि ताप कमी होतो.
12) कफ आणि घसा दुखण्याची समस्या दूर करण्यासाठी देखील मेथी फायदेशीर आहे.
13) जेवणात जेवढा शक्य होईल तेवढा मेथीचा वापर करा. कारण याचे फायबर तत्त्व बॉडीला डिटॉक्स करण्याचे काम करते. ज्यामुळे कोलन कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
14) व्हिटॅमिन सी खुप चांगले अँटी-ऑक्सीडेंट असते. यासोबतच याचा अँटी-इन्फ्लेमेटरी गुण अनेक प्रकारचे स्किन प्रॉब्लम दूर करण्यात मेथी मदत करते. हे चेहर्यावरील डाग दूर करुन चेह-याचा रंग उजळवते.
15) सुज येण्याची समस्या असेल तर मेथीला पाण्यात भीजवा आणि कपड्यात बांधून ठेवा, हे सुज आलेल्या ठिकाणी लावा. नक्की फायदा होतो.
16) मेथीचा फेसपॅक वापरल्याने चेहर्यावरील पिंपल्स, रिंकल्स आणि ब्लॅकहेड्स दूर करता येतात. यासाठी मेथीची पाणे पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुवा. याव्यतिरिक्त मेथीच्या पानांची पेस्ट बनवून 20 मिनिटांपर्यंत चेह-यावर लावून ठेवा. चेह-यावर एक वेगळीच चमक येईल.
17) डाएटमध्ये मेथीचे पान घ्या आणि मेथीची पेस्ट केसांच्या मुळांना लावा. असे केल्याने केस काळे, दाट आणि चमकदार होतील. मेथीचे बीज रात्रभर तेलात भीजवून ठेवा आणि याने सकाळी मालिश करा. खुप लवकर आराम मिळेल.
18) मेथीचा वापर प्रेग्नन्सीच्या काळात होणार्या लेबर पेनपासुन आराम देतो. परंतु खुप जास्त खाल्ल्याने मिसकरेज आणि प्री मॅच्योर बेबी होण्याची शक्यता असते. यामुळेच याकाळात मेथीचा खुप जास्त वापर करण्यापासुन वाचले पाहिजे.
No comments:
Post a Comment