---------------------------------
*नवदुर्गांची औषधी रूपे*
---------------------------------
आपल्या भारतात हजारो वर्षांपासून ‘शक्तीदेवतेची’ उपासना प्रचलित आहे. नवरात्रीकाळात ‘आदिमायेच्या’ मुख्यतः ‘श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती’ या तीन रूपांची उपासना करून शक्ती प्राप्त करून घेण्याची प्रथा आजही आहे. त्याचप्रमाणे ‘जगदंबा दुर्गा मातेची’ नवशक्तींनी युक्त असणारी ‘नवरात्रीतील नऊ रूपे’ मनुष्याला शांती, सुख, वैभव, निरोगी काया देणारी तर भौतिक, आर्थिक इच्छा पूर्ण करणारी आहेत. त्याचबरोबर ही नवदुर्गांची नऊ रूपे ‘औषधांच्या रूपातही’ कार्य करतात. म्हणूनच नवदुर्गांची नवरात्र ही
*‘आरोग्यदायी नवरात्र’ म्हणूनही ओळखली जाते.*
नवदुर्गांच्या औषधी रूपांच्या या पद्धतीला सर्वप्रथम “मार्कण्डेय चिकित्सा पद्धती’च्या रूपामध्ये दाखविले गेले होते. पण ही पद्धत गुप्तच राहिली. या चिकित्सा पद्धतीच्या रहस्याला “ब्रह्मदेवांनी” आपल्या उपदेशात “दुर्गाकवच’ म्हटले आहे. या प्रमाणे नवदुर्गा वास्तवात दिव्य गुणांनी युक्त नऊ औषधेच आहेत. भक्तांची जिज्ञासा संतुष्ट करण्यासाठी नवदुर्गांची औषधी रूपे पुढीलप्रमाणे देत आहे –
*1) भय दूर करणारी शैलपुत्री :*
दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री “हिरडा औषधी’ मानले गेले आहे. या भगवती देवी शैलपुत्रीला “हिमावती हिरडा’ म्हटले जाते. ही आयुर्वेदाची प्रधान औषधी आहे. तिचे कार्यप्रकार असे आहेत- अ) हरितिका (हरी)- जी भय दूर करणारी आहे, आ) पथया- जी हित करणारी आहे, इ) कायस्थ- जी शरीराला सुदृढ करणारी आहे, ई) अमृता- जी अमृतासारखी आहे, उ) हेमवती- जी हिमालयावर असणारी आहे, ऊ) चेतकी- जी चित्ताला (मनाला) प्रसन्न करणारी आहे, ए) श्रेयसी- जी यशदाता आहे, ऐ) शिवा – जी कल्याणकारी आहे. यामुळेच प्रत्येकाने हिरडा या वनस्पतीचा औषधात उपयोग करून शैलपुत्री देवीची उपासना केली पाहिजे.
*2) स्मरणशक्ती वाढविणारी ब्रह्मचारिणी :*
दुर्गेचे दुसरे रूप- ब्रह्मचारिणी “ब्राह्मी औषधी’ मानले गेले आहे. ब्राह्मी आयुष्य वाढविणारी, स्मरणशक्ती वाढविणारी, रूधिर रोगांचा नाश करण्याबरोबरच स्वराला मधुर करणारी आहे. ब्राह्मीला सरस्वतीसुद्धा म्हटले जाते. कारण ही औषधी मन तसेच मस्तिष्कात शक्ती प्रदान करते. ही औषधी वायू विकार आणि मूत्रासंबंधीच्या रोगांचे प्रमुख औषध आहे. हे मुत्राद्वारा रक्तविकारांना बाहेर काढण्यास उत्तम औषध आहे. अतः या रोगांनी पिडीत असणाऱ्यांनी ब्राह्मी ही औषधी वापरून ब्रह्मचारिणी या देवीची आराधना केली पाहिजे.
*3) हृदय रोगाला ठीक करणारी चंद्रघंटा :*
दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा “चंद्रशूर किंवा चमसूर औषधी’ मानले गेले आहे. याचे रोप धन्याच्या रोपाप्रमाणे दिसते. चंद्रशूर या रोपाच्या पानांची भाजी बनवली जाते. ही औषधी कल्याणकारी आहे. या औषधाने लठ्ठपणा दूर होतो. यामुळे या औषधीला चर्महन्ती सुद्धा म्हणतात. ही औषधी शक्तीवर्धक तसेच हृदय रोगाला ठीक करणारी आहे. म्हणून हे आजार असणाऱ्यांनी या औषधी वनस्पती रूपाचा वापर करून चंद्रघंटा देवीची पूजा केली पाहिजे.
*4) रक्त विकाराला ठीक करणारी कुष्माण्डा :*
दुर्गेचे चौथे रूप कुष्माण्डा “कुष्मांड किंवा कोहळा औषधी’ मानले गेले आहे. कोहळा या औषधीने पेठा ही मिठाई बनते. हा कोहळा पुष्टिकारक वीर्याला बल देणारा व रक्ताच्या विकारांना ठीक करतो. तसेच पोट साफ करणारा आहे. मन खचलेल्या व्यक्तीला हे औषध अमृतच आहे. हे शरीरातील सर्व दोषांना दूर करून हृदय रोगाला ठीक करते. कोहळा रक्तपित्त तसेच वायूविकार दूर करतो. हा दोन प्रकारचा असतो. या आजारांनी पीडित व्यक्तींनी पेठ्याचा किंवा कुष्माण्ड पाकाचा उपयोग करून घेऊन कुष्माण्डा देवीची उपासना करावी.
*5) कफ रोगाचा नाश करणारी स्कंदमाता :*
दुर्गेचे पाचवे रूप- स्कंदमाता “अलसी किंवा जवस औषधी’ मानले गेले आहे. या देवीला पार्वती किंवा उमा म्हणतात. जवस ही वात, पित्त, कफ रोगांचा नाश करणारी औषधी आहे. या आजाराच्या पीडित व्यक्तींनी या जवस औषधीचा वापर करून स्कंदमाता देवीची आराधना करावी.
*6) कंठ रोगाचे शमन करणारी कात्यायनी :*
दुर्गेचे सहावे रूप कात्यायनी “मोइया किंवा अंबाडी औषधी’ मानले गेले आहे. ही आयुर्वेदिक औषधी कितीतरी नावांनी ओळखली जाते. जसे अंबा, अंबालिका, अंबिका तसेच हिला अंबाडी किंवा मोइया अर्थात माचिका सुद्धा म्हमतात. ही औषधी कफ, पित्त प्रधान विकार तसेच कंठ रोगांचा नाश करते. या रोगाच्या पीडित व्यक्तींनी अंबाडी औषदीचा वापर करून कात्यायनी देवीची उपासना केली पाहिजे.
*7) मस्तिष्क विकारांचे हरण करणारी कालरात्री :*
दुर्गेचे सातवे रूप कालरात्री “नागदवण औषधी’ मानले गेले आहे. सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करणारी, सर्वत्र विजय प्राप्त करून देणारी, मन एवं मस्तिष्काचे सर्व विकार दूर करणारी औषधी आहे. या औषधीच्या रोपाला आपल्या घराभोवती लावल्याने घरातील सारे कष्ट दूर होतात. ही सुख देणारी तसेच सर्व विषांचा नाष करणारी औषधी आहे. यासाठी या कालरात्रीरी देवीची उपासना करून तिच्या औषधी रूपाचे सेवन प्रत्येक पीडित व्यक्तींनी केले पाहिजे.
*8) रक्तशोधक महागौरी :*
दुर्गेचे आठवे रूप महागौरी “तुळस औषधी’ मानले गेले आहे. या महागौरीला औषधीच्या रूपात प्रत्येकजण ओळखते कारण या औषधीचे नाव तुळस आहे, जी प्रत्येक घरात लावली जाते. तुळस ही वनस्पती सात प्रकारची असते- पांढरी, काळी, मरुता, दवना, कुढेरक, अर्जक, षटपत्र. ही सर्व प्रकारची तुळस रक्त शुद्ध करते. त्यामुळे ही रक्तशोधक असून हृदयरोगाचा नाश करणारी आहे. या तुळशीचा वापर प्रत्येकाने करून महागौरीची उपासना केली पाहिजे.
*9) बलबुद्धि वाढविणारी सिद्धिदात्री :*
दुर्गेचे नववे रूप- सिद्धिदात्री “शतावरी औषधी’ मानले गेले आहे. हिला नारायणी किंवा शतावरी म्हणतात. शतावरी वनस्पती बुद्धिबलवर्धक तसेच वीर्यासाठी उत्तम औषधी आहे. रक्तविकार तसेच वातपित्त शोधनाशक आहे. हृदयाला बळ देणारी महाऔषधी आहे. जो मनुष्य शतावरी वनस्पतीचे नियमपूर्वक सेवन करतो त्याचे सर्व कष्ट स्वतःहून दूर होतात. म्हणून वरील रोगांपासून दूर राहण्यासाठी या वनस्पतीचे सेवन करून सिद्धिदात्री देवीची आराधना केली पाहिजे.
याप्रकारे प्रत्येक देवी आयुर्वेदाच्या भाषेप्रमाणे- मार्कण्डेय पुराणानुसार नऊ औषधींच्या रूपात मनुष्याच्या प्रत्येक आजाराला ठीक करून योग्य रक्ताभिसरण अर्थात रक्त शुद्ध करून मनुष्याला स्वस्थ ठेवते. म्हणूनच प्रत्येक मानवाने या नवदुर्गा देवींची आराधना करून औषधी रूपात सेवन केले पाहिजे.
(सूचना : वाचकांना नम्र विनंती आहे की, वरील लेखात दिलेल्या औषधी वनस्पती स्थानानुसार बदलत असतात. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांचा वापर करावा.)
लेखक :- विवेक वि. सरपोतदार
लेखक भारतीय विद्येचे (Indologist) व आयुर्वेद अभ्यासक
-------------------------------------------------
*संकलन* :- *अरुण पेडणेकर.* *गिरगांव. मुंबई.४.*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
No comments:
Post a Comment