ब्रह्मादिक वांदिली जयाला वेदांनी स्तविला
तो हा गणपती मी नमिला ।। धृ ।।
दुर्वांकुर मस्तकी विलसती
शमीपत्रे त्या बहु आवडती
रक्तवर्ण कुसुमांच्या कंठी रुळली सुमनाला ।। १ ।।
सर्वांगावरी उठी शेंदुरी
गंडस्थळी ते गंध केशरी
पायी घागर्या पीतांबर तो कोससी कसला ।। २ ।।
नाग यज्ञोपोवीत मिरवले
शुभ्र वस्त्र तनुवरी शोभले
भक्तासाठी करी जयाने पाशांकुरा धरिला ।। ३ ।।
कार्यारंभी तया पूजिती
विघ्नहारी हा मंगलमूर्ती
शुभंकारक निर्विघ्न करुनिया सफल करी कार्याला ।। ४ ।।
ॐकारचीतो तया पासुनी
असे उपजले देव ते तिन्ही
शब्दब्रह्म तो तयापासुनी अद्याक्षरमाला ।। ५ ।।
तो विघ्नेश्वर, बुद्धीसागर,
कलागुणाधिपतीतो सुखकारक,
वरदविनायक दया करो मजप्रती
कृपादृष्टी मग त्याची होता, काय उणे आम्हाला ।। ६ ।।
No comments:
Post a Comment