।। हरिहर स्तोत्र ।।
हरि” का अर्थ विष्णु भगवान जी से है और “हर” का अर्थ शिव से है. इस स्तोत्र में दोनों का वर्णन किया गया है.
गोविन्दमाधवमुकुन्दहरेमुरारे ! शंभो ! शिवेश ! शशिशेखर ! शूलपाणे !
दामोदराच्युत ! जनार्दन ! वासुदेव ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।1।।
गंगाधरान्धकरिपो ! हर ! नीलकंठ ! वैकुंठ ! कैटभरिपो ! कमठाब्जपाणे !
भूतेश ! खण्डपरशो ! मृड ! चण्डिकेश ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।2।।
विष्णो ! नृसिंह ! मधुसूदन ! चक्रपाणे ! गौरीपते ! गिरिश ! शंकर ! चन्द्रचूड !
नारायणासुरनिबर्हण ! शांर्गपाणे ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।3।।
मृत्युंजयोग्रविषमेक्षण ! कामशत्रो ! श्रीकान्त ! पीतवसनाम्बुदनीलशौरे !
ईशान ! कृत्तिवसन ! त्रिदशैकनाथ ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।4।।
लक्ष्मीपते ! मधुरिपो ! पुरुषोत्तमाद्य ! श्रीकंठ ! दिग्वसन ! शांतपिनाकपाणे !
आनंंदकंद ! धरणीधर ! पद्मनाभ ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।5।।
सर्वेश्वर ! त्रिपुरसूदन ! देवदेव ! ब्रह्मण्यदेव ! गरुड़ध्वज ! शंखपाणे !
त्र्यक्षोरगाभरणबालमृगांकमौले ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।6।।
श्रीरामराघवरमेश्वर ! रावणारे ! भूतेश ! मन्मथरिपो ! प्रमथाधिनाथ !
चाणूरमर्दनहृषीकपते ! मुरारे ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।7।।
शूलिन ! गिरिश ! रजनीशकलावंतस ! कंसप्रणासन ! सनातन ! केशिनाश !
भर्ग ! त्रिनेत्र ! भव ! भूतपते ! पुरारे ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।8।।
गोपीपते ! यदुपते ! वसुदेवसूनो ! कर्पूरगौर ! वृषभध्वज ! भालनेत्र !
गोवर्द्धनोद्धरण ! धर्मधुरीण ! गोप ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।9।।
स्थाणो ! त्रिलोचन ! पिनाकधर ! स्मरारे ! कृष्णानिरुद्ध ! कमलाकर ! कल्मषारे !
विश्वेश्वर ! त्रिपथगार्द्रजटाकलाप ! त्याज्या भटा य इति सन्ततमामनन्ति ।।10।।
अष्टोत्तराधिकशतेन सुचारुनाम्नां संदर्भितां ललितरत्नकदम्बकेन ।
सन्नायकां दृढगुणां द्विजकंठगां य:कुर्यादिमां स्रजमहो स यमं न पश्येत ।
इत्थं द्विजेन्द्रनिजभृत्यगणान सदैवसंशिक्षयेदवनिगान्सहि धर्मराज: ।
अन्येsपिे ये हरिहरांकधराधरायां ते दूरत:पुनरहो परिपर्जनीया: ।।
अगस्तिउवाच
यो धर्मराजरचितां ललितप्रबन्धां नामावलीं सकलकल्मषबीजहन्त्रीम ।
धीरोsत्र कौस्तुभभृत: शशिभूषणस्य नित्यं जपेत्स्तनरसं स पिबेन्न मातु : ।।
इति श्रृण्वन्कथां रम्यां शिवशर्मा प्रियेsनघाम ।
प्रहृष्टवक्त्र: पुरतो ददर्शाप्सरसां पुरीम ।।
श्री हरिहराष्टोत्तरशतनाम स्तोत्रम समाप्तम
।। काकाड आरती।।
उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित।। गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत।।1।।
उठा उठा हो वेगेंसीं। चला जाऊं राऊळासी।। हरतिल पातकांच्या राशी। कांकड आरती पाहोनी ।।धृ।।
उठोनियां हो पाहाटें । पाहा विठ्ठल उभा विटे।। चरण तयाचे गोमटे। अमृतदृष्टीं अवलोका।।2।।
जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निजसुरा।। देगें निंबलोण करा। दृष्ट होईल तयासी।।3।।
पुढें वाजंत्री । ढोल दमामे गर्जती।। होत कांकड आरती । माझ्या पंढरीरायाची।।4।।
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।। केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ।।5।।
।। श्रीपांडुरंगाष्टकम् ।।
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीद्रैः ।
समागत्य तिष्टंतमानंदकदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ १ ॥
तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।
वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ २ ॥
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात्
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ३ ॥
स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।
शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ४ ॥
शरचंद्रबिबाननं चारुहासं लसत्कुंडलक्रान्तगंडस्थलांगम् ।
जपारागबिंबाधरं कंजनेत्रम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ५ ॥
किरीटोज्ज्वलत्सर्वदिक् प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरमर्घ्यैः ।
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ६ ॥
विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।
गवां वृंदकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ७ ॥
अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ८ ॥
स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।
भवांबोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले हरेरालयं शाश्र्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥
॥ इति श्री परम पूज्य शंकराचार्यविरचितं श्रीपांडुरंगाष्टकं संपूर्णं ॥
।। मराठी संक्षिप्त अर्थः।।
भीमानदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रांत पुंडरीकाला वर देण्याकरीता श्रेष्ठ मुनींनसह येऊन तिष्टत असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
ज्याची वस्त्रे विद्दुलतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत, ज्याची अंगकांती नीळ्यामेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ व भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा आहे अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
त्याला अनन्यभावाने शरण येणार्या भक्तांना भवसागर हा फक्त कमरेइतकाच खोल आहे. तो सहज पार करता येतो. हे सांगण्याकरता त्याने कमरेवर हात ठेवले आहेत. ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक दूर नाही हे दाखवण्यासाठी त्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
आपल्या गळ्यांत कौस्तुभमणी घातल्याने जो अतिशय शोभून दिसत आहे, ज्याच्या बाहूंवर केयूर म्हणजे बाजुबंद शोभत आहेत, ज्याच्याजवळ श्री म्हणजे लक्ष्मीचा निवास आहे. जो लोकांचा पालनकर्ता आहे, अशा त्या परम शांत मंगलमय सर्वश्रेष्ठ व स्तुति करण्यास योग्य असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
शरदऋतूंतील चंद्रबिम्बाप्रमाणे अत्यंत रमणीय मुख असलेल्या, मुखावर सुंदर हास्य विलसत असलेल्या, कानांत कुंडले घातल्याने त्यांची शोभा गालावर झळकत असलेल्या, आोठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण असलेल्या व कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
ज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या प्रभेने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, दिव्य आणि अमूल्य रत्ने अर्पण करुन देव ज्याची पूजा करतात, बाळकृष्णरुपाने जो तीन ठिकाणी वाकून उभा आहे, ज्याच्या गळ्यांत वनमाला व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे त्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
सर्व विश्र्व व्यापून राहणार्या, वेणु वाजवीत वृन्दावनात फिरणार्या, ज्याचा कोणाला अतं लागत नाही, लीलेने गोपवेष धारण केलेल्या, गायींच्या कळपाला आनंद देणार्या मधुर हास्य करणार्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
ज्याला जन्म नाही, जो रुक्मीणीचा प्राणाधार आहे, भक्तांसाठी परम विश्रामधाम व शुद्ध कैवल्य असलेल्या, जागृति, स्वप्न व सुषुप्ति किंवा बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या तीनही अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
अत्यंत पुण्यदायक असलेले, पांडुरंगाचे हे स्तोत्र जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठण करतील ते सर्वजण अन्तकाळी भवसागर सहजपणे तरुन जातील आणि त्यांना परब्रह्मस्वरुप श्रीहरीच्या-पांडुरंगाच्या शाश्र्वत स्वरुपाची प्राप्ती होईल.
अशा रीतीने परम पूज्य शंकराचार्यांनी रचिलेले हे पांडुरंगाष्टकं पुरे झाले.
।। श्रीविठ्ठलकवचम् ।।
सूत उवाच ।
शिरो मे विष्ठलः पातु कपोलं मुद्गरप्रियः ।
नेत्रयोर्विष्णुरूपी वैकुण्ठो घ्राणमेव च ॥ १॥
मुनिसेव्यो मुखं पातु दन्तपङ्क्तिं सुरेश्वरः ।
विद्याधीशस्तु मे जिह्वां कण्ठं विश्वेशवन्दितः ॥ २॥
व्यापको हृदयं पातु स्कन्धौ पातु सुखप्रदः ।
भुजौ मे नृहरिः पातु करौ च सुरनायकः ॥ ३॥
मध्यं पातु सुराधीशो नाभिं पातु सुरालयः ।
सुरवन्द्यः कटी पातु जानुनी कमलासनः ॥ ४॥
जङ्घे पतु हृषीकेशः पादौ पातु त्रिविक्रमः ।
निखिलं च शरीरं मे पातां गोविन्दमाधवौ ॥ ५॥
अकारो व्यापको विष्णुरक्षरात्मक एव च ।
पावकः सर्वपापानामकाराय नमो नमः ॥ ६॥
तारकः सर्वभूतानां धर्मशास्त्रेषु गीयते ।
पुनातु विश्वभुवनं तोङ्काराय नमो नमः ॥ ७॥
मूलप्रकृतिरूपा या महामाया च वैष्णवी ।
तस्या बीचेन संयुक्तयकारायनमो नमः ॥ ८॥
वैकुण्ठाधिपतिः साक्षाद्वैकुण्ठपददायकः ।
वैजयन्तीसमायुक्तो विकाराय नमो नमः ॥ ९॥
स्नातः सर्वेषु तीर्थेषु पूतो यज्ञादिकर्मसु ।
पावनो द्विजपङ्क्तीनां ठकाराय नमो नमः ॥ १०॥
वाहनं गरुडो यस्य भुजङ्गः शयनं तथा ।
वामभागे च लक्ष्मीश्च लकाराय नमो नमः ॥ ११॥
नारदादिसमायुक्तं वैष्णवं परमं पदम् ।
लभते मानवो नित्यं वैष्णवं धर्ममाश्रितः ॥ १२॥
व्याधयो विलयं यान्ति पूर्वकर्मसमुद्भवाः ।
भूतानि च पलायन्ते मन्त्रोपासकदर्शनात् ॥ १३॥
इदं षडक्षरस्तोत्रं यो जपेच्छ्रद्धयान्वितः ।
विष्णोस्सायुज्यमाप्नोति सत्यं सत्यं न संशयः ॥ १४॥
इति श्रीपद्मपुराणे विठ्ठलकवचं सम्पूर्णम् ।
एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांत एकादशीचे व्रत केले जाते. या व्रताचे महत्त्व आणि त्याचे प्रकार यांविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.
देवता
एकादशी या व्रताची देवता श्रीविष्णु आहे .
प्रकार
एकादशीचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. ज्या वेळी एका पक्षात हे दोन भेद संभवतील, त्या वेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसर्या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते. शैव लोक स्मार्त एकादशी, तर वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात. प्रत्येक मासात दोन, याप्रमाणे वर्षात चोवीस एकादश्या येतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
मासातील दोन्ही एकादश्या करणे उत्तम; पण ते शक्य नसल्यास निदान शुद्ध एकादशी तरी करावी.
मास
शुक्ल पक्ष
कृष्ण पक्ष
चैत्र कामदा वरूथिनी
वैशाख मोहिनी अपरा
ज्येष्ठ निर्जला योगिनी
आषाढ शयनी कामिका
श्रावण पुत्रदा अजा
भाद्रपद परिवर्तिनी इंदिरा
आश्विन पाशांकुशा रमा
कार्तिक प्रबोधिनी फलदा
मार्गशीर्ष मोक्षदा सफला
पौष प्रजावर्धिनी षट्तिला
माघ जयदा विजया
फाल्गुन आमलकी पापमोचनी
वैशिष्ट्ये
सर्व व्रतांतील हे एक मूलभूत व्रत आहे.
इतर व्रतांप्रमाणे हे व्रत संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही.
काळानुसार प्रत्येकातील सत्त्व, रज आणि तम गुणांचे प्रमाण पालटत असते. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता सर्वाधिक असते. त्यामुळे या वेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो.
व्रत करण्याची पद्धत
एकादशीला काहीएक न खाता केवळ पाणी आणि सुंठसाखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला उपवास करून दुसर्या दिवशी पारणे करतात.
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असेही म्हणतात.
याविषयीचे अधिक विवेचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
कार्तिकी एकादशी
या रात्री श्रीविष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात. याला `हरिहर-भेट’ किंवा `हरिहर-अद्वैत’ म्हणतात.
कार्तिकी एकादशीला श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र वाहावे
कार्तिकी एकादशीला श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र वाहावे
महत्त्व
कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा लंघून (ओलांडून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत !
‘कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे (अध्यात्मशास्त्रीय कारण) म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो.
ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्या भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून (स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे; कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.’
निर्जला एकादशी (भीमसेनी एकादशी)
तिथी : ज्येष्ठ शुद्ध एकादशी
इतिहास : ‘पांडवांतील भीमाचा आहार विलक्षण. भीमाला सर्व एकादश्यांना उपवास करणे शक्य नव्हते; म्हणून त्याने व्यासांच्या उपदेशानुसार ज्येष्ठ शुद्ध एकादशीला पाणीही न पिता उपवास केला आणि सर्व एकादश्यांच्या उपवासाचे पुण्य जोडले.
महत्त्व : निर्जला एकादशीचे व्रत विधीपूर्वक केल्यास वर्षात दुसरी कोणतीही एकादशी न करताही सर्व एकादश्यांचे पुण्य मिळते.
कामदा एकादशी
‘ललिताने कामदा एकादशीचा उपवास करून प्रार्थना करताच पती ललितचे पाप नष्ट झाले. त्याचा राक्षसभाव निघून जाऊन त्याने दिव्य देह धारण केला आणि तो पुन्हा गंधर्व बनला.
एकादशी व्रताचे महत्त्व
पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.
अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।
एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। – पद्मपुराण
अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.
‘एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्या विष्णुतत्त्वामुळे वायूमंडल विष्णुतत्त्वयुक्त लहरींनी भारित असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्त्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते:
एकादशीचा उपवास
‘पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरिराच्या दोषांना जाळून टाकतो आणि १४ दिवसांत आहाराचा जो रस बनतो, त्याचे ओजात रूपांतर होते; म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे. एरवी गृहस्थाश्रमींनी मासातील केवळ शुक्लपक्षातील एकादशीचा उपवास करावा, असे आहे; परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे:
एकादशीचे लाभ
‘पद्मपुराणा’मध्ये एकादशीचे पुढीलप्रमाणे लाभ सांगितले आहेत.
स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।
सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।
न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।
न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । – पद्मपुराण आदिखंड
अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशीला ‘हरिदिन’ म्हणजे विष्णूचा दिवस, असे संबोधतात.
एकादशीला आणि इतर दिवशी तुळस पाहणे
इतर दिवशी तुळस पाहणे
एकादशीला तुळस पाहणे
चैतन्याचे प्रक्षेपण अल्प अधिक
विष्णुतत्त्व
स्तर अकार्यरत-कार्यरत कार्यरत-अकार्यरत
परिणाम व्यक्ती आणि वायूमंडल यांवर थोड्या प्रमाणात परिणाम होणे व्यक्ती आणि वायूमंडल यांवर जास्त परिणाम होणे
आनंद आणि शांती यांचे प्रमाण अल्प अधिक
सुगंधाचे प्रमाण अल्प अधिक
उपाय करण्याचे सामर्थ्य अल्प अधिक
वाईट शक्तींचे आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता अल्प, भुवलोकातील आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता असणे अधिक, भुवलोक ते दुसर्या पाताळापर्यंतचे आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता असणे
No comments:
Post a Comment