श्री स्वामी समर्थ जपता जपता,शेवट माझा होऊ दे अनंता ।
या देही काही व्याधी नसावी,तव सेवेपायी तनु ही झिजावी
ध्यान तुझे ते लोचनी असता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।
तुजवीण स्वामी पुजू कुणा मी, दुःख ते माझे सांगु कुणा मी।
मनी नसता भय आणि चिंता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।
मात्यापित्याने जग दाखविले,गुरुकृपेने जीवन घडले।
या जीवनाचे सार्थक होता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।
मानवदेही जन्मा मी आलो,प्रपंच्याच्या मोही बुडालो ।
ती मोहमाया नष्टची होता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।
तू स्वामी मजला भरपूर दिधले,कर्माने सारे मी घालविले ।
गमाविलेले पुन्हा मिळविता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।
हनुमंताने श्रीरामाशी पूजिले,हृदयी अपुल्या प्रभु दाखविले ।
तैसच माझ्या हृदयी तू असता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।
No comments:
Post a Comment