Thursday, 1 September 2016

उठ उठ पंधारीनाथा

ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा उठ पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा अस्त पातलासे चंद्रा, तारका विझाल्या फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या जाग पाखरांना आली, जाग ये सुगंधा पात्र पाणियाचे हाती उभी असे भीमा दर्शनास आले तुझिया ज्ञानदेव, नामा भक्तराज चोखामेळा दुरून देई सादा देह-भाव मिळुनी केला काकडा मनाचा निघून धूर गेला अवघ्या आस-वासनांचा ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा

उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला

ऊठ पंढरीच्या राजा ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणु सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला कुक्षी घेऊनिया कुंभा उभी ठाकी चंद्रभागा मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाला पुंडलीक हाका देई उभ्या राही, रखुमाबाई निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला

आनंदाचे डोही आनंद तरंग

आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥ काय सांगो जालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥ तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥ Random song suggestion

अरे कृष्णा अरे कान्हा मनारंजन मोहना

अरे कृष्णा अरे कान्हा अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्‍तची ओळखावा अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

डोल डोलतेय वाऱ्यावर बाय

डोल डोलतंय्‌ वार्‍यावर बाय डोल डोलतंय्‌ वार्‍यावर बाय माझी, डोल डोलतंय्‌ वार्‍यावर खंडोबा राया परतंय्‌ मी पाया तुझे भेटीला हाणीन नौकेला डोंगरची माऊली कोल्यांची सावली दर्यान्‌ कोल्यांचे हाकेला धावली होरं कसं जाऊ दे बारान्‌ कवीला माव्हरं सोनेरी परेल आपले डोलीला माव्हरं कसं परलंय्‌ आपले डोलीला शिंगाला सरगा काटेरी पाला पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌ गो पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌

गोमू संगतींन माझ्या तू येशिल का ?

गोमू संगतीनं माझ्या तू गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ? माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ? आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय ! तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय ! ग तुझं टप्पोरं डोलं जसं कोल्याचं जालं माझं कालिज घोळं, त्यात मासोली झालं माझ्या प्रीतिचा सुटलाय तुफान वारा वारा वारा रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा तुझ्या नजरंच्या जादूला अशी मी भुलणार नाय रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जिवाची दैना मी रं रानाची मैना, तुझा शिकारी बाणा खुळा पारधी ग जाळ्यामंदी आला आला आला ग तुला रुप्याची नथ मी घालीन ग तुला मिरवत मिरवत नेईन तुज्या फसव्या या जाल्याला अशी मी गावनार नाय गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ? आरं संगतीनं तुझ्या मी येणार......हाय ! तुझ्या पिरतिची रानी मी होनार हाय !

Parts of a motorcycle

Parts of a motorcycle: 1. Taillight 2. Mudguard 3. Spring suspension 4. Exhaust pipe 5. Passenger restraint handle 6. Gas tank 7. Handlebar 8. Dashboard 9. Headlight 10. Telescopic shock absorber 11. Disk brake 12. Aluminium rim