Thursday, 8 December 2016

सर्वेश्वरा शिवसुंदरा - स्वामी समर्थ

🌹🙏🏻शुभ सकाळ🙏🏻🌹

   🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना

सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना

श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना

न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना

करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना

Tuesday, 6 December 2016

श्री दत्तात्रेय शरणाष्टक

**श्री दत्तात्रेय शरणाष्टक **

दत्तात्रेया तव शरणम् । दत्तनाथा तव शरणम् ॥
त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणम्॥१॥

शाश्वतमूर्ते तव शरणम् । श्यामसुंदरा तव शरणम् ॥
शेषाभरणा शेषभूषणा शेषशायि गुरु तव शरणम् ॥२॥

षड्भुजमूर्ते तव शरणम् । षड्भुजयतिवर तव शरणम्॥
दंडकमंडलु गदापद्मकर शंखचक्रघर तवं शरणम् ॥३॥

करुणानिधे तव शरणम् । करुणासागर तव शरणम् ॥
श्रीपादश्रीवल्लभ गुरुवर नृसिंहसरस्वति तव शरणम्॥४॥

श्रीगुरुनाथा तव शरणम् । सद्गुरुनाथा तव शरणम् ॥
कृष्णासंगमतरुवरवासी भक्तावत्सला तव शरणम् ॥५॥

कृपामूर्तें तव शरणम् । कृपासागरा तव शरणम् ॥
कृपाकटाक्षा कृपावलोकना कृपानिधे प्रभु तव शरणम्॥६॥

कालांतका तव शरणम् । कालनाशका तव शरणम् ॥
पूर्णानंदा पूर्णपरेशा पुराणपुरुषा तव शरणम् ॥७॥

जगदीशा तव शरणम् । जगन्नाथा तव शरणम् ॥
जगत्पालका जगदाधीशा जगदुद्धारा तव शरणम् ॥८॥

अखिलांतरा तव शरणम् । अखिलैश्वर्या तव शरणम्॥
भक्तप्रिया वज्रपंजरा प्रसन्नवक्त्रा तव शरणम् ॥९॥

दिगंबरा तव शरणम् । दीनदयाघन तव शरणम् ॥
दीनानाथा दीनदयाळा दीनोद्धारा तव शरणम् ॥१०॥

तपोमूर्ते तव शरणम् । तेजोराशी तव शरणम् ॥
ब्रह्मानंदा ब्रह्मसनातन ब्रह्ममोहना तव शरणम् ॥११॥

विश्वात्मका तव शरणम् । विश्वरक्षका तव शरणम्॥
विश्वंभरा विश्वजीवना विश्वपरात्पर तव शरणम् ॥१२॥

विघ्नांतका तव शरणम् । विघ्ननाशका तव शरणम् ॥
प्रणवातीत प्रेमवर्धना प्रकाशमूर्ते तव शरणम् ॥१३॥

निजानंदा तव शरणम् । निजपददायका तव शरणम् ॥
नित्यनिरंजन निराकारा निराधारा तव शरणम् ॥१४॥

चिद्घनमूर्ते तव शरणम् । चिदाकारा तव शरणम् ॥
चिदात्मरूपा चिदानंदा चित्सुखकंदा तव शरणम् ॥१५॥

अनादिमूर्ते तव शरणम् । अखिलावतारा तव शरणम् ॥
अनंतकोटिब्रह्मांडनायका अघटितघटना तव शरणम् ॥१६॥

भक्तोद्धारा तव शरणम् । भक्तरक्षका तव शरणम् ॥
भक्तानुग्रहभक्तिप्रिया पतितोद्धारा तव शरणम् ॥१७॥

Sunday, 4 December 2016

श्री स्वामी समर्थ प्रार्थना

समर्थांसमोर उभा होतो, हताश मी हात जोडून
डोळ्यामध्ये पाणी होते, मनातून गेलो पूर्ण मोडून

मी म्हणालो,
“समर्था, काय करू कळत नाही”
“प्रश्नाच उत्तर मिळत नाही”

समर्थ म्हणाले .. “विश्वास ठेव”

“सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत”

समर्थ  म्हणाले .. “विश्वास ठेव”

“आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही
उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही"

मी म्हणालो
"कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे
तुमच्याकडे काय पुरावा ? ”

शांतपणे हसत समर्थ  म्हणाले

"पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून
विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर..

मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो
विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर..

बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत,
विश्वास असतो त्याचा, तिने सांभाळून घेण्यावर..

उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो
विश्वास असतो तेंव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर..

आज माझ्या दारी येऊन, आपली सगळी दुखः घेऊन,
विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर..

असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात

नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल..

म्हणून....

सगळे रस्ते बंद होतील तेंव्हा हा फक्त‘विश्वास ठेव’
जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी..!!!
💐🌺जय जय रघुवीर समर्थ🌺💐
🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺

सीताराम सीताराम सीताराम कहीये

सीताराम , सीताराम , सीताराम कहीये ।
जाही विधि राखे राम ताहि विधि रहिये ।
मुख मेँ हो राम नाम , राम सेवा हाथ मेँ ।
तू अकेला नहीँ प्यारे , राम तेरे साथ मेँ ।
विधि का विधान जान , हानि लाभ सहिये ।
जाही विधि राखे राम ताही विधि रहिये ।
सीताराम , सीताराम , सीताराम कहिये ।
.
किया अभिमान तो फिर मान नहीँ पायेगा ।
होगा वही प्यारे जो श्रीरामजी को भायेगा ।
फल आशा त्याग शुभ काम करते रहिये ।
जाही विधि राखे राम ताही विधि रहिये ।
सीताराम , सीताराम , सीताराम कहिये ।
.
जिन्दगी की डोर सौँप हाथ दीनानाथ के ।
महलोँ मेँ राखे चाहे झोंपडी मेँ वास दे ।
धन्यवाद निर्विवाद राम राम कहिये ।
जाही विधि राखे राम ताही विधि रहिये ।
सीताराम , सीताराम , सीताराम कहिये ।
.
आशा एक रामजी से दूजी आशा छोड दे ।
नाता एक रामजी से दूजा नाता तोड दे ।
साधु संग राम रंग अंग रंगिये ।
काम रस त्याग प्यारे  राम रस पगिये ।
जाही विधि राखे  राम ताही विधि रहिये ।
सीताराम , सीताराम , सीताराम कहिये ।
.
।।।।।।।।जय श्रीराम ।।।।।।।।।

Saturday, 3 December 2016

सुंदर ते रूप मूर्ती मनोहर स्वामी समर्थ

सुंदर ते रूप मूर्ती मनोहर । नीर्गुण साचार स्वामी माझा ।।

विशाळ हो भाळी केशराची उटी ।
कस्तुरी लल्लाटी शोभतसे ।।

मुर्ती मनोहर निर्गुण साचार कलयुगी ।।

कृपानेत्र पाहोनी तेजः पुंज्य खरे ।
भरवी तेज बरे विराजीत ।।

सरस नासीक तेजासी आगळे ।प्रेमे पवन खेळे ज्या माजी ।।

कोटी ते मदन टाकु ओवाळुन ।लावण्याची खाण जेथे खरी ।।

रुद्राक्ष आगळा शोभतसे गळा ।वरी तुळशी माळा ढाळ देत ।।

कटीसी कोपीन पोवळी ती जाण ।

तारक नीधान कलयुगी ।। *आनंद* म्हणे ऐसी मूर्ती येतां ध्यानी ।
जीव मन दोनी कुरवंडिये ।।

🚩!! ॐ नमो श्री भगवते स्वामी समर्थाय नम: !!

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🙏🏻

सर्वांना शुभ दिन 🚩

श्री स्वामी समर्थ माउली

•••• || श्री स्वामी समर्थ माऊली || ••••

प्रसन्न  मुद्रा  पाहून  स्वामी  भक्त  हरकले.,
तुमच्या चरणी सारे जण मग नतमस्तक झाले..

" मै जिंदा हुं "  हे स्वर हि कुठूनी तत्क्षणी निनादले.,
हर्ष  जाहला  प्रत्येकाला  नेत्रहि  पाणावले..

तो  क्षण  विलक्षण  होता  वातावरणही  भारावले
सुमनाची  वर्षा  झाली  भक्तजन  धन्य  धन्य  झाले..!

!! श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ !!

#शुभ_स्वामी संध्या .. स्वामी भक्त हो .!

औदुंबर दत्त दिगंबर भजन

श्रीविधिहरिहर-मूर्तिं सांवळी कृष्णातिरीं राहे ||
दत्तदिगंबर म्हणती जयाला औदुंबर छाये || धृ. ||

कृष्णातिरिंचा अगाध महिमा दुर्लभ देवांसी ||
ईचे तीरीं वास जयाचा अखंड हो काशी ||
प्रातःकाळीं सुरगण मुनिजन येती स्नानासी ||
पवित्र होउनी शुद्ध भक्तीनें साधन मोक्षासी ||
शुष्क पापें गणती नाहीं जाती विलयासी ||
महापातके करितां स्नानें जाती मोक्षासी ||
चला जाउंया करा तयारी सत्वर लवलाहे || १ || दत्तदिगंबर...

ध्यान पाहतां भगवी वस्त्रें परिकर लंगोटी ||
सर्वांगी चर्चुनी बैसले भस्माची उटी ||
दंडकमंडलु करीं घेऊनी उपवस्त्रें छाटी ||
रुद्राक्षांचे हार प्रफुल्लित शोभति बहु कंठीं ||
शमीपत्र किती बिल्व तुळसीदळ सुमनांची दाटी ||
प्रेमानंदे भक्त वहाती आवड बहु मोठी ||
हास्यमुखानें कृपाकटाक्षें दासाकडे पाहे || २ || दत्तदिगंबर...

औदुंबराची पूजा करितां कोटी पापांची ||
राख-रांगोळी होऊनि जाते साक्षी अंबेची ||
अशा वृक्षातळीं बैसली स्वारी श्रीगुरूंची ||
तीन्हि-त्रिकाळी पूजा होतसे श्रीगुरुरायाची ||
सायंकाळीं असें वाटतें शोभा स्वर्गाची||
मंत्रपुष्प-अतिघोष गर्जना चर्चा वेदांची ||
सीतारामा पाहूनी प्रेमा आनंद न समाये ||३|| दत्तदिगंबर...