Sunday, 11 December 2016
Key differences between memorandum of association and article of associarion
आईचा गर्भ - एक कविता
*आईचा गर्भ*
*मला आवडलेली कविता*
______________________
*किती मंद तो प्रकाश तूझ्या गर्भामध्ये होता.*
______________________
*स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.*
_______________________
*एकटाच मी अन माझं जग तुच होतीस.*
________________________
*या भयान जगापासून मला लपवून तू होतीस.*
________________________
*तूझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.*
________________________
*तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.*
_________________________
*तुला मला जोड़नारी एक कोमल दोर आत होती.*
________________________
*तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.*
_________________________
*तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.*
_________________________
*कान माझे फक्त़ तुझ्या आवाजाला तरसायचे.*
_________________________
*तू स्वतःला किती किती जपायचीस.*
_________________________
*एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.*
_________________________
*जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.*
_________________________
*पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.*
_________________________
*गर्भातले ते महीने पुन्हा येणार नाहीत.*
_________________________
*पण मी अजूनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही.*
*- माझी आई.*
Saturday, 10 December 2016
आपली माणस मोठी कराJ
एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,
कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .
कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो ,
पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .
शर्यत सुरु झाली
कुत्रा जोरात धाऊ लागला.
पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,
असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला
तर बघतो
तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते
तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून
निराश झालेला कुत्रा बोलला कि
जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते
तात्पर्य काय
१.आपल्याना विश्वासात घ्या
२.आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य करा,त्याना प्रोत्साहन द्या
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा
आपली_माणसं_मोठी_करा.
जन्म कुंडली म्हणजे काय ? भाग 1
जन्मकुंडली म्हणजे काय?
(अवश्य वाचा व आवडल्या शेयर करा व
ज्योतिष शास्त्राचा प्रसार करा)
खूप लोकांना हा प्रश्न पडतो कि जन्मकुंडली नेमके म्हणजे काय? तर चला थोडक्यात जाणून घेऊया
देवाचे काम काय आहे की आपल्याला आईच्या गर्भात गर्भधारणा झाल्यावर पहील्या दिवसा पासुन ते नवव्या महिन्यात पर्यंत गर्भात आपले रक्षण करणे आणि जसा आपला आईच्या गर्भातून आपला या पृथ्वीवर म्हणजे एका ग्रह वर जन्म होतो तसा या नऊ ग्रहाचा आपल्या जीवनावर प्रभाव सुरू होतो.
जातकाचा जन्म पृथ्वीवर झाल्यावर वरते या ग्रहाची स्थिति काय आहे ते आपल्या जन्मदिनांक, जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून पंचागच्या आधारे ग्रह- नक्षत्र-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली व कुंडलीतील ग्रहांची स्थिती नुसार ग्रह हे जीवनावर प्रभाव करतात.
कुंडलीत जे आकडे असतात त्यांना जन्म लग्न असे म्हणतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे
आज माझ्या ज्योतिष विषयक अनुभवांचे दालन आज तुमच्यापुढे खुले करावेसे वाटत आहे. पण प्रथम आपल्याला ज्योतिषाची थोडी माहिती असली पाहिजे. आपण जेव्हा ज्योतिषास जन्म वेळ ,तारीख आणि जन्माठीकन सांगतो .तेव्हा ज्योतिषी एक कुंडली तयार करतो .ही कुंडली म्हणजे जन्माच्या वेळी आकाशात जी ग्रहस्थिती होती त्याचा नकाशा . म्हणून आज मी पहिल्या लेखात कुंडलीमध्ये जी १२ स्थाने असतात त्यांची माहिती सांगेन.
१) पहिले स्थान -लग्नस्थान
या स्थाना वरून माणसाचे आयुष्य ,रंग,उंची, रूप ,स्वभाव , डोके ,मेंदू या गोष्टी पहिल्या जातात.
२)दुसरे स्थान -धनस्थान
या स्थाना वरून माणसाला मिळणारा पैसा ,त्याचे डोळे ,बोलणे , वाणी (मधुरता कुटुंबातील व्यक्ती ,त्याशिवाय काही मारक बाधक गोष्टी पहिल्या जातात.
३)तिसरे स्थान -पराक्रम स्थान
या वरून माणसाने स्वतः मेहनतीने मिळवलेले यश ,छोटे प्रवास ,लहान भावंडे ,हात श्वसनसंस्था पहिली जातात.
४)चौथे स्थान -सुख स्थान
या स्थानावरून प्राथमिक शिक्षक, (10/12 पर्यंतचे) वाहनसुख, गाडी ,बंगला ,मालमत्ता, आई ,माणसाचे मन ,जमीन या गोष्टी पाहतात.
५)पाचवे स्थान -संतती स्थान/विद्या/महालक्ष्मी स्थान/
नावाप्रमाणेच यावरून मुले बाळे, उच्च शिक्षण, विवाह स्थळ, शेयर मार्केट,सट्टा बाजार यश, अंगात असलेल्या कला, विविध गोष्टींचे उत्पादन ,पाठीचा कणा या गोष्टी पाहतात
६) सहावे स्थान -रिपू स्थान
या स्थानावरून आपले शत्रू ,आजार ,रोग , पोट ,मामा ,पाळीव प्राणी कोर्टकेस इत्यादी गोष्टी पाहतात
७)सातवे स्थान --विवाह स्थान
हे जोडीदाराचे स्थान आहे ,जोडीदाराचे रंग रूप ,स्वभाव ,इत्यादी ,शिवाय व्यवसायातील पार्टनर पण यावरूनच बघतात.
८)आठवे स्थान -मृत्युस्थान
यावरून मृत्युच्या वेळची परिस्थिती, गुप्तधन ,वारसाहक्काचे धन ,गुप्त गोष्टी पहिल्या जातात.
९)नववे स्थान - भाग्य स्थान/ पुर्व जन्म कर्म स्थान/ धर्मस्थान
या वरून दूरचे प्रवास ,यात्रा ,धार्मिक गोष्टी ,न्यायखाते, उपासना, नातू,पंतू(मुलाचे मुल)पाय या गोष्टी पाहतात.
१०)दहावे स्थान -कर्मस्थान/ पिता, व्यापार, व्यवसाय,माणसाचा नोकरी धंदा, पदोन्नती, ,त्यातील यश गुडघे या गोष्टी पाहतात .
११)अकरावे स्थान -लाभ स्थान/धन संचय स्थान
या स्थानावरून वेगवेगळे लाभ ,मित्र परिवार ,कान या गोष्टी पाहतात,
आपल्या सर्वांच्या कुंडलीत हे स्थान नक्कीच प्रबळ असावे म्हणून फेसबुक च्या माध्यमातून सर्वाना एवढा मोठा मित्र परिवार मिळाला .
१२) बारावे स्थान -व्यय स्थान
या वरून परदेशी जाणे ,हॉस्पिटल , जेल ,गुंतवणूक ,खर्च होणे या गोष्टी पाहतात तसेच मोक्षा करिताही नवम व द्वादश या स्थानांचा एकत्रित विचार करतात
क्रमश: ...
ज्योतिष आकाश पुराणिक
Remove daek patches on screen
माझ्या दत्ता अवधूता - दत्त भजन
माझ्या दत्ता अवधुता ब्रम्हचारी-हो
माझ्या दत्ता अवधुता ब्रम्हचारी।
राहे साहे माहुर गडावरी।माझ्या दत्ता॥धृ॥
प्रात:स्नाना येतसे भागिरथी-हो॥
माध्यान्हकाळी जाई तो गोदा तटी-हो॥
साय़ंकाळी स्वयंभू ज्याची मुर्ती।माझ्या दत्ता॥१॥
भिक्षा करी कह्राड कोल्हापूरी-हो॥
नेऊन भक्षी रंकाळ तळ्यावरी-हो॥
निद्रा करी अवधुत गिरीवरी।माझ्या दत्ता॥२॥
ऐसा दत्त-दत्त हा योगीराणा-हो॥
अनुसुयेचे पोटी बाळ तान्हा-हो॥
माधवदासांसी नित्य दर्शन देई।माझ्या दत्ता॥३॥
Friday, 9 December 2016
श्री गुरुचरित्र अवतरणीका
|| श्री गुरुचरित्र अवतरणीका ||
दिवस चवथा
दत्त जयंती पर्यंत श्री गुरुचरित्र अवतरणीका रोज सर्वानी वाचायची आहे. ज्या साधकाची अवतारणीका वाचून होइल त्यानी comment मधे श्री गुरुदेव दत्त type करायचे आ हे.
श्री गणेशाय नम : श्रीगुरुदेवद्त्तात्रेय चरणा राविन्दाभ्या नम:||गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:||
गुरुरेव परं ब्रह्म तस्में श्रीगुरुवे नम:||श्रोते व्हावे सावधान || श्रीगुरुचरीत्राधाय बावन्न ||
ऐकोनी नामधारकाचे मन || ब्रह्मानंदी निमग्न पै || म्हणोनी नामधारक विनवीत || सिद्धाचे चरणी लागत ||
म्हणे श्रीगुरुचरित्रामृत || अवतरणीका मज सांगा || या श्रीगुरुचारीत्रामृती || भक्त जनांची मनोवृत्ती ||
बुडी देवोनी स्थिरावली || अतुप्त आहे अजुनि || हेची कथा पुन्हा सुचवोनी || अक्षयामृत पाजूनी ||
आनंद सागरी मज ठेवा || बहु औषधींचे सर काढोन || त्रयलोक्य चिंतामणी रसायण || संग्रह करिती विचक्षण ||
तैसे सार मज सांगा || ऐकोनी शिष्याची प्रार्थना || आनंद सिद्धाचिया मना || म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्रीगुरूचरित्री||
श्रीगुरुचरीत्राची ऐका || सांगे आता अवतरणीका || प्रथमपासून सारांशनिका बावानाधायापर्यंत||प्रथमाध्यायी मंगलाचरण ||
मुख्य देवतांचे असे स्मरण || श्रीगुरुमुर्तीचे दर्शन || भक्ताप्रती जाहले ||१ || द्वितीयाध्यायी ब्रःम्होत्प्ती || चारी युगांचे भाव
कथिती || श्रीगुरुसेवा दीपकाप्रती || घडली ऐसें कथियेले ||२ || नामधारका अमरजा संगमा || श्रीगुरू नेती आपुले धामा ||
अंबरीष दुर्वास यांचा महिमा || तृतीयाध्यायी कथियेला ||३|| चतुर्थाध्यायी अनसूयेप्रती || छळावया त्रयमूर्ती येती || परी
तियेचे पुत्र होती || स्तनपान करिती आनंदे ||४ || पंचमी श्रीदत्तात्रय धरी || स्वये अवतार पिठापुरी || श्रीपाद्श्रीयावल्लभधारी||
तीर्थयात्रेसी निघाले ||५ || सहाव्यात लिंग घेउनी || रावण जाता गोकर्णी || विघ्नेश्वरे विघ्न करुनी || स्थापना केली तयाची ||६ ||
गोकर्ण महिमा असंख्यात || रायाप्रती गौतम सांगत || चांडली उद्धरली अकस्मात || सातव्या अध्यायी वर्णिती ||७ ||
मातापुत्र जीव देत होती || तयाप्रती गुरुकथा सांगती || शनी प्रदोष वृत्त देती || ज्ञानी करिती अष्टमी ||८|| नवमाध्यायी
रजकाप्रती || कृपाळू गुरु राज्य देती || दर्शन देऊ म्हणती पुढती || गुप्त झाले मग तेथे ||९ || तस्करी मारिला भक्त ब्राह्मण ||
तस्करा वधिती श्रीगुरू येऊन || ब्राह्मणाला प्राणदान || देती दशमाध्यायात ||१० || माधव ब्राह्मण करंजपुरी ||अम्बनामे त्याची नारी ||
नरसिहसरस्वती तिचे उदरी || एकादशी अवतरले ||११ ||द्वादशाध्याई माते प्रती || ज्ञान कथुनी पुत्र देती || काशीक्षेत्री संन्यास घेती ||
यात्रा करिती उत्तरेची ||१२ || मातापित्यांचे करंजपुरी || भेटुनी येती गोदातिरी || कुक्षिव्यथेच्या विप्रावरी || कृपा करती त्रयोदशी ||१३ ||
क्रूर यवनाचे करुनी शासन || सायंदेवास वरदान || देती श्रीगुरू कृपा करून || चौदाविया अध्यायी ||१४ || पंचदर्शी श्रीगुरुमूर्ती ||
तीर्थे सांगती शिष्यांप्रती || यात्रे दवडुनी गुप्त होती || वैजनाथी श्रीगुरू ||१५ || षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती || कथूनी दिधली ज्ञानशक्ती ||
श्रीगुरुआले भिल्लवडीप्रती || भुवनेश्वरी सन्निध ||१६ || भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण || जिव्हा घेदोनी करी अर्पण || त्यास श्रीगुरुंनी विद्या देऊन || धन्य
केला सप्तदर्शी ||१७ || घेवडा उपटोनिया दारिद्रियाचा || कुंभ दिधला हेमाचा || वर्णिला प्रताप श्रीगुरूंचा || अष्टादशाध्यायात ||१८ || औदुंबराचे करुनी वर्णन ||
योगीनीस देउनी वरदान || गाणगापुरास आपण || एकोणविशी श्रीगुरू गेले ||१९ || स्त्रियेचा संमंध दवडून || पुत्र दिधले तिजला दोन || एक मरता कथिती
ज्ञान || सिद्धरूपे विसाव्यात ||२० || तेची कथा एकविशी || प्रेत आणिले औदुंबरापाशी || श्रीगुरू येउनी तेथे निशी || पुत्र उठविती कृपाळू ||२१ || भिक्षां
दरीद्र्या घरी घेती ||त्याची वंध्या महिषी होती || तीस करून दुग्धवती || बाविसाव्यात वर दिधला || २२ || तेविसाव्यात श्री गुरूस || राजा नेई गाणगापुरास ||
तेथे उद्धरती राक्षस || त्रिविक्रम करी श्रीगुरू निंदा ||२३ || भेटो जाती त्रिविक्रमा || दाविती विश्वरूप महिमा || विप्रलागे श्रीगुरुपाद्पद्मा || चोविसाव्यात वर
देती ||२४ || म्लेन्छापुढे वेद म्हणती || विप्रा ते त्रिविक्रमा छळती || त्याला घेउनी सांगाती || गुरूपाशी आला पंचविशी ||२५ || सव्विसाव्यात तया
ब्राह्मणा || श्रीगुरू सांगती वेदरचना || त्यागा म्हणती वाद कल्पना || परी ते उन्मत नायकती ||२६ || सत्ताविशी आणोनी पतिता || विप्रासी वेद
वाद करिता || कुंठीत करोनी शापग्रस्ता || ब्रह्मराक्षस त्या केले ||२७ || अष्टाविशी तया पतिता || धर्माधर्म सांगोनी कथा || पुनरपि देऊन
पतितावस्था || गृहाप्रती दवडिला ||२८ || एकोनत्रीशी भस्म प्रभाव || त्रिविक्रमा कथिती गुरुराव || राक्षस उद्धरी वामदेव || हा इतिहास तयांतची ||२९ ||
त्रिशाध्यायी पती मरता || तयाची स्त्री करी बहु आकांता || तीस श्रीगुरू नाना कथा || कथून शांतवू पाहती ||३० || एकतिसाव्यात तेची कथा ||
पतिव्रतेचे धर्म सांगता || सहगमन प्रकार बोधिता || ते स्तियेते जगद्गुरु ||३१ || सहगमनी निघता सती || श्री गुरूस झाली नमस्कारिती || आशीर्वाद देवोनी तिचा
पती || बतीसाव्यात उठविला ||३२ || तेहतीसाव्यात रुद्राक्षधारण || कथा कुक्कुटमर्कट दोघेजण || वैश्य - वेश्यचे कथन || करिती रायाते परस्पर ||३३ ||
रुद्राध्याय महिमा वर्णन || चौतीसाव्यात निरुपण || राजपुत्र केला संजीवन || नारद भेटले रायाते ||३४ || पंचत्रीशप्रसंगात || काचदेवयानी कथा वर्तत || आणिक
सोमवार व्रत || सीमंतिनीच्या प्रसंगे ||३५ || छतिशी ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा || स्त्रियेने नेले परान्न भोजना || कंटाळुनी धरिती श्रीगुरुचरणा || त्याला कर्ममार्ग सांगती ||३६ ||
सप्तत्रिंशी नाना धर्म || विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म || प्रसन्न होवोनी वर उत्तम ||देती श्रीगुरू तयाते ||३७ || अष्टत्रिंशी भास्कर ब्राह्मण || तिघांपुरते आणिले अन्न ||
जेविले बहुत ब्राह्मण || आणिक गावचे शुद्रादी ||३८ || सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षांची वंध्या होती || तीस दिथली पुत्र संतती || एकूणचाळीसावे अध्यायी ||३९ ||
नरहरी करवी शुष्क काष्टा || अर्चवूनी दवडिले त्याच्या कुष्ठा || शबर कथा शिष्य वारीष्टा || चाळीसाव्यात सांगती ||४० || एकेचाळीसी सायदेवा || हस्ते घेती
श्रीगुरुसेवा || ईश्वर पार्वती संवाद बरवा || काशीयात्रा निरुपण ||४१ || पुत्र कलत्रेसी सायंदेव || येऊनि करिती श्रीगुरुस्तव || त्याला कथिती यात्रा भाव || वरही
देती बेचाळीसी ||४२ || त्रेचाळीसी अनंत व्रत || धर्मराया कृष्ण सांगत || तेची कथा सायंदेवा प्रत || सांगोनी व्रत करविती ||४३ || चवेचाळीसी तंतुकार भक्तासी ||
श्रीपर्वत दावूनी क्षणेसी || शिवरात्री पुण्यकथा त्यासी || विमर्षण राजाची काथेयेली ||४४ || पंचेचाळीसी कुष्टी ब्राह्मण || आला तुळजापुराहून || त्याला
करवूनि संगमी स्नान || कुष्ठ नासुनी ज्ञान देती ||४५ || कल्लेश्वर हिपरगे ग्रामास || श्रीगुरू भेटती नरहरी कवीस || आपुला शिष्य करिती त्यास || शेचाळीसी अध्यायी ||४६ ||
सत्तेचाळीसी दिवाळी सण || श्रीगुरूसी आमंत्रिती सातजण || तितुकी रूपे धरुनी आपण || गेले मठीही राहिले ||४७ || अठेचाळीसी शुद्रशेती त्याचा जोंधळा कापूनी टाकिती ||
शतगुणे पिकवूनी पुढती || आनंदविले तयाते ||४८ || एकोनपंचाषति श्रीगुरुमूर्ती || अमरजा संगम महात्म्य कथिती || आणिक हि तेथे सांगती || कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे||४९ ||
म्लेन्छाचा स्फोटक दवडिती || भक्तिस्तव त्याचे नगरा जाती || पुढे श्री पर्वती भेटो म्हणती || पन्नासावे अध्यायी ||५० || एकावन्नबावन्नात गुरुमूर्ती || देखूनिया क्षिती पाप
प्रवृत्ती || उपद्रवितील नाना याती || म्हणूनी गुप्तरूपे रहावे ||५१ || ऐसा करुनी निर्धार || शिष्यासी सांगती गुरुवर || आजि आंम्ही जाऊ पर्वतावर || मल्लिकार्जुन यात्रेसी ||५२ ||
ऐसें ऐकुनी भक्तजन || मनी होती अतिउद्विग्न || शोक करिती आक्रंदोन || श्रीगुरुचरणी लोळती ||५३ || इतुके पाहुनी श्रीगुरुमूर्ती || वरदहस्ते तया कुरवाळीती || मद्भजनी धरा
आसक्ती || मठधामी राहोनिया ||५४ || ऐसें बोधुनी शिष्यासी || गुरु गेले कर्दळीवनासी || नाविक मुखे सांगूनी गोष्टीसी || निजानंदी निमग्न होती ||५५ || ऐसें अपार गुरुचरित्र ||
अनंत कथा परम पवित्र || त्यातील बावन्न अध्याय मात्र ||प्रस्तुत कथिले तुजलागी ||५६ || सिद्ध म्हणे नामधारका || तुज कथिली अवतरणिका || श्रीगुरू गेले वाटती लोका || श्रीगुरू गुप्त असती गाणगापुरी ||
कलियुगी अधर्म वृद्धी पावले || म्हणोनी श्रीगुरू गुप्त झाले || भक्तजनाला जैसे पाहिले || तैसे भेटती अद्यापि || ५७ || हे अवतरणिका सिद्ध माला || श्रीगुरू भेटती जपे त्याला ||
जैसा भावार्थ असे आपुला || तैसी कार्ये संपादिती ||५८ || श्रीगुरुरायांचे धरू चरण || सिद्ध मुनिते करू वंदन || नामधारका करू नमन || ऐसें करी नारायण || श्रीगुरू रुपी
नारायणा || विश्वंभरा दीनोद्धारणा || आपणा आपुली दावूनी खुणा || गुरु शिष्यरूपे क्रीडसी || इति श्रीगुरुचरीत्रामृते श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अवतरणीका
नामोध्याय: समाप्त : ||
|| श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु ||श्री