Friday, 16 December 2016

अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्‍नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण

धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा ?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

Thursday, 15 December 2016

श्री गुरुदत्तराज मूर्ती ,अवतार श्रीगुरूचा

श्रीगुरुदत्तराज मूर्ति,ओवाळितो प्रेमे आरती ||धृ||
ब्रह्माविष्णुशंकराचा,असे अवतार श्रीगुरुचा ||
कराया उध्दार जगाचा,जाहला बाळ अत्रिऋषिचा ||
धरिला वेष असे यतिचा,मस्तकी मुकुट शोभे जटिचा ||
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी,हातामधी आयुध बहुध धरुनी ||
तेणे भक्तांचे क्लेश हरुनी ||
त्यासी करुनी नमन,अघशमन,होईल रिपुदमन,
गमन असे त्रैलोक्यावरती ||
ओवाळितो प्रेमे आरती ||१||
श्रीगुरुदत्तराज मूर्ति..

गाणगापुरी वसती ज्याची,प्रीति औदुंबर छायेची ||
भीमा अमरजा संगमाची,भक्ती असे बहुत सुशिष्यांची ||
वाट दाऊनीया योगांची,ठेव देतसे निजमुक्तीची ||
काशी क्षेत्री स्नान करितो,करविरि भिक्षेला जातो,माहुर निद्रेला वरितो ||
तरतरित छाती झरझरित,नेत्र गरगरित,शोभतसे त्रिशुळ जया हाती ||
ओवाळितो प्रेमे आरती ||२||
श्रीगुरुदत्तराज मूर्ति.....

अवधुत स्वामी सुखानंदा,ओवाळितो सौख्यकंदा ||
तारि हा दास हृदयकंदा,दावी हा सद्गुरु ब्रह्मानंदा ||
चुकवी चौर्यांशीचा फेरा,घालिती षड्रिपू मज घेरा,गांजिती पुत्रपौत्रदारा ||
वदवी भजन, मुखी तव पुजन,करितसे सुजन, तयांचे बलवंतावरती ||
ओवाळीतो प्रेमे आरती ||३||
श्रीगुरुदत्तराजमूर्ति ओवाळितो प्रेमे आरती ||

Wednesday, 14 December 2016

व्यक्ती आणि वल्ली

आपल्या रोजच्या आयुष्यातही आपल्याला निरनिराळ्या प्रवृत्तीचे लोक भेटत असतात. याचप्रकारे प्रत्येक कंपनीमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी विविध स्वभाव असलेल्या व्यक्ती सहवासात असतात. या सगळ्यांशी जुळवून घेतच आपल्याला काम करावं लागतं. खाली काही दिलेल्या स्वभावाची माणसं प्रत्येकाच्या कंपनीमध्ये हमखास आढळतात. धोका पत्करणारी एखादी नवीन गोष्ट, धाडसी संकल्पना कंपनीमध्ये मांडताना या व्यक्ती दिसतात. नवे विचार, कल्पना कंपनीमध्ये आणण्यासाठी हे लोक उत्सुक असतात. आव्हानं स्वीकारायलाही नेहमी तयार असतात. आपल्या मतावर ठाम तसंच अपयशाला तोंड द्यायला तयार असण्याची त्यांची मानसिकता असते. कंपनीमध्ये बदल घडवण्यासाठी धाडसाचे निर्णय घ्यायची या लोकांची तयारी दिसून येतेय. अशा स्वभावाच्या व्यक्ती कंपनीमध्ये जरूर असाव्यात. वर्षानुवर्षं तेच काम, कामाची तीच पद्धत या लोकांना अजिबात आवडत नाही. वेळेचं बंधन ठेवता काम करणारे या लोकांना कामासाठी वेळेचं बंधनच नसतं. उशिरापर्यंत काम करताना या व्यक्ती दिसतात; पण जास्तीचं काम करणंही या व्यक्ती आनंदानं करतात, कारण त्यांना काम करणं आवडतं. ज्या कंपनीचे परदेशी कंपनीबरोबर व्यवहार आहेत, त्या कंपनीमध्ये परदेशी कंपनीच्या वेळेनुसार त्यांच्याशी बोलायला अगर व्यवहार करायला अशा व्यक्तींची खूप मदत होते, कारण कोणत्याही वेळी काम करायला या व्यक्ती तत्पर असतात. कामाबद्दल ते नेहमी जागरूकही असतात. मस्तमौला या व्यक्ती कंपनीमधील केवळ सहकारीच नसतात, तर चांगले मित्रही बनतात. मित्र आणि उत्तम मार्गदर्शक अशा या व्यक्ती असतात. यांचा हसताखेळता आणि मनमिळाऊ स्वभाव कंपनीमधील वातावरण प्रसन्न, टेंशन फ्री ठेवतो. दुसऱ्याला मदत करायला या व्यक्ती पुढे असतात. अडचणीच्या प्रसंगी दुसऱ्याचं काम करायला, त्याची मदत करायला यांना आवडतं. टेंशन नही लेनेका..बोले तो बिनधास्त रेहनेका असा यांचा स्वभाव असतो.. उत्साहाचा झरा सदैव उत्साहानं भरलेल्या या व्यक्ती असतात. नवनवीन आव्हानांना तोंड द्यायला या व्यक्ती घाबरत नाहीत. एखादं काम जितकं लवकर संपवता येईल, तितक्या लवकर संपवून या मोकळ्या होतात. एक-दोन महिन्यातून भन्नाट ट्रिपचं प्लान करण्यात त्यांचा पुढाकार असतो. वैयक्तिक आयुष्यातही नेहमी उत्साही असतात. सतत कार्यतप्तर सतत कामामध्येच व्यग्र असं या व्यक्तींचं स्टेटस असतं. स्वभावानं गरीब आणि कुणी सांगेल ते काम करणाऱ्या या व्यक्ती असतात. घरी काम, ऑफिसमध्ये काम असंच त्यांचं स्वरुप असतं. त्यांच्या अशा स्वभावामुळे हे लोक ताणतणावाखाली असतात. या व्यक्तींचा फायदा इतर लोकांकडून अनेकदा घेतला जातो. चुगल्या करणारे एकमेकांविषयी चुगल्या करणं, चुकीचे संदेश देणं, गट पाडणं आणि भांडणं लावून देणं ही कामं करण्यात या लोकांना जास्त रस असतो. या लोकांच्या सतत नकारात्मक बोलणं, दुसऱ्याच्या चुका काढणं, नावं ठेवणं अशा सवयींमुळे ऑफिसमधलं वातावरण बिघडतं. अशा लोकांपासून दूर राहणं आणि त्यांच्यावर जास्त विश्वास न ठेवणंच योग्य असतं. ट्रबल शूटर कंपनीमध्ये काही समस्या उद्भवल्यास त्या चुटकीसरशी सोडवण्यात हे लोक अग्रेसर असतात. कुठलीही अडचण आल्यास त्यावर या लोकांकडे उपाय असतो. या लोकांकडे संवादकौशल्य चांगलं असतं. याबरोबर व्यावहारिक ज्ञानाचीही चांगली जाण असते. अशा व्यक्तींमुळे कंपनीला चालना मिळतेच; शिवाय समस्यांवर लगेच तोडगा काढण्याच्या सवयीमुळे कामाची गतीही राखली जाते. प्रत्येक कंपनीमध्ये अशा व्यक्ती जरुर असल्या पाहिजेत. दुरून डोंगर साजरे जे काम, जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरं जाणं हा यांचा स्थायी स्वभाव. यांच्याकडे कंपनीबाबत नवीन कल्पना, नवे विचार असतात; पण घाबरून अथवा संकोचल्यामुळे या व्यक्ती ते व्यक्त करत नाहीत. फक्त रोजचं काम करणं आणि तेवढ्यास तेवढा संबंध ठेवणं असं यांचं वागणं असतं. बहुतांश लोकांचा हा स्वभाव असतो. गॉसिपकिंग गॉसिपिंग करणं, कुजबुजणं होत नाही अशी एकही कंपनी तुम्हाला सापडणार नाही. एकमेकांविषयी चुगल्या करण्याची सवय बऱ्याचजणांना असते. दुसऱ्याच्या कामाविषयी, स्वभावाविषयी कुजबुजण्याचा या लोकांचा उद्योग असतो. या लोकांना स्वत:च्या कामापेक्षा दुसऱ्याच्या कामातच जास्त रस असतो. त्यामुळेच कंपनीत मतभेत निर्माण आणि वादविवाद होतात. संकलन -ओंकार कुलकर्णी प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट Whatsapp Facebook Google PlusTwitter Email SMS Web Title: office, man, types (Marathi News from Maharashtra Times , TIL Network) मनोरंजन 00:27 'कॉफी विथ करण' मध्ये सलमान हरला ही पैज 00:23 ह्रतिक रोशन ठऱला जगातील तिसरा हॅण्डसम मॅन 00:27 दीपिकाचे हॉट फोटो शुट 00:28 रणबीर, जॉन, अभिषेक आणि फुटबॉल 00:33 ब्रेक अप झाले असेल तर कारण नक्की असणार: आलिया 01:56 करिश्मा कपूर आपल्या 'प्रियकरा'सोबत राहणार? 00:27 कतरिना आणि दीपिका एकत्र! 00:30 मी सहज भावूक होतो; डोळ्यातील अश्रू खरे असतात: आ... 01:42 सोनमनेही सोसला होता विनयभंगाचा आघात 00:21 आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीची 'डिनर डेट' 02:20 मलायका अरोराला अफवांनी फरक पडत नाही! आणखी मनोरंजन फॅशन बाल्ड इज बोल्ड नववधू, बॅग भरली? लग्नात दिसा सुंदर फेस्टिवलची धूम, फॅशनवर झूम आणखी फॅशन एक दृष्टिक्षेप बातम्या: महाराष्ट्र देश थोडक्यात बातमी विदेश सिटी न्यूज अर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक करिअर लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेको लाइव टीव्ही इतर फोटो धम्माल व्हिडिओ फोटोगॅलरी इन्फोग्राफिक्स सिटीझन रिपोर्टर आमच्या इतर साइट्स: தமிழ்తెలుగుമലയാളംবাংলাગુજરાતીहिन्दीಕನ್ನಡEnglish आमच्या बद्दलवापर अटीडेस्कटॉप आवृत्ती Copyright © 2016 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights: Times Syndication Service

Tuesday, 13 December 2016

रान नामाने कुंडलिनी जागृती

रामनामाने कुंडलिनी जागृती -

-------------------------------------------------------
कुंडलिनी - मोठी प्रकृती म्हणजे विश्वशक्ती.
ती गोळा होऊन माणसाच्या ठिकाणी वास करते. बहुतेक माणसांमध्ये तिचे तोंड खाली असते, शिवाय ती निजलेली असते.
अनुग्रहाचा परिणाम - सद्‌गुरुकडून नाम घेतले म्हणजे ती जागी होते व तिचे तोंड वरच्या दिशेला होते. सत्संगाने व नुसत्या नामस्मरणानेदेखील ती जागी होऊन तिचे तोंड वर होते.
कुंडलिनीचे आरोहण – वर जाणे.
--------------------------------------------------
पहिली पायरी -
या वेळी माणूस संतदर्शने घेतो, संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करतो, संतकृपा व्हावी म्हणून प्रार्थना करतो आणि नियमाने नामस्मरण करतो.

दुसरी पायरी -
ही शक्ती बेंबीपाशी असते. माणसाची वासना बेंबीपाशी वास करते. तेथे कुंडलिनी येऊन स्थिर झाली म्हणजे माणसाची वासनाच बदलते.
इंद्रियांचे भोग भोगण्याची लालसा नकळत क्षीण होते. नामाला जीवन वाहावे अशी उत्कट इच्छा होते. आतील संघर्षाचा कमीजास्त तीव्र अनुभव येतो. गतायुष्याबद्दल पश्चात्ताप होतो. पण येथे जीवनाचे खरे ध्येय निश्चित होते.
येथे पोचल्यावर काही लोकांना काव्य सुचते, नवीन कल्पना सुचतात, वाक्‌चातुर्य प्राप्त होते. [कुंडलिनी जागृतीचा पहिला टप्पा]

तिसरी पायरी -
येथे न थांबता साधकाने चिकाटीने नामस्मरण चालू ठेवले तर कुंडलिनी हृदयापर्यंत पोचते. तेथे एकीकडे आपल्या आराध्य दैवताचे सान्निध्य लाभते आणि दुसरीकडे जागेपणचा सबंध काळ नामाचे स्मरण टिकते. कधीकधी नामस्मरणातून दिव्य नाद ऐकू येतो. आराध्यदैवताच्या किंवा सद्‌गुरुंच्या मनोमय सान्निध्यातून त्यांच्याबद्दल नि:स्वार्थी प्रेम उदय पावते.

चवथी पायरी -
हृदयातून कुंडलिनी कंठात जाते. तेथे स्वप्नामध्ये व गाढ झोपेमध्ये नाम चालते. येथे किती वेळ तरी मानसपूजा चालते.

पाचवी पायरी -
कुंडलिनी दोन्ही भुवयांच्यामध्ये पोचते. तेथे ईश्वराचे सगुणदर्शन घडते. [कुंडलिनीचा दुसरा टप्पा]
कसोटी - येथे स्थिरावणे कठिण असते. लौकिकाची, सिद्धींची, श्रेष्ठपणाच्या कल्पनांची आकर्षणे विघ्ने आणून साधकाचे पाय खाली ओढतात.
संरक्षण – साधकाला श्रीसद्‌गुरुंचे संरक्षण लाभते.

सहावी पायरी -
येथपर्यंत फार थोडे जण येतात. साधक संपूर्ण शरणागत होऊन जातो. काही काळ तो भानावर असत नाही. पण मग देहावर येऊन अनेक जणांना नामाला लावतो.

॥ श्रीराम समर्थ॥

Monday, 12 December 2016

यमाई देवी स्तवन

कुलस्वामिनी - श्री यल्लम्मा/ यमाई देवी नमो नमः

जय जय यमाई कुलस्वामिनी, जय जयअंबा मूलपीठवासिनी l
जय जय भवानी भवमोचंनी, जय जय शिव मनरंजनी ll
तू ते आहे विश्वजननी , तुझी माया सहस्त्र गुणी l
सत्वर येऊनि रक्षण करुनी, पावन करी जगदंबे ll

ऐसे ऐकोनि करुणावाणी, सत्वर धावे जगत्रयजननी l
आले आले म्हणोनि, आकाश ध्वनी उठला ll
कवण्या दृष्टे माझा भक्त, गांजिला म्हणोनि अंबा तप्त l
धावे तेव्हा पाताळ सप्त, दणाणीले भयंकर ll

सिंहारुढ होऊनी जगज्जननी ,खड्ग झाडी क्षणोक्षणी l
पवन वेगे करुनि ,भक्त सदना पातली  ll
कोटी विजेचा काढिला गाभा ,कोटी वीजेची पडली प्रभा
ऐसी दैदिप्यमान अम्बा ,भक्ते दृष्टी देखिली ll

अज्ञान अंधकार सरला ,भक्त हृदयी आनंद झाला l
ज्ञानसूर्य प्रकाशला ,मनीचा गेला अहंभाव ll
चरणीची भूषणें करिती गजर
तेणेचि नादे प्राणा मुकले  असुर l
पायी ब्रीदाचा तोडर, तोचि तारी पतिता ll

कर्दळी गर्भाचे परी ,मांडीया कोमल वेश्टील्या चिरी l
क्षुद्र किँकिणिच्या हारी ,माजि बांधिला सुजडित ll
कोटी विजांचा भडीमार , तैसे तळपे कनकाम्बर l
नाभीपासुन मुक्ताहार ,गळा घातला अम्बेच्या ll

हृदय संधिमाजि पातक ,वाटे दडला तमांतक l
क्षिप्र सारूनिया देख हृदय निकटि संचला  ll
तडीत प्राय पीत कंचुकि,अनंत अयुधे अष्ट हस्तकी l
शशी सुर्य सुवर्ण पंकी ,जडली तानवडे  ll

वज्रचुडेमंडीत हस्त ,दशमुद्रिका लखलखीत l
कर्णि भूषणें असंख्यात,मुक्त घोस .डोलती ll
दैत्य मर्दिले प्रचंड ,स्फुरती अम्बेचे भुजदंड l
जे दंड करुनि अखंड ,दुष्ट मर्दीले पॄथ्वीचे  ll

सुहास्य मुख विशाल नयन, माजी सुदयाचे अंजन l
सरळ नासिका अससी सुमन, तेवी भान नेटके ll
कर्दळी कोंदणी सतेज, हिरे जोडीले मुखीचे द्विज l
किंवा डाळिंबीयाचे बीज, अधरपुटी जोडीले ll

जडीत नाकीचे सुपाणी, तेणे शोभली जगज्जननी l
कपाळी मळवट भरुनी, भव्य भवानी साजिरी ll
भांगी भरला आरक्त सिंदूर, कस्तुरी टिळक भाळावर l
वेष्टूनी बांधला कंबरीभार, वरी मुकुट साजिरा ll

जैसे ओळीने जोडीले भास्कर ,तैसे मुकूटमणी अपार l
मयूरपिच्छे मुकुटावर, तुरा खोविला अंबेने ll
कवडी दर्शनाचा हार, अपार रुळती धरणीवर l
ऊर्ध्व हस्ते त्रिशूळ डोर, झेलीत असे जगदंबा ll

ऐसी भगवतीची मूर्ती, निजभक्ते देखिली अवचिती l
नमस्कारुनी परम प्रीती,चरण धरिले अंबेचे ll
कंठ दाटला प्रेम भरून, मुखी न निघे काहि वाचन l
नयनोदके चरणक्षालन, दाटला पूर्ण गहिवरे ll

ऐसे देखोनि तत्क्षणी, प्रसन्न झाली त्रिजगज्जननी l
मस्तकी ठेविला वरदपाणी, अमृतवाणी बोलली ll
आता माग इच्छित मना, जे तव असेल मनकामना l
ते पूर्ण करीन जाण मना, न सरे सहसा दुसरेने ll

आत्मानुभवे बोले वचन, तू न जाय माझे हृदयातून l
म्यां तुझे जे केले स्तवन, त्या स्तवनी प्रीत राहो तुझी ll
माता पिता देव गुरू, यांचे सेवेत बैसो अत्यादरु l
तुझ्या कृपेने आयुष्य मेरू, न ढळे ऐसे तू करी ll

दिधले म्हणोनि बोले वाणी, आता तू न भी अंतःकरणी l
तुझ्या मनीची इच्छा झणी, पूर्ण केली निर्धारें ll
ऐसे बोलोनि वरद वाणी, प्रसन्न मुख जगज्जनंनी l
भक्तांचीये हृदय सदनी, तैसीच मूर्ती ठसावली ll

मूळपीठ ते भक्त हृदये, तेथे अक्षय मूळ माये l
वास्तव करुनी नांदे स्वये, सह योगिनी समवेत ll
करुनी साष्टांग नमस्कार,विनंती करी वारंवार l
ऐसेच अंबेने निरंतर, मम हृदयी वसावे ll

इति श्री देवी भगवते, यल्लम्मा, यमाई  महात्मे
तुरजा यमाई स्तोत्र सपूर्णमस्तु,  ओम तत्सत
श्री जगदंबा यमाई तुरजांबार्पणमस्तु l शुभं भवतु ll

तेरे नाम का सुमिरन कर के मेरे मन में सुख भर आया l

तेरे नाम का सुमिरन करके मेरे मन मे सुख भर आया l
तेरी कृपा को मैंने पाया, तेरी दया को मैंने पाया ll धृ ll

दुनिया की ठोकर खा कर ,जब हुआ कभी बेसहारा l
ना पाकर अपना कोई, जब मैंने तुम्हे पुकारा l
हे नाथ मेरे सिर ऊपर ,तुने अमृत बरसाया  ll1ll

तू संग में था नित मेरे , ये नैना देख ना पाये l
चंचल माया के रंग में ,ये नैन रहे उलझाये l
जितनी भी बार गिरा हूँ, तुने पग पग मुझे उठाया ll2ll

भवसागर कि लहरों में, भटकी जब मेरी नैया l
तट छूना भी मुश्किल था, नहीं दिखा कोई खिवैया l
तू लहर बना सागर की मेरी नाव किनारे लाया ll3ll

तुने ज्ञान कि ज्योत लागा दी, अज्ञान दूर किया मेरा l
जब मिला सहारा मेरा, छुटा जनम मरण का फेरा l
तेरे चरणो में सत्गुरूजी, मैंने मोक्ष धाम को पाया ll4ll

तेरे नाम का सुमिरन करके ,  मेरे मन में सुख भर आया l
तेरी कृपा को मैंने पाया, तेरी दया को मैंने पाया ll

तुने मुझे बुलाया शेरावालीये

तुने मुझे बुलाया शेरा वालीये मै आया मै आया शेरावालीये वो पहाडा वालीये वो ज्योतीवालीये वो मेहरा वालीये, तुने मुझे || धृ || सारा जग है एक बंजारा, सबकी मंझिले तेरे द्वारा उंचे पर्वत लंबारस्ता, उंचे पर्वत लंबारस्ता फिर मै रहना पाया शेरावालीये || १ || कौन है राजा कौन भिकारी, एक बराबर सारे पुजारी तुने सबको दर्शन देके, अपने गले लगाया, शेरा वालीये || २ || सुने मनमे जल गयी बाते, तेरे पथपे मिल गये साथी मुंह खोलू क्या तुझसे मांगु, बिन मांगे सब पाया, शेरा वालीये || ३ ||