Saturday, 24 June 2017

Vaidya Rupali panse nashta teaps

*"तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका, आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणता .. अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?"*
असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून, निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना ही पोस्ट समर्पित आहे.

अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २८ शाकाहारी चविष्ट आणि तरीदेखील पौष्टिक पदार्थांची  यादी देत आहे. महिना तर ३०/३१ दिवसांचा मग एक दोन पदार्थ कमी का ?
उत्तर पोस्ट च्या तळाशी सापडेल ..

अहं! आधी पोस्ट पूर्ण वाचा .. 

माझे अमहाराष्ट्रीय पेशंट सुद्धा समजावून सांगितले की, हे पदार्थ आवडीनें करून खातात ..

त्यामुळे व्यर्थ कारणें/सबबी  मराठी लोकांनी तरी देऊ नयेत ..

*नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ (सहज, सोपे, कमीत कमी वेळेत होऊ शकणारे ..)*

*(लेखिका : वैद्य - रुपाली पानसे, आद्यं आयुर्वेद , पुणे)*

१.भाज्या आणि मिश्र पीठ वापरून कोथिंबीर वडीप्रमाणे वाफवून वडी अथवा बट्ट्या (पुदिना/लसूण/खोबरे/तीळ चटणी बरोबर ..)

२. मिश्र भाज्यांचा पराठा - साजूक तूप

३.मिश्र भाज्यांचे (किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.) थालीपीठ धिरडे आणि ताक)
 
४. मटार, मका, घेवडा, खोबरे, डाळ्या, टोमॅटो आणि इतर भाज्या वापरून पोहे/उपमा.

५. फोडणीची ताक भाकरी.

६. ओले खोबरे, डाळ्या, शेंगदाणे मटार टाकून तांदळाचे उपजे

७. भाकरी गूळ तुपाचा लाडू.

८. दडपे पोहे - भरपूर ओले खोबरें, कोथिंबीर, कांदा तसेच लिंबाचा रस टाकून

९. किंचित साजूक तुपाचा कणकेचा केळी घालून शिरा.

१०. नाचणीची उकड

११. नाचणीची भाकरी व खोबरे चटणी.

१२. शिजवलेल्या हिरव्या मुगाची मिसळ - कांदा, टोमॅटो शेव घालून 

१३. ओले खोबरे वापरून साबुदाणा खिचडी

१४. खारीक, खोबरं, डिंक मेथीचा पौष्टिक लाडू आणि सूंठ घालून गरम दूध .

१५. मिश्र पिठाचा ढोकळा - पुदिना जवस चटणी बरोबर

१६. तांदुळाचे घावन (डोसा/पॅनकेक)

१७. मिश्र पिठाचे धिरडे व चटणी

१८. मोड आलेल्या हिरव्या शिजवलेल्या मुगाचा डोसा /इडली /अप्पे इ.

१९. गव्हाच्या दलियाची गुळाची गरम लापशी

२०. ओले खोबरें, मटार, मका, भाज्या, हिरवी मिरची इ. घालून फोडणीचा, गव्हाचा दलिया

२१. खमंग भाजलेल्या गव्हाच्या पिठाची झणझणीत उकडपेंडी

२२. गुळाचा राजगिरा लाडू/चिक्की दुधाबरोबर

२३. सालीच्या लाहीचा चिवडा - कांदा, टोमॅटो, शेव घालून -  भेळेसारखा

२४. फोडणीच्या तिखट शेवया 

२५. रताळ्याचे पॅटिस (गाजर व इतर भाज्या वापरून )

२६. रताळ्याची गुळ घालून खीर अथवा शिरा 

२७. मुगाची डाळ शिजवून, त्यात कणिक मिश्र करून केलेला पौष्टिक पराठा

२८. फोडणीची भगर आणि ताक.

*२९, ३० वा पदार्थ जाहीर नाही कारण, जर २८ दिवस हे पदार्थ तुम्ही नेमाने, आळीपाळीने  खाल्ले तर २  दिवस तुमच्या हक्काचें असतील ..*

भरपूर बटर लावून ब्रेड, टोस्ट खा किंवा, वैशाली, वाडेश्वर अथवा तत्सम ठिकाणीं जाऊन इडली, डोसा, उडीद वडा इत्यादींचा आनंद घ्या ..

*वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८*

*(वाटल्यास .. कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी. तुमच्या या कृतीने, लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल. धन्यवाद !!!)*

Sri suktam

*।। श्री सूक्त  🌸🌺🙏🏻🙏🏻।।*

🌸ॐहिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो  मsआवह ।। १ ।।
🌸 तां मsआवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ।। २। ।
🌸  अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रमोदिनीम् । श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ।। ३ ।।
🌸 कांसोस्मि तां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् । पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ।। ४ ।।
🌸 चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् । तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ।। ५ ।।
🌸 आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः।  तस्य फलानि तपसा नुदन्तु-  मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ।। ६ ।।
🌸 उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह । प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेस्मिन्कीर्तिमृद्धिं ददातु मे ।। ७ ।।
🌸 क्षुत्पिपासामलां ज्येष्ठा-  मलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।  अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुदमे गृहात् ।। ८ ।।
🌸 गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् । ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ।। ९ ।।
🌸 मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि । पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ।। १० ।। 🌸 कर्दमेन प्रजाभूतामयि सम्भवकर्दम । श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ।। ११ ।।
🌸 आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले ।। १२ ।।
🌸आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं सुवर्णां हेममालिनीम् । सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मSआवह ।।१३ ।।
🌸  आर्द्रां यःकरिणीं यष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् । चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मSआवह ।। १४ ।।
🌸 तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदास्यो श्वान्विन्देयं पुरुषानहम् ।। १५ ।।
🌸 यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् । सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ।। १६ ।।
🌸 पद्मानने पद्म ऊरू पद्माक्षी पद्मसम्भवे । तन्मेभजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ।। १७ ।। 🌸 अश्वदायी गोदायी धनदायी महाधने । धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे ।।१८।।
🌸 पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि । विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ।।१९ ।।
🌸  पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम् । प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे ।। २० ।।
🌸 धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः । धनमिन्द्रो बृहस्पति र्वरुणं धनमस्तु ते ।। २१ ।।
🌸 वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा । सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ।। २३ ।।
🌸 न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः । भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ।। २४ ।।
🌸 सरसिजनिलये सरोजहस्ते ,  धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे ।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे ,  त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ।। २५।।
🌸  विष्णुपत्नीं क्षमादेवीं माधवीं माधवप्रियाम् । लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ।। २६ ।।
🌺  महालक्ष्मी च विद्महे ,  विष्णुपत्नी च धीमहि । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्  ।।२७।।
( 🌼 ऋणरोगादि दारिद्य पापंक्षुदपमृत्यवः । भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा ।। )
🌺 श्रीवर्चस्व मायुष्यमारोग्यमा विधाच्छोभमानं महीयते । धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ।। २८ ।।  👏🏻👏🏻👏🏻👏🏻

     *श्री स्वामी समर्थ*
💐🚩🌿🙏🏻🙏🏻🌿🚩💐

Thursday, 22 June 2017

Nirogdham patrika

*🍁 निरोगधाम पत्रिका 🍁*
        🙏🏻जीवनोपयोगी🙏🏻

1. *सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?*
उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी.

2. *पिण्याचे पाणी कसे प्यावे?*
उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे.

3. *जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?*
उत्तर. - 32 वेळा.

4. *पोट भरून जेवण केव्हा करावे?*
उत्तर. - सकाळी.

5. *सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.

6. *सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - ज्यूस

7. *दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - लस्सी किंवा ताक.

8. *रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - दूध

9. *आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?*
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

10. *आईसक्रीम केव्हा खावी?*
उत्तर. - कधीही नाही.

11. *फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?*
उत्तर. - 1 तासानंतर

12. *शीतपेय प्यावे का?*
उत्तर. - अजिबात नाही.

13. *तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?*
उत्तर. - 40 मिनिटांंत

14. *दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?*
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.

15. *रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?*
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी

16. *जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?*
उत्तर. - 48 मिनिटे अगोदर

17. *काय रात्री लस्सी पिऊ शकतो?*
उत्तर. - नाही

18. *सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - काम

19. *दुपारच्या जेवनानंतर काय करावे?*
उत्तर. - विश्रांती

20. *रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

21. *जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?*
उत्तर. - वज्रासन

22. *जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?*
उत्तर. - 5 -10 मिनिटे

23. *सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?*
उत्तर. - तोंडाची लाळ

24. *रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?*
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त

25. *तीन विष कोणते?*
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.

26. *जेवण किती प्रमाणात असावे?*
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

27. *रात्री सलाड खावे का?*
उत्तर. - नाही.

28. *जेवण नेहमी कसे करावे?*
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

29. *विदेशी पदार्थ खरेदी कराव का?*
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.

30. *चहा केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कधीच नाही.

31. *दुधात नेहमी काय टाकून प्यावे?*
उत्तर. - हळद

32. *दूधात हळद टाकून का प्यावे?*
उत्तर. - कैंसर न होण्यासाठी

33. *कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?*
उत्तर. - आयुर्वेद

34. *सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते?*
उत्तर. - ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)

35. *तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?*
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

36. *माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)

37. *सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कमीत कमी 2 - 3 ग्लास

38. *पहाटे केव्हा उठावे?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.

ह्या टिप्स आपल्या निरोगी आरोग्यसाठी बहुमूल्य  आहेत . तुम्ही आमच्या जीवाभावाची प्रेमळ माणसं आहात म्हणून आमच्या प्रेमापोटी ह्या टिप्सचा वापर करुन आपले आरोग्य सुदृढ़ कराल हिच नम्र विनंती . लोभ असावा.🙏

Tuesday, 6 June 2017

महालक्ष्मी अष्टक

महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी असून भक्तावरील सर्व प्रकारची संकटे दूर करून संकटांचा सर्वनाश करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे.

हे स्तोत्र अनन्य भावाने म्हटले असता
           " माता महालक्ष्मी प्रसन्न "
झाल्यावाचून राहणार नाही.

            ॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥

                  श्री गणेशाय नमः

नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥ 

नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥ 

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥ 

सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥ 

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥ 

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥ 

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥ 

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥ 

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥ 

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

   ॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्ण:॥

ॐ महालक्ष्मीच् विद्महे |विष्णू पत्नी ह् धीमहि |तन्नो: लक्ष्मी प्रचोदयात् ||

निघालो घेऊन दत्ताची पालखी

निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||

रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||

सात जन्माचि हो लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||

वात वळणाची जवालागे ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||

जय मल्हार

► कडेपठारचा राजा मार्तंड माझा◄
पुण्यनगरी दक्षिण दिशेसी
मल्हारी वस्तीस जयाद्री गडासी
सदा भरतो दास-भक्ताचा मेळा
देवाच्या अंगी शोभे लाल शेला
सदा भंडार-खोबर्याचा भडीमार
बेल दवणा पुष्प करती कुलाचार
बानु म्हाळसा नारं देवासोबती
गळ्यात माळ फुलाई घालती
करी नित्य आपुल्या भक्ताचा संभाळ
मालुचे नाम बहु आहे मधाळ
देवाचा सोहळा निघे सोमवती
कह्रे प्रती जाउनी रंभाईस भेटती
मल्हार मल्हार वाचे घोकसी
जन्म मरणाचा फेर्यातुन सुटसी

जय मल्हार

Thursday, 1 June 2017

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली

आठवणीतील गाणी❤️

केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा फसवून रात गेली !

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात गेली !

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - पद्मजा फेणाणी-जोगळेकर
चित्रपट - निवडूंग
राग - दुर्गा
गीत प्रकार - चित्रगीत ,  शब्दशारदेचे चांदणे ,  नयनांच्या कोंदणी