Sunday, 9 July 2017

गणेश चालिसा ।


जय गणपति सदगुण सदन,
कविवर बदन कृपाल,
विघ्न हरण मंगल करन,
जय जय गिरिजालाल

जय जय जय गणपति गणराजू,
मंगल भरण करण शुभः काजू,
जय गजबदन सदन सुखदाता,
विश्व विनायका बुद्धि विधाता

वक्रतुंडा शुची शुन्दा सुहावना,
तिलका त्रिपुन्दा भाल मन भावन,
राजता मणि मुक्ताना उर माला,
स्वर्ण मुकुता शिरा नयन विशाला

पुस्तक पानी कुथार त्रिशूलं,
मोदक भोग सुगन्धित फूलं,
सुन्दर पीताम्बर तन साजित,
चरण पादुका मुनि मन राजित

धनि शिव सुवन शादानना भ्राता,
गौरी लालन विश्व-विख्याता,
रिद्धि सिद्धि तव चंवर सुधारे,
मूषका वाहन सोहत द्वारे

कहूं जन्मा शुभ कथा तुम्हारी,
अति शुची पावन मंगलकारी,
एक समय गिरिराज कुमारी,
पुत्र हेतु तप कीन्हा भारी

भयो यज्ञ जब पूर्ण अनूपा,
तब पहुँच्यो तुम धरी द्विजा रूपा,
अतिथि जानी के गौरी सुखारी,
बहु विधि सेवा करी तुम्हारी

अति प्रसन्ना हवाई तुम वरा दीन्हा,
मातु पुत्र हित जो टाप कीन्हा,
मिलही पुत्र तुही, बुद्धि विशाला,
बिना गर्भा धारण यही काला

गणनायक गुण ज्ञान निधाना,
पूजित प्रथम रूप भगवाना,
असा कही अंतर्ध्याना रूप हवाई,
पालना पर बालक स्वरूप हवाई

बनिशिशुरुदंजबहितुम थाना,
लखी मुख सुख नहीं गौरी समाना,
सकल मगन सुखा मंगल गावहीं,
नाभा ते सुरन सुमन वर्शावाहीं

शम्भू उमा बहुदान लुतावाहीं,
सुरा मुनिजन सुत देखन आवहिं,
लखी अति आनंद मंगल साजा,
देखन भी आए शनि राजा

निज अवगुण गाणी शनि मन माहीं,
बालक देखन चाहत नाहीं,
गिरिजा कछु मन भेद बढायो,
उत्सव मोरा न शनि तुही भायो

कहना लगे शनि मन सकुचाई,
का करिहौ शिशु मोहि दिखायी,
नहीं विश्वास उमा उर भयू,
शनि सों बालक देखन कह्यौ

पदताहीं शनि द्रिगाकोना प्रकाशा,
बालक सिरा उडी गयो आकाशा,
गिरजा गिरी विकला हवाई धरणी,
सो दुख दशा गयो नहीं वरनी

हाहाकार मच्यो कैलाशा,
शनि कीन्हों लखी सुत को नाशा,
तुरत गरुडा चढी विष्णु सिधाए,
काटी चक्र सो गजशिरा लाये

बालक के धड़ ऊपर धारयो,
प्राण मंत्र पढ़ी शंकर दारयो,
नाम’गणेशा’शम्भुताबकीन्हे,
प्रथम पूज्य बुद्धि निधि वर दीन्हे

बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा,
पृथ्वी कर प्रदक्षिना लीन्हा,
चले शदानना भरमि भुलाई,
रचे बैठी तुम बुद्धि उपाई

चरण मातु-पितु के धारा लीन्हें,
तिनके सात प्रदक्षिना कीन्हें
धनि गणेशा कही शिव हिये हरष्यो,
नाभा ते सुरन सुमन बहु बरसे

तुम्हारी महिमा बुद्धि बढाई,
शेष सहसा मुख सके न गई,
मैं मति हीन मलीना दुखारी,
करहूँ कौन विधि विनय तुम्हारी

भजता ‘रामसुन्दर’ प्रभुदासा,
जगा प्रयागा ककरा दुर्वासा,
अब प्रभु दया दीना पर कीजै,
अपनी भक्ति शक्ति कुछा दीजै

ll दोहा ll

श्री गणेशा यह चालीसा, पाठा कर्रे धरा ध्यान l
नीता नव मंगल ग्रह बसे, लहे जगत सनमाना ll
सम्बन्ध अपना सहस्र दश, ऋषि पंचमी दिनेशा l
पूर्ण चालीसा भयो, मंगला मूर्ती गणेशा ll

Saturday, 1 July 2017

असा हा एकच श्री हनुमान

तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान्‌

भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघुनि
गरुड उभारी पंखां गगनीं
गरुडाहुन बलवान्‌

अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्तीनें ताडिल दिग्गज
बलशाली धीमान्‌

सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिशत योजनें नभीं उडाला
समजुनिया फळ रविबिंबाला
धरुं गेला भास्वान्‌

बाल-वीर हा रवितें धरितां
भरें कापरें तीन्ही जगतां
या इवल्याशा बाळाकरितां
वज्र धरी मघवान्‌

देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होय हनुतें

कोप अनावर येइ वायुतें
थांबे तो गतिमान्‌

पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पुत्रातें वर त्याच्या देउन
गौरविती भगवान्‌

शस्त्र न छेदिल या समरांगणिं
विष्णुवरानें इच्छामरणी
ज्याच्या तेजें दिपे दिनमणी
चिरतर आयुष्मान्‌

करि हनुमन्ता, निष्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा

उचल एकदां पद वामनसा
घे विजयी उड्डाण

Thursday, 29 June 2017

Bawanshloki gurucharitra

#ब्रह्मांडनायक बावन्न श्लोकी गुरुचरित्र

🌰🌼🌰🌼🌰🌼🌰🌼🌰

*🍀बावन्नश्लोकी गुरुचरित्र🍀*

🍁श्रीगुरुचरित्र फार मोठे असल्यामुळे गुरुवारी कमीत कमी हे बावन्नश्लोकी गुरुचरित्र म्हणतात
🌼🌼
श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रेयगुरवे नमः । अथ ध्यानम् ।

श्‍लोक: दिगंबरं भस्मसुगंध लेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च । पद्मासनस्थं रविसोमनेत्र्म दत्तात्रयं नमभीष्टसिद्धिदम् ॥ १ ॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः । द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥ ३ ॥

🌼🌼
ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥ श्‍लोक ॥

त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरीं वास करुनि बोजा । सद्भक्त तेथें करिती आनंदा । त्या देव स्वर्गीं बघती विनोदा ॥ २ ॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी । संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥ ३ ॥

ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥ ४ ॥

भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥ ५ ॥

तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥

ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं । वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥ ७ ॥

गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्‍ती । तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥

श्रीपाद कुरवपुरीं असताम । पुढें वर्तली कैसी कथा । विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची॥ ११ ॥

श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥ १२ ॥

श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥

ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥ १४ ॥

ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥ १५ ॥

विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत । सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥

ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥ १७ ॥

ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्‍ति नोहे अंतःकरणीं कथामृत संजीवनी । आणिक निरोपाची दातारा ॥ १८ ॥

अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त । श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥ १९ ॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥ २० ॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥ २१ ॥

तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां । परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥ २२ ॥

लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्‍तीसीं । नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥ २३ ॥

शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी । ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला । सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥ २५ ॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्‍तीसी । वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥

चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥ २७ ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥

पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । निरुपावें विस्तारीं । सिद्धमुनी कृपासिंधू ॥ २९ ॥

श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस । परि तृ‍प्‍त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥

पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती । सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥ ३२ ॥

श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥ ३३ ॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि । तया काश्‍मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥ ३४ ॥

पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली । मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु । सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥ ३६ ॥

ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु । सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥ ३७ ॥

आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥ ३८ ॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥

सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका । वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी । नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥ ४१ ॥

मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले । श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥ ४२ ॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥ ४३ ॥

श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन । आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥ ४४ ॥

तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥

सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र । ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥ ४७ ॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी । मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥

त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर । राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥ ४९ ॥

तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥ ५० ॥

राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥ ५१ ॥

म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥ ५२ ॥

🌼🌼
इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्‍लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥

🌺🌺🌺🌺🌺

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।

Monday, 26 June 2017

Owa 25 useful steps

*ओव्याचे 25 उपयोग*,

या आजारांमध्ये मिळेल
त्वरित आराम

स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व
खुप असते . याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर
हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला
जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे.
आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छाती
चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे.
यासोबतच उचकी, ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते.
ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17
टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम,
सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड
कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर,
सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये
मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट
थाइमोल असते.

1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम
पाणी प्या.

2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे
मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यत
टाकुन दिवसातुन 4-5 वेळा घ्या. पोट दुखी होणार नाही.

3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा
ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील
जंत नष्ट होतील.

4. 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे
रोग दुर होतील.

5. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि एक चिमुट काळे
मीठ मिळवुन खा. यामुळे लवकर आराम मिळेल.

6. 5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकुन सेवन करा. महिन्यातुन पाच
वेळा असे केल्याने मुतखडा कधीच होणार नाही आणि असेल
तर निघुन जाईल.

7. तोंडले, ओवा, अद्रक आणि कापुर यांना समान प्रमाणात
घेऊन कुटून घ्या. एका सूती कपड्यात गुंडाळुन थोडे गरम करा
सुजलेल्या भागावर हळु-हळू शेकल्यामुळे सुज कमी होईल.

8. दारुची सवय मोडण्यासाठी दिवसातुन प्रत्येक दोन
तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल.

9. ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन
वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतिल.
दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने
गुळण्या करा. दात दुखणे थांबेल.

10. आजवान बारीक करुन खोब-याच्या तेलात टाका आणि
हे तेल कपाळावर लावा , डोके दु:खी थांबेल.

11. ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री
झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या
लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

12. दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगच्या समान
प्रमाण असलेले चुर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा
एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळुन त्याचा धुर केला तर
दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

13. ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन
करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल.

14. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस
मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा.

15. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत
एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या.

16. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून
खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल.

17. ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने
कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त
ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल.

18. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात
गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल.

19. जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी
आणि अॅसिडिटीपासुन आराम मिळेल.

20. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि
डोकेदुखीपासुन आराम मिळेल.

21. पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील
मुरडा आणि अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

22. 1 ग्रॅम भाजलेला ओवा पानमध्ये टाकुन जावल्याने अपचन
पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरिराला थोडी गर्मी
देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा.

23. 1 चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन
घ्या. मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर
मिळवून प्यायल्याने अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

24. कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून
खाल्ल्याने आराम मिळेल. झोप न येण्याची समस्या असेल तर
2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली येईल.

25. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक
करुन तेथे लावा आणि 4-5 तास लावुन ठेवा. यामुळे फायदा
होईल.

Sant dyaneshwar

ज्ञानेश्वरांना...

आज तुला बघ लाख फुलांनी
सजवून निघते वारी
शब्दांचे चटकेच मिळाले
तेंव्हा दारोदारी.

माय-तातही गेले सोडून
जन्म पोरका झाला
बघून तुम्हा परंतु नाही
कुणा उमाळा आला.

काळीज रडले तुझे तेधवा
लावलीस तू ताटी
आणि भाजले मांडे तेंव्हा
मुक्ताईने पाठी.

इंद्रायणीही मुकाटपणी बघ
वहावयाची जेव्हा
गळामिठी भीमेस देवुनी
रडावयाची तेव्हा.

अन्न, वस्त्र अन् निवार्यासही
खरेच नव्हते काही
जनकल्याणच दिसायचे तुज
दिशांत तेव्हा दाही.

सोस-सोसुनी कस सोन्याचा
तुम्हीच केला सिद्ध
आज जाहली तिथे आळंदी
तुम्हामुळेच प्रसिद्ध.

इवले इवले जीव तुम्ही पण
जगास जिंकून गेला
अता फुलांच्या पालखीवरी
असतो सुवर्ण शेला.

तुमच्यावरती ओवाळाव्या
पोथ्या, सर्व पुराणे
कंठामध्ये तुमच्या रुजले
अध्यात्माचे गाणे.

ज्ञानाचा तो वृक्ष तुझ्या बघ
चिरंतनाचा झाला
तुझ्या समाधीवरती देवा
अता फुलोरा आला.

.... डॉ. सुनंदा शेळके....

Sunday, 25 June 2017

Jejuri khandoba arati

जेजुरीच्या खंडोबाची आरती
जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नाना परिची रचना रचली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्हारी तूचि प्रचंडा ॥ जय देव जय देव ॥धृ.॥
मणिमल्ल दैत्य प्रबल तो जाहला ।
त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरदे मातला ।
देवगण गंधर्व कापती त्याला ॥ जय देव ॥२॥
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥
चरणी पृष्ठी खड्गे वर्मी स्थापिसी ।
अंती वर दे दैत्या मुक्ती पै देसी ॥ जय देव जय देव ॥३॥
मणिमल्ल नामे मल्लारी देवा ।
संकट पडले आहे जेजुरी ॥
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाव मागे दास नरहरी ॥......Suprabhat.