Saturday, 5 August 2017

निरोगधाम पत्रिका

*🍁 निरोगधाम पत्रिका 🍁*
        🙏🏻जीवनोपयोगी🙏🏻

1. *सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?*
उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी.

2. *पिण्याचे पाणी कसे प्यावे?*
उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे.

3. *जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?*
उत्तर. - 32 वेळा.

4. *पोट भरून जेवण केव्हा करावे?*
उत्तर. - सकाळी.

5. *सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?*
उत्तर. - सूर्य उगवल्यानंतर अडीच तासापर्यन्त.

6. *सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - ज्यूस

7. *दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - लस्सी किंवा ताक.

8. *रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - दूध

9. *आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?*
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

10. *आईसक्रीम केव्हा खावे ?*
उत्तर. - कधीही नाही.

11. *फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?*
उत्तर. - 1 तासानंतर

12. *शीतपेय प्यावे का?*
उत्तर. - अजिबात नाही.

13. *तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?*
उत्तर. - 40 मिनिटांत

14. *दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?*
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.

15. *रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?*
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी

16. *जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?*
उत्तर. - 48 मिनिटे अगोदर

17. *काय रात्री लस्सी पिऊ शकतो?*
उत्तर. - नाही

18. *सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - काम

19. *दुपारच्या जेवणानंतर काय करावे?*
उत्तर. - विश्रांती

20. *रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

21. *जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?*
उत्तर. - वज्रासन

22. *जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?*
उत्तर. - 5 -10 मिनिटे

23. *सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?*
उत्तर. - तोंडाची लाळ

24. *रात्री कधी  झोपावे?*
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त

25. *तीन विष कोणते?*
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.

26. *जेवण किती प्रमाणात असावे?*
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

27. *रात्री सलाड खावे का?*
उत्तर. - नाही.

28. *जेवण नेहमी कसे करावे?*
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

29. *विदेशी पदार्थ खरेदी कराव का?*
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.

30. *चहा केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कधीच नाही.

31. *दुधात नेहमी काय टाकून प्यावे?*
उत्तर. - हळद

32. *दूधात हळद टाकून का प्यावे?*
उत्तर. - कैंसर न होण्यासाठी

33. *कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?*
उत्तर. - आयुर्वेद

34. *सोन्याच्या भांड्यातील पाणी  केव्हा पीणेे चांगले असते?*
उत्तर. - ऑक्टोबर ते मार्च (हिवाळयात)

35. *तांब्याच्या भाड्यातील पानी केव्हा पिणे चांगले असते?*
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

36. *माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)

37. *सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कमीत कमी 2 - 3 ग्लास

38. *पहाटे केव्हा उठावे?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.

ह्या टिप्स आपल्या निरोगी आरोग्यसाठी बहुमूल्य  आहेत . तुम्ही आमच्या जीवाभावाची प्रेमळ माणसं आहात म्हणून आमच्या प्रेमापोटी ह्या टिप्सचा वापर करुन आपले आरोग्य सुदृढ़ कराल हिच नम्र विनंती . लोभ असावा.🙏

Thursday, 3 August 2017

स्वामी काकड़ आरती, तारक मंत्र, स्तोत्र

आजच्या सुदंर दिवसाची सुरवात
श्री स्वामी समर्थांच्या काकड आरतीने
आणि श्री स्वामी समर्थ तारक मंञाने करूया........
काकड आरती : श्री स्वामी समर्थांनचि.

ओवाळीतो काकड आरती ।
स्वमिसमार्था तुज प्रती ॥
चरण दावे जगत्पते ।
स्तवितो तुझी आदिमुर्ती ॥धृ॥
भक्तजन येउनिया । द्वारी उभे स्वामीराया ।
चरण तुझे पहावया ।तिष्ठती अतिप्रती ॥ओ ॥१!॥
भक्तांच्या कैवारे समर्थ निर्धारे ।
हात ठेउनिया चरणावरी ॥
गातो आम्ही तुझी स्तुती ॥ओ ॥२॥
पूर्णब्रम्ह देवाधिदेव ।निरंजना तुझा ठाव ॥ भक्तांसाठी देहभाव ।धरिसी तू विश्वपती ॥ओ॥३॥
स्वामी तूची कृपाधन । उठोनी देई दर्शन ॥
स्वमिदास चरण वंदून ।मागतसे भावभक्ती
॥ओ॥४॥
=======================

         ॥ श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ॥

नि:शंक हो । निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ॥
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥१॥
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय । स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ॥
आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला । परलोकी ही ना भीती तयाला ॥2॥
उगाची भीतोसी भय हे पळू दे । जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे॥
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा । नको घाबरू तू असे बाळ त्याचा ॥३॥
खरा होई जागा । श्रद्धेसहित । कसा होशी त्याविणा । तू स्वामीभक्त ॥
कितीदा दिला बोल त्यांनीच हात । नको डगमगू । स्वामी देतील साथ ॥४॥
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ । स्वामीच या पंचप्राणामृतात ॥
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती । न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ॥५॥

    ।। ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ ।।
ॐ श्री सदगुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ....॥
॥अनंत कोटी ब्रम्हांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री पाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरूदेव दत्त समर्थ॥
      ॥अवधुत चिँतन श्री गुरूदेव दत्त ॥

        ॥  श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ॥

     ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: ।

ॐनमो श्रीगजवदना ।गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा।नमन माझे
साष्टागी॥ १॥
नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती । ब्रम्ह्य कुमारी वीणावती । विद्यादात्री विश्वाची ॥२॥
नमन तैसे गुरुवर्या । सुखनिधान सदगुरुराया। स्मरूनी त्या पवित्र पायां । चित्तशुध्दी जाहली ॥३॥
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि
सज्जन । करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभिली ॥४॥
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां । स्तोत्र महात्म्य तुमचे गावया। प्रारंभ आता करतो मी ॥५॥
नांव गांव खुद्द स्वामींचे । किंवा त्यांच्या मातापित्यांचे ॥ कोणालाच ठाऊक नाही
साचें । अंदाज मात्र अनेक ॥६॥
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें । तीच सत्य मानुनी प्रत्येकाने। समाधान मानावे ॥७॥
म्हणे उत्तर भारती एका स्थानी । घनदाट कर्दळीच्या बनीं । स्वामी प्रगटले वारुळांतुनी। लाकुडतोड्याच्या निमित्ताने ॥८॥
कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण । आगळी ती अवतार खूण । प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी ॥९॥
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण । तेव्हां दिलें उत्तर छान । स्वमुखेंच समर्थानी ॥१०॥
मी यजुवेदी ब्राम्हण । माझे नांव नृसिंहभान । काश्यप गोत्र राशी मीन । ऐसें स्वामी
म्हणाले ॥११ ॥
खरें खोटें देव जाणे । बरें नाही खोलांत
शिरणें ।ईश्ववरी करणीची कारणें । आपण काय शोधावी ॥१२॥
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण । नरदेह तरीही केला धारण । सकळं भूप्रदेश केला पावन । आपुल्या चरणस्पर्शाने ॥१३॥
नंतर स्वामी निघाले तिथून । तीर्थयात्रेसी केले प्रयाण। दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण । प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें ॥१४॥
दत्तवास्तव्य जेथे निरंतर । तो थोर पर्वत गिरनार । तेथेच गेले अगोदर । नंतर फिरले इतरत्र ॥१५॥
यात्रेचे प्रवास संपले । तेव्हा मंगळवेढ्यासी आले । खतेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गांवात ॥१६॥
काही काळ तिथे गेला । पुण्यवंतांना प्रभाव कळला । जनसमुदाय भजनीं लागला । साक्षात्कारी यतीच्या ॥१७ ॥
पुढे अक्कलकोट हें । वास्तव्याचे झाले ठिकाण । अखेरपर्यंत तिथेंच राहून । अनंत लीला दाखविल्या ॥१८॥
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे । आजानुबाहू कौपिन छोटे । दिगंबर असती अनेकदां ॥१९॥
स्वामी समर्थ अक्कलकोटचे । चवथे अवतार दत्तात्रयाचे । तीन अवतार यापूर्वीचे । गुरुचरित्री वर्णिले ॥२०॥
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ । नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ ।गाणगापूर दर्शन देवदुर्लभ । जागृत दत्तस्थान ते॥२१॥
तेथे होउनी साक्षात्कार । पहावयासी येती चवथा अवतार।अक्कलकोट पुण्यभूमि थोर। जेथे प्रत्यक्ष दत्त वसे॥२२ ॥
अक्कलकोटी नित्य राहूनी । अगाध गूढ लीला करूनी । भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा ॥२३॥
नास्तिक होते कोणी त्यांना । चमत्कार दाखविले नाना । शेवटी कराया क्षमायाचना॥ लागले स्वामी चरणांसी ॥२४॥
स्वामी सर्वसाक्षी उदार । साक्षात दत्ताचे अवतार । कधी सौम्य कधी उग्रतर । स्वरुप दाविलें दासांना ॥२५॥
ज्यांनी त्यांची सेवा केली । त्यांची कुळे पावन झाली । जन्मोजन्मीची पापें जळली । पुण्यराशी मिळाल्या ॥२६॥
सत्पुरुषाची करणी अगाध । वाणी गूढ निर्विवाद । झाल्याविण कृपाप्रसाद । अर्थ त्याचा समजेना ॥२७॥
स्वामींचे बोलणे थोडें । जणूं काय कठीण कोडें । अर्थ काढावे तितुके थोडे । त्यात भविष्य असे भरलेलें ॥२८॥
जाणणारे तेच जाणिती । घेती त्यांच्या संकेताची प्रचिती । ज्याचा तोच उमजे चित्तीं। इतरां अर्थबोध होईना ॥२९॥
कोणाकोणाला पादुका दिधल्या । कोणाला वाहिल्या लाखोल्या । कोणाच्या मस्तकी मारिल्या । पायांतल्या वाहाणाही ॥३०॥
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें । स्वामीनी दिले भरपूर देणें । कोणा पुत्र कोणा सोनेनाणे। कोणा जीवनदानही दिलें त्यांनी ॥३१॥
अनेकांच्या व्याधी केल्या दूर । अनेकांना दाखविले चमत्कार । अनेकांना शिक्षा घोर । केल्या त्यांनी अनेकदा ॥३२॥
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी । पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी । म्हणूनच हव्या त्या ठिकाणी ।दर्शन दिधलें भक्ताना ॥३३॥
न सांगता सर्व जाणिले । ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें । लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें । दु:खी कष्टी जीवांसाठी ॥३४॥
दयेचा अथांग सागर । भक्तांसाठी परम उदार। अनेकांचा केला उध्दार । सदुपदेश दिक्षा देऊनी ॥३५॥
स्वामीराया दत्तात्रेया । तुमच्या कृपेची असावी छाया । हीच प्रार्थना तुमच्या पायां। मागणे नाही आणखी॥३६॥
मजवरी होता कृपादृष्टी । दत्तमय भासेल सर्व सृष्टी । सुखसंपत्तीची होईल वृष्टी । सकल सिध्दी लाभती ॥३७ ॥
ऐसी श्रध्दा माझे मनी । उपजली आहे आतां म्हणुनीं । मिठी घातली तव चरणीं । धाव पाव समर्था तूं ॥३८॥
तुमची करावी कैसी सेवा । हे मज ठाऊक नाही देवा । ओळखुनी माझ्या भोळ्या भावा। वरदहस्त ठेवा मस्तकीं ॥३९॥
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी । तुमच्यावीण माझा कैवारी । अन्य कोणी दिसेना ॥४०॥
तुमचे पाय माझी काशी । पंढरपूर सर्व तीर्थे तशी । आहेत तुमच्या चरणांपाशी । मग यात्रेस जाऊ कशाला ॥४१॥
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी । रंगून जातां त्यांचे नामीं । ब्रम्हा विष्णू शिवधामी । सर्व भक्ती पोंचते ॥४२॥
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी । त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी । आणी आपली भावना असावी । मनोभावें ऐसी कीं ॥४३॥
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी । उगीच कशास भ्यावे मी।काहींच पडणार नाही कमी। समर्थांच्या दासासी॥४४॥
भाग्यवान ते जे लागले भजनी । वादविवाद केले पंडितांनी । मग एकमुखानें सर्वांनी। मान्य केली थोर योग्यता॥४५॥
वेदांताचा अर्थ लाविला । पंडितांचा ताठा जिरविला । भाविक भक्तांना दिधला । धीर अनेक संकटी ॥४६॥
स्वामी तुमचे चरित्र आगळें । अतर्क्य अलौकिक जगावेगळे । त्यांत प्रेमाचे सागर सांठले। धन्य धन्य ज्यांना उमजलें ते॥४७॥
बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी ।लहान मोठ्या अधिकार्‍यांनी । गरीबांपासून श्रीमंतांनी। सेवा केली यथाशक्ती ॥४८॥
जे जे तुमच्या भजनीं लागले । त्यांचे त्यांचे कल्याण झालें । हवें हवें ते सारें मिळाले । श्री समर्थ कृपेनें ॥४९॥
पुढे संपल्या लीला संपले खेळ । ताटातुटीची आली वेळ ।स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ। परब्रह्म्यांत मिळालें ॥५०॥
शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी । चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी । पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी।स्वामी गेले निजधामा ॥५१॥
बोलता बोलता आला अंतकाळ । प्रकृतीत झाली चलबिचल । क्षणात पापण्या झाल्या अचल । निजानंदी झाले निमग्न ॥५२॥
वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर । पांचवा दिवस शनिवार । स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर । दिलें दर्शन भाऊसाहेबांसी ॥५३॥
ऐसा यती दत्त दिगंबर । संपवूनी आपूला अवतार । निजधामा गेला निरंतर । भक्त झाले पोरके ॥५४॥
बातमी जेव्हा सर्वत्र पसरली । जनता शोकाकुल झाली ।सर्व भक्तमंडळी हळहळली। अन्नपाणीही सुचेना ॥५५॥
गावोगांवीची भक्तमंडळी । अक्कलकोटी गोळा झाली ।समर्थांची समाधी पाहिली ।आपल्या साश्रू नयनांनी ॥५६॥
चवथा अवतार संपला । तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला ।अक्कलकोट पुण्यभूमीला। क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें ॥५७ ॥
अजूनही जे येती समाधीदर्शना । त्यांच्या व्याधी आणी विवंचना । संकटे आणी दु:खे नाना ।स्वामी दूर करतात ॥५८॥
याचे असती असंख्य दाखले ।अनेकांनी अनुभवले । म्हणूनी महाराजांची पाऊले । आपणही वंदूंया ॥५९॥
नम्र होउनी त्यांचे चरणीं ।कळकळने करुंया विनवणी । स्वामींना यावी करुणा म्हणूनी । प्रार्थना त्यांना करुंया ॥६०॥
जयजय दत्ता अवधूता ।अक्कलकोट स्वामी समर्था । सदगुरु दिगंबरा भगवंता । दया करी गा मजवरी ॥६१॥
अनेकांच्या संकटी आला धावून । आता माझी प्रार्थना ऐकून । समर्थराया देई दर्शन । दूर लोटु नको मला ॥६२॥
व्यवहारी मी जगतो जीवन । अनेक पापें घडती हातून । तव नामाचें होते विस्मरण। क्षमा याची असावी ॥६३॥
सदगुरुराया कृपा करावी । तुमची सेवा नित्य घडावी । ऐसी बुध्दी मजला द्यावी । पापे सर्व पळावी ॥६४॥
सुखाचें व्हावे जीवन ऐहिक । धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख । गृहसौख्य आणी वाहनसुख।अंती सदगति लाभावी॥६५॥
तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा । म्हणुनी याचना करतों देवा । उदार मनाने वर द्यावा । आणी तथास्तु म्हणावे ॥६६॥
तुमची होतां कृपा पूर्ण । जीवन माझें होईल धन्य । म्हणुनी आलों तव पायी शरण। दत्तराया दयाघना ॥६७॥
मी एक मानव सामान्य । तुमची सेवा नित्य घडावी म्हणून ।या पोथीचें करितों वाचन। दान द्या तुमच्या कृपेचे ॥६८॥
वेडीवाकुडी माझी सेवा ।स्वीकारावी स्वामी देवा । वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा । हीच अंती विनंती ॥६९॥
शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी । चैत्रमासीं शुक्लपक्षी ।शुभ रामनवमी दिवशी ।पोथी पूर्ण झाली ही ॥७०॥
स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत । किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत ।बसुनी ही पोथी वाचावी मनांत । इच्छा सफल होईल ॥७१॥
माणिकप्रभू , साई शिरडीश्वर । आणी अक्कलकोट्चे दिगंबर । एकाच तत्वाचे तीन अविष्कार । भेद त्यांत नसे मुळी ॥७२॥
एकाची करितां भक्ती ।तिघांनाही पावते ती । ऐसी ठेऊनी आपली वृत्ती । पोथी नित्य वाचावी ॥७३॥
या पोथीचे करितां नित्य पठण । प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न । करतील सर्व मनोरथ पूर्ण । सत्य सत्य वाचा ही ॥७४॥

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॐ शांति:शांति:शांति: ॥

॥" श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र - माहात्म्य सम्पूर्ण "॥

Monday, 24 July 2017

Shivshankar sadhana

*श्रावण महिना चालू होत आहे,शिवाचे साधनेला सर्वानी तयार रहा,,,,,*
       
      *॥उपासना महिमा॥*

सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रम्हदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष या वर श्री महादेवाचा अंकुश आहे असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकांमुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू , मतीमंदत्व, मानसिक व शारीरिक आसाद्य आजार, दुखे:, संकटे, हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वां पासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार परब्रम्ह होय.अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या दिवशी केलेली उपासना हि मानवी जीवनाला सुख शांती व समृद्धी देण्याचा एक राज मार्ग आहे, अशी हि फलदायी उपासना आहे.

आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हि उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. व श्री महादेव म्हणजे सर्वात लवकर व साध्या पूजेने सुद्धा अति प्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी अजाणते पणे जरी शिव पूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. आणि उपासना करणे म्हणजे तरी काय ?

ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रीय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो. मग महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात ?

१) अभिषेक :- महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी, दुध, दही किंवा उसाचा रस या पैकी कोणत्याही द्रव्याने केलात तरी चालतो.

२) फुले :- महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो. मग आपण पांढरी फुले मुख्यत्वे धोतर्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता.

३) वृक्ष :- महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रीय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पानें किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढवलेत व त्याची पूजा केलती तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा हि झाडे दान द्यावीत. त्याने भोळा शंकर प्रसन्न होतो.

४) फळे, धान्य किंवा वस्त्र :- कवठ हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे तसेच बेल फळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रीय आहेत. महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत, किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे. किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रीय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता.

५) स्तोत्रे :- शिवस्तुती चा पाठ वाचवा. शिवस्तुती हि सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठन हे देखील अत्यंत उपयुक्त आहे.

६) उपासना मंत्र :- ll ओम नम: शिवाय ll हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या सतत च्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनो: कामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. ह्या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार,मुहूर्त,गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिशिध्ये यांचे सार सामावले आहे.

७) दान धर्म :- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रीय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, केळी , खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता :- शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रीय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे :- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो. नि हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.

खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

" हे शंकरा मी तुला शरण आलो आहे. साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून झोप हि समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वाना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा तुझा जय जय कर असो !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक राशी नुसार गरिबांना कोणत्या प्रकारचे दान करावे या विषयी थोडेसे ! संपूर्ण वाचा व आवडल्यास जरूर शेअर करा !

महाशिवरात्रीला शिवशंकरास साध्या थंड पाण्याने अभिषेक केला असता तसेच विविध वस्तूंचे दान गरिबांना केले असता महादेव मनातली इच्चा पूर्ण करतात असा अनुभव आहे. या अभिषेकाचा व दानाचा महिमा अपार आहे. तसेच कुंडलीत ज्या ग्रहांचा दोष आहे ते दोष सुद्धा या दानामुळे दूर होतात.

अभिषेक कसा करावा ?

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ॐ नमः शिवाय हा मंत्र म्हणून थंड पाण्याने अभिषेक करावा तसेच बिल्व पत्र , बेल फळ किंवा धोत्र्याचे फुल वाहावे.

राशी नुसार गरिबांना द्यायची दाणे खालील प्रमाणे !

मेष- मध , गूळ , उसाचा रस व लाल फुल !

वृषभ - कच्चे दूध, दही, पांढरे फुल !

मिथुन- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र !

कर्क- कच्चे दूध, लोणी, बिल्वपत्र व पांढरे फुल !

सिंह- मध , गूळ , शुद्ध तूप व लाल पुष्प !

कन्या- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र व निळी फुले !

तुळ - दूध, दही, रंगीत फुले !

वृश्चिक- मध, शुद्ध तूप, गूळ बिल्व पत्र व लाल फुल !

धनु- शुद्ध तूप , मध , बदाम, पिवळे फुल व पिवळे फळ !

मकर- मोहरीचे तेल , तिळाचे तेल , कच्चे दुध, जांभळे, निळे फुल !

कुंभ- कच्चे दुध, मोहरीचे तेल, तिळाचे तेल , निळे फुल !

मीन- उसाचा रस , मध , बदाम, बिल्वपत्र, पिवळे फुल व पिवळे फळ !

विशेष सूचना :-
शिवपूजन कालावधी :- महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच २४:२८ ते २५:१८  या कालावधीत वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर महादेव प्रसन्न होतात. या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पानें अर्पण करावीत. कवठ या फळाचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. शिवाचे नामस्मरण करावे. शिवस्तुती किंवा शिव स्तोत्रे म्हणावीत. व मनातली इच्चा बोलावी. आपण जी इच्चा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या महाशिवरात्रीच्या उपासनेचा महिमा.

वरील प्रकारे जर आपण शिवाची उपासना केलीत तर ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात.

ll श्री स्वामी समर्थ ll