बहुजन समाजाचा कुलदैवत,महाराष्ट्र कर्नाटक,आंध्र आणि
गोव्यातील कोट्यावधी जनतेच आराध्य दैवत म्हणजे
।। दख्खनचा राजा ।। ।। दख्खनचा केदार ।। होय.
सर्व अवतारमधील अलौकीक व परिपूर्ण असा पूर्वावतार
म्हणजे श्री केदारनाथ या परमात्म्याचा अवतार जसा
अलौकीक आणि दिव्य तशीच त्या अवताराची कथा
तितकीच अलौकिक आहे.
व्दापाराच्या शेवटी पृथ्वीवर करवीर कोल्हापूर रक्तभोज
रत्नासूर या सारखे अनेक राक्षस शिवशंकराच्या वरदानाने
उन्मत झाले होते.
त्यातच भर पडली अगस्तीशिष्य विध्यांद्रीची,नारदानी
त्याला हिमालयाशी बरोबरी न करण्यातच तुझा
शहाणपणा आहे हिणवल्यामुळे तो चिडला आणि उंच
वाढला त्यामुळेसुर्यालासुध्दा अडथळा निर्माण झाला.
विध्यांद्रीच्या उंचीने दक्षिणेकडे अंधकार माजला त्यातच
उन्मत राक्षसांनी अनाचार व अत्याचाराने सर्व
प्राणीमात्रांना त्रस्त केले.त्यावेळी सर्व देवांनी
विध्यांद्रीचा अडथळा दूर करण्यासाठी विनवले.तेव्हा
अगस्ती दक्षिण यात्रेला निघून गेले.त्यामुळे विध्यांद्रीचा
अडथळा दूर झाला.
पण उन्मत राक्षसाच निर्दालन करण्यासाठी सर्व
प्राणीमाञाबरोबर सर्व देवांनी महालक्ष्मीला साकडे
घातले.परंतु योगदंडाचे वरदान असलेल्या करवीर
कोल्हासुराची राक्षसांना वधण्यासाठी सर्व शक्तिमान
अशा ज्योतिर्मय स्वरुपालाच साकडे घालण्याशिवाय
अन्य कोणत्याही इलाज नसल्याने महालक्ष्मीने
हिमालयावर जाऊन शुध्द सनातन ज्योतिर्मय स्वरुपालाच
अवतार घेण्याविषयी विनवले.
त्याचवेळी हिमालयावर पौगंडऋषी व विमलांबुजा हे
उभयता शुध्द सनामन ज्योतिर्मय स्वरुपाने अवतार घ्यावा
म्हणून घोर अशी ब्रम्हकल्प पर्यंत तपस्या करीत होते.
महालक्ष्मी,विमलांबुजा आणि पौगंडऋषीच्या तपस्येवर
प्रसन्न होऊन पूर्णब्रम्ह सनातन ज्योतिर्मय स्वरुप परमात्मा
अयोनी संभव म्हणजे कोणत्याही योनीतून जन्म न घेता
आठ वर्षाच्या रूपात हिमालयावर चैञ शुध्द षष्ठीयुक्त
सप्तमीला रविवारी ठिक सुर्योदयाला प्रकट झाले.
या अलौकिक अवताराचे गर्ग मुनीनी मोक्ष देणारा म्हणून
“केदार” असे नामकरण केले.
अशा निरंजन ज्योति स्वरूपाच ध्यान जमदग्नी ऋषीनी
खालील शब्दात प्रकट केले.
।। ध्याये देवं परेशं त्रिगुण गुणमयं
ज्योतिरुपं स्वरूपं ।।
।। वामेपात्रं त्रिशलं डमरूग सहितं खड्ग दक्षे विराज्यं ।।
।। शेषारूढं सुरेशं क्रमणपदयुगं भक्त
कारूण्यगम्यं ।।
।। सर्वांगे लिंगभूषं उपवित सहिंतं
नाथमार्गाधिपत्यं ।।
।। दैत्यघ्नं भक्तपालं सकलमघहरं
ज्ञानमनानंदचितम ।।
।। सर्वार्थ सर्वरूपं अगुणसगुणदं श्रीपादं नाथरूपं ।।
।। शेषारूढोद्भवे विष्णू त्रिशूक्ति शिवरूप धृत उपवितभवेत
ब्रम्हा खड्गशक्ति समन्वितः ।।
।। सर्व दवमयी मूर्ति सर्वाराध्यास्वरूपवान सर्वाचरण
मार्गांणां सर्वकर्म फलप्रदं ।।
या ध्यानमंत्रात केदार नाथांचे ध्यान जमदग्नी उलगडून
दाखवले.तेच असे केदार नाथांच्या हाती असणारे खड्ग व
धारण केलेले यज्ञोपवीत हे ब्रम्हाचे अर्थात रजोगुणांचे
प्रतीक.
हाती असणारे अमृतपात्रं पायातील शेष हे सत्वगुणाचे
म्हणजे विष्णुचे तसेच हाती असणारे त्रिशूल व डमरु आणि
भैरव स्वरुप हे तमोगुणाचे म्हणजेच शिवाचे प्रतीक आहे.
त्याचप्रमाणे क्रोधरुपी जमदग्नी व सूर्यरूपी तेजाचा
एकत्रीत अवतार म्हणजे दख्खनचा राजा दख्खनकेदार होय.
हिमालयातून व दक्षिणेकडे येऊन सर्व राक्षसांचे निर्दालन
केले व महालक्ष्मीचा करवीरमधे राज्याभिषेक केला व नाथ
परत निघाले असता महालक्ष्मीने नाथाना विनवले आणि
मैनाकगिरी पर्वतावर म्हणजेच रत्नाद्री (रत्नांचा डोंगर)
डोंगर (सध्याचा जोतिबा डोंगर ) येथे त्यांचा
राज्याभिषेक केला आणि करवीरावर तसेच संकटे
आणणाऱ्या दक्षिण दिशेकडे कृपादृष्टी ठेवा असे विनवले व
नाथांना जाण्यापासून परावृत्त केले.तेव्हा हा देवाधिदेव
केदारनाथ दक्षिण दिशेवर अंकुश ठेवून हाती खड्ग घेऊन
क्रमणपद ( चालण्याच्या तयारीत )पावित्र्यात भक्ताला
रक्षिण्यासाठी तिष्ठत उभा आहे.
म्हणून देवर्षी नारद त्यांना प्रणिपात करताना म्हणतात.
।। नमोस्त्वनंताय सहस्ञासाय ।।
।। सहस्ञपाद सहस्ञशीर्षाय ।।
।। पद्भ्यां शुद्रो अजायताय ।।
।। तन्मे ज्योतिस्वरूपाय नमः ।।
अशा या भक्तवत्सल नाथस्व रूपाची सप्तर्षीश्रेष्ठ गुरू
वशिष्ठ स्तृती करताना म्हणतात.
।। ज्योति स्वरूप । ञिभूवन पालकाक्ष अरूपा ।।
अगम निगमी । अजपीजपा ।। अमल कमलदळी भ्रमर
गीरावर्णा ।।
करवीर निवासीनी महालक्ष्मी नाथांचा गजर करताना
म्हणते आमचे भाग्य चांगले म्हणून
तुझा लाभ झाला बोला ।। चांगभल ।।
केदारनाथांच्या नावे ।। चांगभल ।।
असा हा दक्षिण काशीचा मुक्तीदाता केदारनाथ.
दीन दुबळ्या भाविकांनी अनेक बिरूद त्याला अर्पण केली
कोणी नाथांना सौदागर,रवळनाथ,केदारलिंग
ज्योर्तिलिंग आणि उपनाम ज्योतिबा असही म्हणतात.
या दख्खनच्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेले
तीर्थश्रेत्र म्हणजे क्षी.क्षेत्र रत्नाद्री होय.
या क्षेत्रालाच भक्त जोतिबा डोंगर असं म्हणतात असे हे
अनुपम तीर्थराज पवित्र तीर्थश्रेत्र सह्याद्रीच्या
दक्षिणेकडील रांगेत प्रसिध्द पन्हाळ गडाच्या पूर्वेस वसलेले
आहे.समुद्रसपाठी पासुन सुमारे ३१०० फूट उंचीवर असलेले हे
क्षेत्र कोल्हापूरच्या वायव्येस २० किमी अंतरावर आहे.
मंदीर : श्री केदारनाथ मंदीर हे क्वचितच आढळणारे
दक्षिणाभिमुख असे मंदीर आहे.मंदिर हेमाडपंथी या
प्रकारातील असून त्याचा कालखंड करवीरवर राज्य
करणाऱ्या ७ व्या शतकातील भोज शीलाहावंशीय
समकालीन असून ११ व्या शतकापासून आज पावेतो त्याचा
तीन वेळा जीर्णोध्दार झालेला आहे.
सध्याच्या मंदिराचा जीर्णोध्दार ग्वाल्हेरच्या शिद्दांचे
मूळ वंशज यांनी इ.स.१७३० साली केला.
याशिवाय कादारेश्वराचे मंदीरा जे खांबाशिवाय उभे आहे
ते आणि नंदिचे मंदीर ग्वाल्हेर घराण्यातील दौलतराव शिंदे
यांनी १८०८ मध्ये बांधले.
केदारनाथ आणि केदारेश्वर मंदीराच्या मध्ये असणारे चर्पट
अंबा म्हणजे चोपडाई देवालय प्रितीराव चव्हाण
हिम्मतबहादूर यांनी इ.स.१७५० मध्ये बांधले.
हा सर्व तीन मंदीराचा एक समूह आहे.
या मंदीराशिवाय रामेश्वर मंदीर इ.स.१७८० मध्ये मालजी
निकम पन्हाळकर यांनी बांधले.
तसेच चाफेबनात असणारे गावापासुन उत्तरेस पर्लांगभर
अंतरावरील यमाई मंदीर सुध्दा राणोजी शिंदे यांनी
इ.स.१७३० मध्ये बांधले.
Saturday, 16 September 2017
श्री जोतिबा देव
Friday, 15 September 2017
आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला
🌺।।आई कुलस्वामिनी।।🌺
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आज गोधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोधळ ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
बोला भवानी मातेचा उधं उधं उधं उधं उधं
सप्तश्रृंगी मातेचा उधं उधं उधं उधं उधं
रेणुकामातेचा उधं उधं उधं उधं उधं
आडीवरेच्या महाकाली चा उधं उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं उधं
आईचा उधं उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं उधं ....शुभ संध्या ...
Wednesday, 13 September 2017
महालक्ष्मी आई भवानी आदिशक्ति
महालक्ष्मी आई भवानी देवी ,आदी शक्ती तु जननी ।
अति प्रेमाने करुनी आरती , मस्तक ठेवितो मि चरणी ।।धृ।।
दिससी वेडी अससी भोळी । महान शक्ती तुज जवळी ।।
येतो प्रत्यय तव भक्तांना । संकट त्यांचे तु टाळी ।।
कुठेही राहीशी ग्रामी फिरशी । परी नसे तुज भान मुळी ।।
आत्मस्वरुपी तल्लीन असुनी । ब्रह्मानंद उचंबळी ।।१।।अंबाबाई माते नामे जपता । कलीकालही थरथरती ।।
तव नामाचा महीमा गाता । असंख्य पापे दुर होती ।।
अति श्रध्देने घेवुनी दर्शन । असाध्य रोगी बरे होती ।।
ऐसा महीमा तव कृपेचा वर्णू माऊले मी कीती ।।२।।
भक्त तुझे जे धावा करीती । त्यांच्या साठी धावुन जासी ।।
अवघ्या चिंता निवारुनीया । संकट मुक्त मग करीशी ।।
दिन दयाळे भक्त वत्सले । माय माऊले अनसुये ।।
पापी जनही उध्दरताती । केवळ तुझीया कृपे मुळे ।।३।।
चिंध्या चिरकुट्या करी घेवुनी । पिशापरी तु भासविली ।।
भुत भविष्य कथन करुनी । निज भक्तांना विचविशी ।।
बाळ दिनु हा नम्र होवुनी । आला शरण तव चरणी
माणसाचे स्वभाव नक्षत्र
माणसाचे स्वभाव नक्षत्र च निश्चित करतात .
===========================
नक्षत्राची एकूण संख्या 27 आहे. एक राशी अडीच नक्षत्राची असते. अशा प्रकारे 12 राशी तयार झाल्या आहेत. या नक्षत्रावर आपला स्वभाव निर्धारित होत असतो. कारण पूर्वी राशी नव्हत्याच नक्षत्राचा विचार करुनच भविष्य पहात असत .
1. अश्विनी- बौद्धिक प्रगल्भता, तेज स्मरणशक्ती, चंचल व चतुराई असे गुण अश्विनी नक्षतत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात.
2. भरणी- स्वार्थी वृत्ती, स्वकेंद्रित न होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव असणे.या नक्षत्राचा स्थायी भाव आहे.
3. कृतिका- कृतिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी, आक्रामक व अहंकारी असतात मात्र त्यांना शस्त्र, अग्नी व वाहन यांच्यापासून भीती असते.
4. रोहिणी- रोहिणी नक्षत्रात जन्म घेतलेले लोक प्रसन्न, कलेत प्राविण्य मिळवणारे, निर्मळ मनाचे व उच्च अभिरुचि असणारे असतात.
5. मृगराशी- बु्ध्दीवादी व भोगवादी यांचा समन्वय, उत्तम बुध्दीमत्ता तसेच यांचा वापर चांगल्या कार्यासाठी करणे, हा नक्षत्राच्या लोकांचे विशेष म्हणावे लागेल.
6. आर्द्रा- आर्द्रा नक्षत्र असणारे लोक खुप संतापी असतात. निर्णय घेताना ते नेहमी द्विधा मन:स्थितीत सापडतात. ते संशयीही असतात.
7. पुनर्वसु- पुनर्वसु नक्षत्र असणारे लोक शांतताप्रिय असतात. अध्यात्मात अधिक रुची घेत असतात.
8. अश्लेषा- जिद्दी स्वभावामुळे कधीकधी असे लोक अविचारी होऊन बसतात. कोणावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु प्रत्येक कामात 'आ बैल मुझे मार' असे करत नेहमी वादळाला आमंत्रण देत असतात.
9. मघा- स्वाभिमानी, स्वावलंबी, उच्च महत्वाकांक्षी व सहज नेतृत्व असे गुण मघा नक्षत्र असणार्यांमध्ये असतात.
10. पूर्वा- पूर्वा नक्षत्र असणारे लोक श्रद्धाळु, कलाप्रेमी, रसिक व छंदी असतात.
11. उत्तरा- या नक्षत्राचे लोक अधिक संयमी तसेच व्यवहारशील व अत्यंत परिश्रमी असतात.
12. हस्त- कल्पनाशील, संवेदनशील, सुखी, समाधानी लोक या नक्षत्रात जन्म घेतात.
13. चित्रा- लेखक, कलाकार, रसिक तसेच भिन्नलिंगी आकर्षण आदी गुण चित्रा नक्षत्रात जन्म घेणार्यांमध्ये जाणवतात.
14. स्वाती- संयमी, मनावर नियंत्रण, समाधानी वृत्ती तसेच दु:खात खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता या लोकांमध्ये असते.
15. विशाखा- स्वार्थी, जिद्दी तसेच आपलीच टिमकी वाजविणे असा या व्यक्तीचा स्वभाव असतो. आपला उल्लू सिदा करण्यात ही मंडळी माहिर असते.
16. अनुराधा- कुटुंबवत्सल, श्रृंगारप्रिय, मधुरवाणी, छंदी असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.
17. ज्येष्ठा-स्वभाव निर्मळ परंतु शत्रु ओळखून त्याच्यावर पाठीमागून वार करणारे असतात.
18. मूल- जीवनाचा पूर्वार्ध कष्टदायी व उत्तरार्ध सुखात जात असतो. कुटुंबात ही व्यक्ती रमताना दिसत नाही. राजकारणात या व्यक्तीचा हात कोणी धरू शकत नाही. कलाप्रेमी व कलाकार या नक्षत्रात जन्म घेतात.
19. पूर्वाषाढा-शांत, धावपळ न करणारे, समाधानी व ऐश्वर्य प्रिय व्यक्ती या नक्षत्रात जन्म घेतात.
20. उत्तराषाढा- विनयशील, बुध्दीमान, अध्यात्मात रूची घेणारे व प्रत्येकाला मदत करणारे लोक या नक्षत्रात जन्म घेतात.
21. श्रवण- श्रद्धाळू, परोपकारी, कतृत्ववान असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.
22. धनिष्ठा- धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रोधी, असंयमी तसेच अहंकारी असतात.
23. शततारका- व्यसनाधीनता आणि कामवासनेकढे हे नक्षत्र असणारे लोक अधिक झुकतात.
24. पुष्य- पुष्य नक्षत्र असणारे लोक दानप्रिय व बुध्दीमान असल्याने समाजात एक वेगळ्या प्रकारचे वलय तयार करत असतात. या लोकांचा जनसंपर्कही दांडगा असतो.
25. पूर्व भाद्रपदा- अधिक बुध्दीमान, संशोधक वृत्ती तसेच वेळ व काळानुसार चालणारे कुशल लोक या नक्षत्रात जन्म घेतात.
26. उत्तरा भाद्रपदा- मोहक चेहरा, संवादकौशल्याने निपून, चंचल व इतरांना चटकन मोहून घेणे, हा स्वभाव या नक्षत्रात जन्म घेणार्या लोकांचा असतो.
27. रेवती- रेवती नक्षत्र असणारे लोक सत्यवादी, निरपेक्ष, विवेकप्रधान असतात. ते नेहमी जनकल्याणासाठी झटत असतात.
Friday, 8 September 2017
दत्तात्रय स्तोत्र
श्री स्वामी समर्थ -
☆- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. असे हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.
☆- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. तथा या स्तोत्राच्या नियमित पठणाने श्रीगुरुदत्तात्रेयांचा कृपाशिर्वाद लाभेल.
॥ श्रीदत्तत्रेय स्तोत्रम् ॥
========================
ध्यानम् :-
------------
जटाधरं पाण्डुरंगं
शूलहस्तं कृपानिधिम् |
सर्वरोगहरं देवं
दत्तात्रेयमहं भजे ||
*(अर्थ :- जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी, सर्वरोग नाहीसे करणार्या श्रीदत्तत्रेयदेवांना मी भजतो.)
विनियोग: :-
---------------
ॐ अस्य श्रीदत्तत्रेयस्तोत्रमन्त्रस्य
भगवान् नारद ऋषि; अनुष्टुप् छन्दः
परमात्मा देवता, श्रीदत्तप्रीत्यर्थं
जपे विनियोग: ||
जगदुत्पत्तिकर्त्रे च
स्थितिसंहारहेतवे |
भवपाशविमुक्ताय
दत्तात्रेय नमोस्तु ते ||1||
*(अर्थ :- हे दत्तात्रेय, जगाची उत्पत्ती करणार्या, तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणार्या पण संसारबंधनापासून मुक्त असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)
जराजन्मविनाशाय
देहशुद्धिकराय च |
दिगंबर दयामुर्ते
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||2||
*(अर्थ :- हे दिगंबर, दत्तात्रेय, आपण दयेचे मुर्तिमंत रुप. वार्धक्य व पुनर्जन्म नाहीसे करणार्या आणि देह शुद्ध करणार्या तुम्हांला नमस्कार असो. )
कर्पूरकान्तिदेहाय
ब्रम्मूर्तिधराय च |
वेदशास्त्रपरिज्ञाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||3||
*(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपली देहकांति कापरासारखी. आपणच ब्रम्हदेवरुप धारण केलेत. वेद-शास्त्र पूर्ण जाणणार्या तुम्हांला नमस्कार असो.)
ह्रस्वदीर्घकृशस्थूल
नामगोत्रविवर्जित |
पञ्चभूतैकदीप्ताय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||4||
*(अर्थ :- स्वेच्छेने आखूड, लांब, कृश, स्थूल रुपे धारण करणारे पण नाव व गोत्र नसलेले हे दत्तात्रेय, पंचमहाभूते हेच एक दीप्तिमान शरीर असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)
यज्ञभोक्त्रे च यज्ञाय
यज्ञरुपधराय च |
यज्ञप्रियाय सिध्दाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||5||
(अर्थ :- हे दत्तात्रेय, यज्ञाचा उपभोग घेणार्या, स्वतः यज्ञ असलेल्या, यज्ञरुप धारण करणाऱ्या, यज्ञ प्रिय असणाऱ्या सिद्ध अशा तुम्हांला नमस्कार असो.)
आदौ ब्रम्हा मध्ये विष्णुर्
अन्ते देवः सदाशिवः |
मुर्तित्रयस्वरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||6||
(अर्थ :- हे दत्तात्रेय, उजवीकडून आधी ब्रम्हा, मध्ये विष्णू, शेवटी सदाशिव अशा त्रिमूर्तिरुप तुम्हांला नमस्कार असो.)
भोगालयाय भोगाय
योगयोग्याय धारिणे |
जितेन्द्रिय जितज्ञाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||7||
(अर्थ :- हे जितेन्द्रिय दत्तात्रेय, सर्व सुखभोगांची खाण व सुखभोगस्वरुप आपणच. योगाला योग्य रुप आपण धारण केलेत. संयमी लोकांनाच ज्यांचे ज्ञान होते, अशा तुम्हांला नमस्कार असो.)
दिगंबराय दिव्याय
दिव्यरुपधराय च |
सदोदितपरब्रम्ह
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||8||
(अर्थ :- हे नित्य परब्रह्मरुप दत्तात्रेय, दिशा हेच आपले वस्त्र. स्वतः दिव्य असून दिव्य रुप धारण करणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)
जम्बूद्वीपे महाक्षेत्रे
मातापुरनिवासिने |
जयमानः सतां देव
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||9||
(अर्थ :- नेहमी विजयी होणारे, संतांचें देव, हे दत्तात्रेय, जम्बूद्वीपातील महाक्षेत्र अशा मातापुरात माहुरगडावर आपण राहता. तुम्हांला नमस्कार असो.)
भिक्षाटनं गृहे ग्रामे
पात्रं हेममयं करे |
नानास्वादमयी भिक्षा
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||10||
(अर्थ :- हे दत्तात्रेय, हातात सुवर्ण पात्र घेऊन गावागावांत घराघरांतून भिक्षा मागून नाना प्रकारच्या स्वादांनी युक्त भिक्षा घेणार्या तुम्हांला नमस्कार असो.)
ब्रम्हज्ञानमयी मुद्रा
वस्त्रे चाकाशभूतले |
प्रज्ञानघनबोधाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||11||
(अर्थ :- हे दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हज्ञान - मुद्रा धारण केली आहे, आकाश व पृथ्वी ही ज्यांची वस्त्रे आहेत. आणि ज्यांची जाणीव आत्मज्ञानपूर्ण आहे, अशा तुम्हांला नमस्कार असो.)
अवधूत सदानंद
परब्रह्मस्वरुपिणे |
विदेहदेहरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||12||
*(अर्थ :- हे अवधूत, नित्य आनंदरूप दत्तात्रेय, देहात असूनही विदेही अशा परब्रह्मस्वरुप तुम्हांला नमस्कार असो.)
सत्यरुप सदाचार
सत्यधर्मपरायण |
सत्याश्रय परोक्षाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||13||
*(अर्थ :- हे दत्तात्रेय, सत्यरुपी, सदाचरणात व धर्मात तत्पर व सत्याचे आश्रय तुम्ही आहात. इंद्रियांना न कळणार्या तुम्हांला नमस्कार असो.)
शूलहस्त गदापाणे
वनमालासुकन्धर |
यज्ञसूत्रधर ब्रम्हन्
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||14||
*(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपण हातात त्रिशूळ व गदा धारण केली आहे. आपला गळा वनातील फुलांच्या माळांनी शोभत आहे. यज्ञोपवीत धारण करणार्या ब्राह्मणस्वरुप आपल्याला नमस्कार असो.)
क्षराक्षरस्वरुपाय
परात्परतराय च |
दत्तमुक्तिपरस्तोत्र
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||15||
*(अर्थ :- हे दत्तात्रेय, विनाशी विश्वरुप व अविनाशी परमात्मरुप आपनच धारण करता. मुक्तिपर स्तोत्र रचण्याची स्फुर्ती आपणच दिली. पर अशा प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो.)
दत्तविद्याय लक्ष्मीश
दत्तस्वात्मस्वरुपिणे |
गुणनिर्गुणरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||16||
*(अर्थ :- हे लक्ष्मीचे स्वामी दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हविद्या दिली व आत्मस्वरूपाची प्राप्ती करुन दिली, ज्यांची त्रिगुणात्मक व त्रिगुणातीत अशी उभय रुपे आहेत, अशा आपल्याला नमस्कार असो.)
शत्रुनाशकरं स्तोत्रं
ज्ञानविज्ञानदायकम् |
सर्वपापं शमं याति
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||17||
*(अर्थ :- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. हे दत्तात्रेय, आपल्याला नमस्कार असो.)
इदं स्तोत्रं महद्दिव्यं
दत्तप्रत्यक्षकारकम् |
दत्तात्रेयप्रसादाच्च
नारदेन् प्रकीर्तितम् ||18||
|| इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं
दत्तात्रेयस्तोत्रं संपूर्णम् ||
*(अर्थ :- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. हे श्रीदत्तात्रेयांच्या कृपेने नारदमुनींनी रचले आहे.)
असे हे श्रीनारदपुराणातील श्रीनारदांनी रचलेले हे दिव्य श्रीदत्तात्रेयस्तोत्र पूर्ण झाले.
🙏
#अनंतकोटी_ब्रम्हांडनायक
Rajendra Gangurde
अखंड लक्ष्मी प्राप्तिसाठी तिजोरीची जागा
घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी तोडगे....
आज जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की पैसे येणे व टिकणे हा आहे हा पैसे घरात किंवा दुकानात आपण तिजोरी मध्ये ठेवतो.
धन वाढवण्यासाठी तिजोरीत या लक्षात ठेवाव्या या गोष्टी...
प्राचिन काळात घरातील मौल्यवान वस्तु ठेवण्यासाठी तिजोरी बनवली जात होती. बदलत्या काळानुसार यामध्ये परिवर्तन आले. कारण आता पैसा आणि दागिने बँकेत ठेवले जातात. परंतु जर तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवू इच्छिता तर या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जाणुन घेऊया तिजोरी संबंधीत काही खास गोष्टी.
1)वर्षातून एकदा तरी श्री तिरूपति बालाजी
ला जाऊन दर्शन करावे याने व्यापार व नौकरी निश्चित फायदा होईल.
2)वास्तु प्रमाणे धनाचे देवता कुबेरचा वास उत्तर दिशेत असतो. यामुळे तिजोरी ही नैऋत्य दिशेत मध्ये पहिजे उत्तर दिशेला उघडणे लाभ दाय़क असते.
तिजोरी ही कोणत्या दिशेला असल्यास काय फरक पडतो ते पाहा
ईशान्य कोपर्यात :- धनाचा नाश होतो
अग्नेय कोपर्यात:- अनावश्यक धन खर्च होतो
दक्षिणे तोड करून:- आजारपणात वर धन खर्च होतो
नैऋत्य कोपर्यात :- हळू हळू धन वाढेल
पश्चिमे तोड करून :- धन टिकनार नाही
वायव्य कोपर्यात :- भरमसाठ धन खर्च होतो.
उत्तर दिशेत उत्तर तोड करून:- सर्वात उत्तम (लाभच लाभ होईल)
या मुळे तिजोरीही नैऋत्य दिशेत उत्तर दिशाला उघडणारी असावी
3)उत्तर दिशेत तिजोरी ठेवणे शक्य नसेल तर नैऋत्य किंवा पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकता.
4) गल्यात किंवा तिजोरीत पैसे व धनाची वाढ करण्यासाठी तिजोरीत कोणत्या शुभवस्तु ठेवाव्या ते पाहू
1}श्रीमहालक्ष्मी यंत्र, व श्रीविष्णु ची प्रतिमा (जेथे श्रीविष्णुचा वास असेल तिथे श्रीलक्ष्मी येणार हे निश्चित) व
श्रीयंत्र ठेवावे.
2}श्रीकुबेर यंत्र, श्री कुबेर मुर्ती तिजोरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी व 2 गज ( हत्ती) ठेवावे
3}मांजरीची ज्वार (ज्वार म्हणजे मांजरीला जेव्हा पिल्लं जन्म दिते तेव्हा एक पदार्थ बाहेर पडले त्याला ज्वार असे म्हणतात हे ज्वार लक्ष्मी युक्त व पैसा, धन, सोने, महत्वाचे असते. ज्वार ही अत्यंत दुर्मिळ उपयुक्त आहे)
4}तिजोरी आरसा, चंदनाच लहानसे खोड,
सियार सिंग, हातजोडी, इद्रजाल, कस्तुरी, अत्तर(हिना नावाचे अत्तर) हे सर्व श्रीलक्ष्मीला प्रिय वस्तु तिजोरीत
ठेवावे. या वस्तू मुळे तुमचे पैसे कोणा कडून येत नसल्यास निश्चित येतील व तुमच्या व्यापार आणि व्यवसायात व नौकरी प्रगती होईल.
तिजोरीत एक मोती व दक्षिणवर्ती शंख कुबेर मूर्ति गोमती चक्र कवड़ी हाताजोड़ी एकांक्षी नारळ कमळ माळ ठेवावे हे श्रीलक्ष्मी चे प्रिय आहेत
5)ज्या ठिकाणी सहज कोणाचेच लक्ष जाणार नाही अशा ठिकाणावर तिजोरी ठेवा. तिजोरी संबंधीत माहिती घरातील खास लोकांनाच असावी. इतर लोकांना माहिती असू नये.
6)एखाद्या केस संबंधीत कागदपत्र पैसे किंवा दागिण्यांसोबत ठेवू नये. यामुळे हानी होऊ शकते.
7)तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये. यामध्ये नेहमी काही ना काही ठेवले पाहिजे. ज्यामुळे त्याची सार्थकता कायम राहिल.
8)देवघराच्या मूर्तीखाली कधीच तिजोरी-गल्ला किंवा पैसे ठेवू नये. अन्यथा तुमचे लक्ष नेहमी धनावर राहिल आणि देवाच्या भक्तीमध्ये तुमचे मन लागणार नाही.
9) रोज घरात सकाळी श्रीविष्णु सहस्त्र नाम व श्रीसूक्त म्हणावे किवा ऐकावे.
10) दर शुक्रवारी (सकाळी,संध्या,रात्री केव्हाही एकदा)
श्रीलक्ष्मी सहीत कुबेर म्हणजे तिजोरी पुजा करवी पुजा चालू असताना गुगळा चा धुप(धुर) करावा व श्रीलक्ष्मीला प्रिय असा नैवेद्य विलाची, लवंग,बासुंदी, तांबूल, याचा नैवेद्य दाखवा व
(जय लक्ष्मी माता)ही आरती करावी. व
सकाळी स्नानाआधी धन अथवा पैसे स्पर्श नये.
हा सर्व वस्तु दीपावळी मदे शिद्ध आणि शुद्ध करुण ठेवावे
सर्वांनी हे नियम पाळावे निश्चित
श्री लक्ष्मीचा वास तुमचा वास्तु मध्ये राहिल .
🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻