Sunday, 3 December 2017

आयुर्वेदाचे उपचार

आजारी पडण्यापुर्वी  पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.
6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.
8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.
9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.
10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
काही आजार नसला तरी
अनुलोमीलम 15 मी
कपालभाती 15 मी
सुर्यनमस्कार 12 आर्वतन
रोज करा

आरोग्य संवाद
स्वतः साठी  एवढं  तरी  करा

१)  रिकाम्या  पोटी  हातपाय   प्रेस  करा,  गरम  करा.
२)  भरपूर  टाळ्या  वाजवा.
३)  हातापायाचे  तळवे  जेथे  दुखत  असतील  तेथे  पंपिंग  करून  दाब  द्या.
४)  पायाखाली  लाटणे  घेऊन  त्यावर  तळवे  फिरवा. ( अँक्युप्रेशर  करा )
५)  आठवड्यातून  एकदा  तरी  तेलाने  सर्व  शरीराला  माँलिश  करा.
६)  नियमित  प्राणायाम  करा. ( भस्त्रिका,  कपालभाती  व  अनुलोम  विलोम  )
७)  सकाळी  एक  /  दोन  ग्लास  कोमट  पाणी  प्या.
८)  सकाळी  जास्तच  नाष्टा  करा.  ८  ते  ९  या  वेळेत.
९)  दुपारी  मध्यम  आहार  घ्या.  १  ते  २  या  वेळेत.
१०)  संध्याकाळी  गरज  असेल  तरच  जेवा. किंवा  हलका  आहार  घ्या.  ७  ते  ८  या  वेळेत.
११)  नाभिचक्र  मूळ  जागी  ठेवा.
१२)  पाय  गरम,  पोट  नरम,  डोके  शांत ठेवा.
१३)  एकाचवेळी  भरपेट  खाऊ  नका.
१४)  चौरस  आहार  घ्या.
१५)  जास्तीत  जास्त  शाकाहारी  रहा.
१६)  Black  Tea  च  प्या.
१७)  जेवणात  कोशिंबीर  (  कच्चे  )  खा.
१८)  ध्यानधारणा  करा.
१९)  सकारात्मक  वर्तन / विचार  ठेवा.
२०)  सत्य  बोला. समाजसेवा  करा.
२१)  भरपूर  ऐका  मात्र  कमी  बोला.
२२)  *नैसर्गिक  जीवन  जगा.*
२३)  गरज  असेल  तर  घरगुती औषधे  ( आजीबाईचा  बटवा )  घेणे.
२४)  पोट  साफ  ठेवणे.
२५)  वात,  पित्त  व  कफ  प्रवृत्ती  ओळखून  उपचार  करा.

                          आरोग्य   संदेश   

सकाळी  पाणी,  दुपारी  ताक, संध्याकाळी  घ्या  दुधाचा  घोट,
हिच   आहे   आपल्या   निरोगी   जीवनाची   खरी   नोट.

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
कंबर  दुखी

उपाय

१)  जायफळ  पाण्यात  उगळा  +  तिळाचे  तेल  मिक्स  करा.  नंतर  गरम  करा.  थंड  करून  दुखणा-या  जागी  लावा.
२)  आल्याचा  रस  +  मध  दिवसातून  २/३  वेळा  घ्या.
३)  गरम  पाण्याने  शेक  द्या.
४)  हलका  मसाज  करा.
५)  बर्फाने  शेकवा.
६)  रोज सावकाश  व्यायाम / योगासने करा.
७)  नियमित  प्राणायाम  करा.
८)  प्रथम  तेल  लावा  नंतर श्वास  रोखून  माँलिश  करा.  असा  उपाय  शरीराचा  कोणताही  भाग /  अवयव  दुखत  असेल  तर  नक्कीच  करा. गुण  येतोच.
९)  विश्रांति  घ्या.
१०)  दोन्ही  तळव्यांच्या  मागील  बाजूवर   (अंगठा  व  तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर  करा.
११)  पोट  साफ  राहू  द्या.
१२)  सर्वच  उपाय  एकाचवेळी  करू नका.
१३)  नियमित  सकाळी  कोमट  पाण्यातून  व  संध्याकाळी  कोमट  दुधातून  १ / १ चमचा  मेथी  दाणे  घ्या.

   आरोग्य  संदेश  

व्यायाम  व  अँक्युप्रेशरने  व्हा  सुखी,
माझ्या  सल्याने  थांबेल  कंबर  दुखी.
मान   दुखी  - - - - -

कारणे  -----

जास्त  थंडीमुळे,  झोपेत  अवघडणे,  लचकणे,  झटकन  वळणे,  डोक्यावर  जास्त  ओझे  घेणे,  स्नायुंना  त्रास  होणे, इ.

उपाय  -----

१)  शेक  द्या. ( गरम  पाणी  /  वाळू  )
२)  हळद  +  चंदन  लेप  द्या.
३)  लसूण  रस  +  कापूर  मिक्स  करून  लावा.  जास्तच  आग  झाल्यास  पाण्याने  साफ  करून  खोबरेल  तेल  लावा.
४)  कोमटच  पाणी  प्या.
५)  सुंठ  उगाळून  लेप  द्या.
६)  प्रथम  तेल  लावा.  नंतर  भरपूर  श्वास  नाकाने  घेऊन  रोखून  धरा.  मानेचे  व्यायाम  सावकाश  करा.  किंवा  हाताने  हलकेसे  माँलिश  करा.
७)  असे  १० / १५  वेळा   रिकाम्या  पोटी  सकाळी  व  संध्याकाळी  करा. नक्कीच  गुण  येतो.
८)  अँक्युप्रेशर  करा  म्हणजेच  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. 
९)  वरील  योग्य  तेच  उपाय  करा.

           आरोग्य   संदेश    

निरोगी   राहण्यासाठी   द्या  तुम्ही  झोकून.
गुण  येण्यासाठी   मात्र  श्वास  धरा  रोखून.
|| ध्यान (Meditation) ||*

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

  ध्यानाचे फायदे

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
              
ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.

  वाईट सवयी नष्ट होतात

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
    
मन आनंदी होत

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

     
कार्यक्षमता वाढते

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

        
दर्जेदार नातेसंबंध

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
             
  विचारशक्ती वाढते 

              
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

ध्यान का करावे?

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

लिंबाचे

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम

स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..
म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळे नुकसान

उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळे होणारे नुकसान :

१. किडनीचे विकार :

किडनीचे काम असते पाण्याचे फिल्टर करणं. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी किडनीमधून योग्य रीतीने फिल्टर न होता वाहून जाते. वेळेसोबत तुमच्या मूत्राशय आणि रक्तामध्ये घाण जमू लागते. जर हीच स्थती जास्त काळापर्यंत राहिली तर मूत्राशय, हृदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात.

२. पोटाचे आजार :

उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी अन्ननलिकेद्वारा वेगाने खाली वाहून जाते आणि पोट आतल्या द्वारातून आणि आसपास च्या अंगावर पाणी जोराने धार पडल्यामुळे तिथे क्षती पोहोचते. सारखं सारखं असं होण्याने पचनतंत्र बिघडते. ह्यामुळे हृदयाला सुद्धा नुकसान पोहोचु शकते.

३. संधिवात :

जर तुम्ही उभे राहून पाणी पीत असाल तर भविष्यात तुम्हाला संधिवात सारखे भयंकर आजार जडू शकतात. कारण उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव पदार्थाचे संतुलन बिघडते. पाणी सरळ तीव्र वेगाने खालच्या दिशेने जाते जे सांध्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थांचे संतुलन बिघडवून तिथे गोठण्याची प्रक्रिया सुरु होते. ज्यामुळे सांधे दुखी आणि गाठ येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.

४. तहान अपूर्ण राहते :

उभे राहून पाणी प्यायल्याने लवकर तहान भागत नाही. आणि आयुर्वेदामध्ये सांगितले आहे कि पाणी असे प्यायचे असते जसे खात आहात आणि अन्न असे खा कि जसे पीत आहात. अर्थात अन्न असे चावून खा कि त्याचे पाणी बनेल.

५. अपचन :

उभे राहून पाणी प्यायल्याने पोटाला अराम मिळत नाही, पोटावर अधिक जोर पडतो, बसून पाणी प्यायल्याने पोटाला अराम मिळतो ज्यामुळे पोट अजून चांगल्या पद्धतीने कार्य करते.

६. शरीरावरील ऍसिडिटीवर संतुलन ठेवते :

उभे राहून पाणी प्यायल्याने शरीर आम्लावर (ऍसिड) संतुलन करू शकत नाही. ज्यामुळे शरीरावर ऍसिडचे प्रमाण वाढत जाते आणि ऍसिडिटीसोबत अनेक समस्या निर्माण होतात.

७. अल्सर आणि हृदयात जळजळ :

उभे राहून पाणी प्यायल्याने जळजळ आणि अल्सर सारखे आजार होऊ शकतात. अश्या मध्ये अन्ननलिकेच्या खालच्या भागात वाईट परिणाम पडू शकतो. जिथून पुन्हा reflex परत येते. आणि  ते Sphincter ला अडथळा निर्माण करतात. ज्याकारणाने छाती आणि हृदयात जळजळ होते आणि अल्सर सारख्या रोगांना आमंत्रण मिळते.

८. नसांमध्ये तणाव :

जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा शरीराची  “fight and flight system” एक्टीव्हेट होते. ज्यामुळे सर्व नसांवर ताण पडतो. ह्याच्या विरुद्ध जर तुम्ही बसून पाणी पीत असाल तर  ‘rest and digest system’ Activate होऊन जाते. जे सर्व इंद्रियांना शांत करते, ज्यामुळे पचन संस्था चांगली राहते.

तर समजलात ना तुम्ही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जेवढे जास्त पाणी पिणे गरजेचे आहे तितकेच जास्त गरजेचे योग्य रीतीने पाणी पिणे आहे. जर तुम्हीसुद्धा उभे राहून पाणी पित असाल तर आताच हि सवय बदला आणि बसून पाणी पिण्याची सवय लावून घ्या.

श्री दत्त जन्म कथन

श्री दत्तजन्म कथा -

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमांत पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवां करित असे. तसेच आश्रमांत येण्याऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदरानें स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धां तिला भिऊन वागे; अग्नि तिच्यापुढें शीतल होई; पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिचपुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभाव ! पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ति व लोकांबद्दलअसलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नांव 'साध्वी व पतिव्रता स्त्री' म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धा कानांवर गेल्या शिवाय राहिली नाही. नारदांचे नांवच मुळी' कळीचा नारद ' तेव्हां ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला (विष्णूची पत्नी) सांगितली, पार्वतीपुढे (शंकराची पत्नी) अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गाइले, सावित्रीपुढे (ब्रह्मदेवाची पत्नी) तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हां साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव व आपण देवी. तेव्हां या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाहीं. तेव्हां हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनांत विचार आला आणि हा विचार त्यांनीं आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हां त्यात्रैमूर्ति (ब्रह्मा-विष्णु-महेश) क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या- "ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकांत यवयास निघाले.त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातांत कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमांत आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होते. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्हीलांबून आलो असून, तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे की, तू नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावे.

“आसनी बैसतां सत्वर । म्हणती क्षुधा लागली फार ।नग्न होऊनि निर्धार । इच्छाभोजन देइंजे ॥

हे वचन ऐकतांच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली- 'हे कोणी कारणिक पुरुष माझें सत्त्व पाहाण्याकरिता आले असावे. यांस जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानि होईल. माझें मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचें तपःसामर्थ्य माझ्यामागे आहे.' असें मनांत आणून सती म्हणाली, -
"थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेंच करितें.''एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरांत गेली. त्या वेळीं तिचे पति देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा निवेदन केली. तेव्हां मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, - "हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे.त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले.

हें जाणोनियां मानसीं । तीर्थगंडी देई कांतेसी । गंगा प्रोक्षूनि तिघांसी । भोजन देई जाण पां ॥

तेव्हां पतीच्या आज्ञेप्रमाणें ती तीर्थाची पंचपात्री हातीं घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली, हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविलें. तो काय..? त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक! अगदीं लहान! तीं तीन गोजिरीं गोजिरीं बालकें पायांजवळ लोळूं लागलीं. तेव्हां अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतलें आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणें-

कंचुकोसहित परिधान । फेडूनि ठेवी न लगतां क्षण । नग्न होवोनियां जाण । बाळांजवळी बैसतसे ॥
बाळें घेऊनि मांडोवरी । स्तनीं लावी जेव्हां सुंदरी । पान्हा फुटला ते अवसरी । देखोनि सती आनंदे ॥

अशा तर्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघां अतिथींची बालकें झाली ती बालके रडू लागली. तेव्हां त्यांना भूक लागली असेल असें समजुन अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यांत घालून थोपटून निजविलें. असें या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली. पण हीं तिन्ही बालके. मात्र आहेत त्याच स्वरूपांत राहिली. असें होतां होतां एकदां नारदमुनीचीं स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमांत आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हां त्यांच ठिकाणीं ती तीन बालके ( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असतांना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते कांहीच बोलले नाहींत. अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकीं आले व ही गोष्ट त्यांनीं लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.

ऐसें सांगता ब्रह्मपुंत्र । तिघी मिळाल्या एकत्र । जोडोनियां पाणिपात्र । नारदासी विचारिती ।

तेव्हां त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, 'हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमांत घेऊन चला. म्हणजे आम्ही आपापले भ्रतार (पति) परत शोधून घेऊन येऊं. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिनें हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हां अत्रिमुनींनी फिरून गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले.तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हां तीं बालकेंपूर्ववत् देवस्वरूप झाली. ब्रह्मा- विष्णु- महेश. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले व म्हणाले, "हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग !" तेव्हां अनुसूयेने 'तिघे बालक (ब्रह्मा - विष्णु- महेश) माझ्या घरीं तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाने राहूं देत' असा वर मागितला. तेव्हा 'तथास्तु' असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात,
बाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमातबाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमात

वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र । तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥
त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण । ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥

अशा तर्हेनें मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय ! तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी १२ वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो.

श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.

दत्त जन्म विषयी आणखी काही कथा -

वैकुंठीच्या राणाने अनेक अवतार धारण केले. काही अवतार दैत्यनाशासाठी केले. काही भक्तरक्षणासाठी केले. आणि ते कार्य झाल्यावर भगवंतानी लगेच अवतार समाप्ती केली. पण श्रीदत्तअवतार हा काही वेगळाच, विलक्षण, दिव्य असा अविनाशी अवतार भक्तांना प्रबोधनासाठी धारण केला. या अवतारातही भगवंत शत्रूनाश करीत असतात. पण ते बाह्य शत्रू नव्हेत.

देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आले. श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.
दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये.

१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.
२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो.
३) या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.
४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे.

श्री दत्तात्रेयांचे भ्रमण -

५) राम, कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.
६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक "श्री गुरुदेव दत्त"असायांच्या नावाचा जयघोष करतात.
७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"या स्वरुपात आहेत।
८) श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इ. दर्शने दिली आहेत.
९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.
१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इ. उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे. उदा. गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य, महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पुजा होते. समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.
११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.
१२) "त्रिमुखी" किंवा "एकमुखी" दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच "दत्तपादुका"ची ही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते.
१३) "गुरुवार" हा दत्तांचा वार. याच दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. मार्गशीर्ष प्रौर्णिमा ही "दत्तजयंती" म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
१४) श्री दत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.
१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे.
१६) श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.
१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टीकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष एक विशेष आहे.
१८) दत्त संप्रदायाचेचतत्वज्ञान उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ व सोलीव अव्दैत स्वरुप आहे.
१९) भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत.
२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उतार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्तापर्यँत खचितच पथप्रदर्शन करीत राहील.
२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मा र्गदर्शन करीतच राहतील.

श्री दत्तात्रय ध्यानातील प्रतीकात्मकता -

तीन मुखे – ही ब्रह्मा, विष्णू, महेशांचे प्रतीक आहेत.
सहा हात – विविध प्राचीन ग्रंथांत दत्तात्रेयांचे स्वरूप एकमुखी, द्विभुज किंवा चतुर्भुज दाखवले असले तरी दत्तसंप्रदायाने मान्य केलेल्या मूर्तीच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास त्या मूर्तीला सहा हात, ब्रह्मा-विष्णू-महेशाचे प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलू, तपस्व्याचे ‘सत्त्वा’चे प्रतीक म्हणता येईल. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे ‘रजा’चे, तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू ‘तमा’चे म्हणजेच संहाराचे प्रतीक मानले जाते.
वेष – पुराणातील दत्तात्रेयांचे स्वरूप श्रीमान विष्णूसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकाविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याची द्योतक आहे.
धेनु – हे ‘पृथ्वी’चे किंवा ‘माये’चे प्रतीक मानले जाते.
श्वान – दत्तात्रेयांच्या आसपास असणारे चार श्वान वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. काही विद्वानांनी यावरून ही अवैदिक असल्याचे अनुमान काढले आहे. दत्तसंप्रदायावर प्रारंभी नाथसंप्रदायाचा प्रभाव होता. भिक्षा मागण्यासाठी नाथजोगी जेव्हा गावोगावी सातत्याने संचार करत, तेव्हा त्यांच्याबरोबर गाईंची खिल्लारे आणि त्यांच्या रक्षणासाठी श्वान असत. नाथसंप्रदायात ‘आदिगुरु’चे स्थान पावलेला महायोगी ‘दत्तात्रेय’ आपापत:च हे स्वरूप पावला असावा.
निवास – दत्तात्रेयांचा निवास सतत औदुंबरतळी असतो अशी श्रद्धा असल्यामुळेच अनेक दत्तभक्त ‘गुरुचरित्रा’चे पारायण तेथे आवर्जून करतात.

श्रीदत्तदैवताची प्राचीनता -

शिवपुराण, शतरुद्रसंहिता, विष्णुधर्मोत्तर पुराण, विष्णुपुराण, वायुपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांडपुराण, कूर्मपुराण, मरकडेयपुराण या व अशा विविध पुराणांतून दत्तात्रेयांचे उल्लेख आलेले आहेत. शांडिल्योपनिषद्, भिक्षुकोपनिषद्, अवधूतोपनिषद्, जाबालदर्शनोपनिषद्, दत्तात्रेयोपनिषद् आदी उपनिषदांतून दत्तात्रेयांच्या कार्यमहतीचे गुणगान गायले गेले आहे. दत्तसंप्रदाय इ. स. १००० पासून कार्यरत असल्याचे दिसत असले, तरी महाभारतात मात्र दत्तात्रेयांचा उल्लेख असल्याचेही दिसून येते. भगवान विष्णूने अत्रीपत्नी अनुसयेच्या पोटी अवतार घेतल्याचा उल्लेख महाभारतात आलेला आहे. दत्तात्रेयांनी सहस्रार्जुनास उपदेश केल्याचा उल्लेखही वनपर्वात (११५-१२), शांतीपर्वात (४९.३६-३७), अनुशासन पर्वात (१५२.५ व १५३.१२) आल्याचे दिसून येतो.

श्री दत्तात्रयांचे शिष्य -

सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात. या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘संस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे.
............................
© ज्योतिषी वसंतजी शेडे.
राजयोग ज्योतिष संशोधन केंद्र.
पुणे. संपर्क - ९६६५७५१४९६, ८८०६३०७१३९.