Thursday, 4 January 2018

नित्य श्लोक

*नित्य श्लोक*

*अंथरूणामधून उठताना म्हणावयाचे श्लोक-*

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
कर मूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनं||

*अंथरुणातून उठून जमीनीवर पाय ठेवताना म्हणावयाचे श्लोक-*

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले
विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पदस्पर्शं क्षमस्वमे

*अंघोळ करताना म्हणावयाचे श्लोक -*

गंगेच यमुनेचे गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधु कावेरि जलैस्मिन् संन्निधिं कुरु

*मंत्र स्नान*

अपवित्र पवित्रोवा सर्वावस्तांगतोपिवा
यस्मरेत् पुंडरिकाक्षं सभाह्याभंतरशुचिः

*प्रदक्षिणा करताना म्हणावयाचा श्लोक*

यानि कानिच पापानि जन्मांतर कृतानिच
तानि तानि विनश्यंति प्रदक्षिणं पदे पदे||

*तीर्थ घेताना म्हणावयाचा श्लोक*

अकाल मृत्यु हरणं सर्वव्याधि निवारणं
समस्त दुरितोपशमनं विष्णु पादोदकं शुभं / (विष्णु पादोदकं जठरे धारयाम्यहं) ||

*औषध घेण्यापूर्वी म्हणावयाचा श्लोक*

शरीरे जर्जरीभूते व्याधिग्रस्ते कळेवरे
औषधं जान्हवी तोयं वैद्यो नारायणो हरी ||

*देवाला प्रार्थना करताना म्हणावयाचा श्लोक*

अपराध सहस्त्राणि क्रियंते अहर्निशं
दासो आयमिथिमां मत्वक्षमस्व परमेश्वर ||

पापोहं पापकर्माहं पापात्म पाप संभवः |
त्राहिमां कृपया देव शरणागत वत्सल ||

*देवापुढे दिवा लावताना म्हणावयाचा श्लोक*

दीपं ज्योति परब्रह्म दीपेन सर्वतमोपः
दीपेन साध्यते दीपं संध्यादीपं नमोस्तुते ||

*प्रवास सुकर होण्यासाठी म्हणावयाचा श्लोक*

कुंकुमांकित वर्णाय कुंदेंदु धवलायच
विष्णुवाहन नमस्तुभ्यं पक्षिराजायते नमः||

*अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा करताना म्हणावयाचा श्लोक*

मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे
अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः ||

*रात्री झोपण्यापूर्वी म्हणावयाचा श्लोक*

रामं स्कंदं हनूमन्तं वैनतेयं वृकोदरं|
शयनेयः स्मरेनित्यं दुस्वप्नं तस्य नस्यतिः ||

Wednesday, 3 January 2018

भुलू नको रे भुलू नको ,स्वामी चरण हे सोडू नको

भुलू नको रे, भुलू नको । स्वामी चरण हे सोडू नको ।।       जन्म लाभला तुला भला हा । विकारांपाशी गुंतू नको ।

सत्य सोडूनि असत्य मार्गी । सुंदर समजूनि धाऊ नको ।।क्षणभंगुर ही मौज मनाची । म्हणुनी पाप रे करू नको ।   स्वामी समर्थ दिले ज्ञान हे सेवा त्यांची चुकवू नको ।।
माजे माझे करुनि जन्मभर । स्वरतापाई मरु नको ।

मायबाप हे दैवत अवघे । आज्ञा त्यांची मोडू नको ।।
   मतरुपी कांता सुंदर । तिची या वाचनि डोलू नको ।
एक अंदरी बाहेर दुसरे । भक्ती बेगडी करू नको ।।

  परनारी जरी ही सुंदर । हाडां मांसावर भुलू  नको।। 
   परनारी जरी सुंदर । हाडां मांसावर भुलू  नको।
लंपट बमुनी कामसंगे । क्रोधाने जळू नको।।

सुखासाठी उगाच आटापिटा । वायू गतीने धाऊ नको।
तुझ्याचजवळी सौख्य अंतरी कोंडूनि त्याला ठेऊ नको।।
सत्य ते ठेव जपूंनी । अश्वातला पकडू नको।
अलवावरचे थेंब ची सारे। हा त तयाला लावू नको।।

एकनिष्ठ सदभक्ती ही । स्वामीपदा ची सोडू नको।
चिरशांती चा मार्ग सत्य हा। आडवतेला जाऊ नको।
दिंनदास हा विनवी समर्था । दूर त्याला लोटू नको।।

🌹🌷🌺श्री स्वामी समर्थ🌹🌺🌷

Monday, 1 January 2018

भूपाळी सद्गुरू मूर्ती

🕉 *भूपाळी*🕉
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌸 _पाहें पाहें सद्‌गुरुमूर्ती_🌸
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

🌺पाहें पाहें सद्‌गुरुमूर्ती । त्रिगुणात्मका त्रैमूर्ती ।
🌺परमात्मया त्रैमूर्ती ।
🌺विश्वजीवना अनादिमूर्ती । कृपादृष्टीनें पहावें ॥ध्रु०॥
🌺श्रीगणपति शिव विश्‍वेश्वर । चिदंबरेश्वर परमेश्वर ।
🌺चिदंबरेश्वर परमेश्वर ।
🌺श्रीअविमुक्‍तेश्वर कोटेश्वर । संगमेश्वर योगिनी निष्ठती ॥पाहें॥१॥
🌺श्रीअमरेश्वर शक्‍तीश्वर ।प्रयागेश्वर वरदेश्वर ।
🌺श्रीसिद्धेश्वर कामेश्वर । शिवपंचायतन विराजे ॥पाहें॥२॥
🌺श्रीपापविमोचनेश्वर ।
🌺शुक्‍लेश्वर नंदिकेश्वर ।
🌺द्विशक्‍ती पन्नग मारुती । चक्र आदिमाया श्रीजाह्नवी ॥पाहें॥३॥
🌺महाकाळेश्वर सर्वेश्वर । अन्नपूर्णा सुरतरुवर ।
🌺श्रीरामचंद्र योगेश्वर । रामेश्वर श्रीकमला ॥पाहें॥४॥
🌺श्रीनारायणस्वामी यतीश्वर । गोपाळस्वामी अखिलेश्वर ।
कृष्णानंद यतिपति खगेश्वर ।लक्ष्मीनारायण सहित ॥पाहें॥५॥
🌺श्रीविठ्ठराई रुक्मिणी ।हरिहरब्रह्मेश्वर सगुणी ।
🌺वसे मृत्युंजय सुरादि शशीतरणी । भूत्रिभूवनीं अनुपम्य ॥पाहें॥६॥
🌺श्रीब्रह्मदेव माधवेश्वर ।विश्‍वंभरेश्वर सर्वभूतेश्वर ।
🌺श्रीउमामहेश्वर स्वामीकार्तिकेश्वर । काळभैरव क्षेत्रपाळ ॥पाहें॥७॥
🌺श्रीकृष्णानदी संगमीं । कामधेनु सिद्धवरदभूमि ।
🌺वसतीस्वामी कल्पद्रुमीं । प्रबलाश्रय तो अखिलांचा ॥पाहे॥८॥
🌺सुरेंद्रादि निर्जर प्रीती । ऋषि योगी मुनिजन तप तपती ।
🌺श्रीप्रभु देती चतुर्विध मुक्‍ती । आरती करितां गुरुभक्त ॥पाहें॥९॥

🚩 *|| अवधुतचिंतन श्री गुरुदेवदत्त ||*🚩

शेती नांगर कविता

वावर

लय वरसांनंतर नांगर धरला हातामंदी
येक येक थेंब घामाचा पडला वावरामंदी

काळी आई भेगाळून विचारते कशी,
लेकरा, किती दिसांपास्न आहेस तू उपाशी?

आईचे हे ऐकून बोल मन माझं ओशाळलं
बांधाबांधावर जाऊन आठवणींमध्ये रमलं

तापलेल्या ढेकळांमंदी दुडुदुडु धावलं
आणि रापलेल्या तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं

सिमेंटच्या जंगलात आणि माणसांच्या गर्दीत
हरवलेला मी जगत होतो आपल्याच धुंदीत

शेतातल्या झोपडीची आणि भोळ्याभाबड्यांची
जागा घेऊ शकत नाही गर्दी सिमेंटच्या जंगलाची

शेतीमध्ये रमलेल्या मनाला सांगावं लागलं
उद्या आपल्याला परतीच्या प्रवासाला निघावं लागंल
उद्या आपल्याला परतीच्या प्रवासाला निघावं लागंल

                                       (कवी : संजय चव्हाण)
                                         

शंभो शंकरा, करुणा करा

शंभो,शंकरा ,करुणा करा, जग जगवा,!!
अंधार हा लोपवा,द्यावा प्रकाश नवा !
चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा !!

सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो!
हे भवतारक दुःख निवारी शंभो !
समार्जिली अंगणे ,पान्हावली गोधने ,
आसावला आसंमंत अम्रुताने चिंबनाहवा ,हे शिवा !!

सांबसदाशिव,हे त्रिपुरारी शंभो,हे भवतारक ,
दुःख निवारी शंभो,तु आपदा वारणारा !
तु दुःखिता तारणारा,हे क्रपावंत विश्वातले आर्त अभयांकरा,
शांतवा शंभो,
सांब सदाशिव त्रिपुरारी शंभो,
हे भव तारक दुःख निवारी शंभो !!...............

आरोग्य म्हणी

*आरोग्य म्हणी*

१. खाल दर रोज गाजर-मुळे,
तर होतील सुंदर तुमचे डोळे... 🥕

२. सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त... 🥒

३. डाळी भाजीचे करावे सूप,
अखंड राहील सुंदर रूप.... 🍵

४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,
आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.... 🥒

५. जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटातील वाजंत्री... 🍈

६. पपई लागते गोड गोड,
पचनशक्तीला नाही तोड..... 🥑

७.पालेभाज्या घ्या मुखी;
आरोग्य ठेवा सदा सुखी..... 🌿

८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
आरोग्य धोक्यात आणू नका.... 🧀

९. दररोज एक फळ खावू या;
आरोगयाचे संवर्धन करु या.... 🍎

१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;
थांबवेल आरोग्याचा ह्रास.... 🍏

११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;
आहारात  यांचे  महत्व फार... 🥗

१२. हिरवा भाजीपाला खावा रोज;
राहील निरोगी आरोग्याची मौज...🥒

१३. जेवणा नंतर केळी खा;
पाचनशक्तीला वाव द्या....  🍌

१४. साखर व तूप (बाजारचे )यांचे अति सेवन करु नका,
मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.... 🍣

१५. खावी रोज रसरशीत फळे;
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.... 🍑

१६. गालावर खेळते सदा हास्य,
फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य...🥝

१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त,
डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त...🥕🥑

१८. सुखा मेवा ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.. .🍱

१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका... 🍲

२०. जो घईल सकस आहार,
दूर पळतील सारे आजार.... 🍋

२१. भाजीपाल्याचं एकच महत्व,
स्वस्तात मिळेल भरपूर सत्व....🍓

२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,
तिचा पाला तिच अंग, सत्व आहे तिच्या संग....🎋

२३. कळणा कोंडा खावी नाचणी,
मजबूत हाडे कांबी वाणी ..
◆________________________◆
🌞...  सदा सतेज  ...🌤
आरोग्यदायी शुभ दिन ...❣

🌻   💦  🌈  🍃😊😊

धाव धाव रे हनुमंता

जय श्रीराम जय हनुमान l

धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता

जानकीच्या विरहाने रामराय दु:खी झाले.
आश्वासन देऊनिया तुवा तया तोषविला.
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता

लंकेमाजी सीतामायी उपवासे कृश झाली
रामध्यानी मग्न झाली तुवा तिला आश्वासिले
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता

लक्षुमणाशी मुर्च्छा आली, राममुख शुष्क झाले
संजीवनी देओनिया लक्ष्मणा उठविले
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता

अल्प शक्ती मंद बुद्धी आपला मी आहे भक्त
शक्ती बुद्धी देओनिया दासाला ह्या उद्धरावं
धाव धाव रे हनुमंता किती अंत पाहशी धाव रे हनुमंता