Monday, 15 January 2018

चौदा विद्या आणि चौंसष्ठ कला

🌹 *चौदा विद्या आणि चौसष्ठ कला* 🌹

१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.
४ वेद + ६ वेदांगे + न्याय + मीमांसा + पुराणे + धर्मशास्त्र.... अश्या एकूण चौदा
*वेद :*
१. ऋग्वेद
२. यजुर्वेद
३. सामवेद
४. अथर्ववेद
*सहा वेदांगे*
१. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.
१. न्याय,
२. मीमांसा,
3. पुराणे
४. धर्मशास्त्र.

🚩 *चौसष्ट कला* 🚩

१. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.

*अशोककाका कुलकर्णी*

Friday, 12 January 2018

तीळ खाण्याचे फायदे

*इन्फोबझ्झ । आरोग्य*

*‘हे’ आहेत तीळाचे फायदे,थंडीमध्ये खाल्ल्यास फायदेशीर*

_जानेवारी महिना आला की सगळेच तिळगूळ आणि गुळाच्या पोळीसाठी संक्रांतीची वाट पाहतात. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला आणि त्यातील आहाराला शास्त्रीय महत्त्व आहे. थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे हे आपल्यातील अनेकांना माहित असेल. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात._

▪️ अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास थंडीचा त्रास कमी होऊन शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.

▪️ त्याचप्रमाणे त्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त असतात. तीळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.

▪️ ज्यांची त्वचा एरवीही कोरडी पडते त्यांनी एरवीही थोडे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

▪️ तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.

*📣📣जॉईन करा इन्फोबझ्झ आणि मिळवा बातम्या, राशिभविष्य, जॉब अपडेट, मनोरंजन, लाईफस्टाईल टिप्स आणि बरच काही अगदी मोफत तुमच्या व्हाट्सअँपवर*   http://bit.ly/2rcUxZq

▪️ याबरोबरच आपण भाजीला दाण्याचा कूट घालतो त्याऐवजी थंडीमध्ये तीळाच्या कूटाचा वापर केल्यास तोही फायदेशीर ठरतो. यामुळे भाजीला एक वेगळी चव येते.

▪️ थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो.

▪️ ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.

▪️ दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.

*📣नागपूर मेट्रोमध्ये विविध पदांची भरती, इंजिनिअर् तरुणांना संधी*  http://bit.ly/2CYbvV1

Saturday, 6 January 2018

मारुती वशीकरण स्तोत्र

मारुतिस्तोत्रम्
श्रीगणेशाय नम: ॥
ॐ नमो भगवते विचित्रवीरहनुमते प्रलयकालानलप्रभाप्रज्वलनाय ।
प्रतापवज्रदेहाय । अंजनीगर्भसंभूताय ।
प्रकटविक्रमवीरदैत्यदानवयक्षरक्षोगणग्रहबंधनाय ।
भूतग्रहबंधनाय । प्रेतग्रहबंधनाय । पिशाचग्रहबंधनाय ।
शाकिनीडाकिनीग्रहबंधनाय । काकिनीकामिनीग्रहबंधनाय ।
ब्रह्मग्रहबंधनाय । ब्रह्मराक्षसग्रहबंधनाय । चोरग्रहबंधनाय ।
मारीग्रहबंधनाय । एहि एहि । आगच्छ आगच्छ । आवेशय आवेशय ।
मम हृदये प्रवेशय प्रवेशय । स्फुर स्फुर । प्रस्फुर प्रस्फुर । सत्यं कथय ।
व्याघ्रमुखबंधन सर्पमुखबंधन राजमुखबंधन नारीमुखबंधन सभामुखबंधन
शत्रुमुखबंधन सर्वमुखबंधन लंकाप्रासादभंजन । अमुकं मे वशमानय ।
क्लीं क्लीं क्लीं ह्रुीं श्रीं श्रीं राजानं वशमानय ।
श्रीं हृीं क्लीं स्त्रिय आकर्षय आकर्षय शत्रुन्मर्दय मर्दय मारय मारय
चूर्णय चूर्णय खे खे
श्रीरामचंद्राज्ञया मम कार्यसिद्धिं कुरु कुरु
ॐ हृां हृीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः फट् स्वाहा
विचित्रवीर हनुमत् मम सर्वशत्रून् भस्मीकुरु कुरु ।
हन हन हुं फट् स्वाहा ॥
एकादशशतवारं जपित्वा सर्वशत्रून् वशमानयति नान्यथा इति ॥
इति श्रीमारुतिस्तोत्रं संपूर्णम् ॥

Friday, 5 January 2018

गणेश स्तुति

🌹आज संकष्ट चतुर्थी🌹

🚩सर्व भाविकांना संकष्ट चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा.🚩

प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ॥
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

(श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, प्रभादेवी - मुंबई)

Thursday, 4 January 2018

गणपती बाप्पा मोरया

आज संकष्टी चतुर्थी...!!

॥ श्री गणेशाय नमः॥
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

विघ्नहर्ता गणपतीच्या नमनाने सर्व संकटे दूर होतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा-अर्चा केल्यास इच्छित फलप्राप्ती होते.

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व :
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती आणि चंद्राची पूजा केली जाते. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील संकटे दूर होतात. गणपतीच्या आशिर्वादाने संतानसंबंधित सर्व समस्या दूर होतात.

गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ॥
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ॥
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ॥
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ॥
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥
 
॥श्री गणेशाची आरती॥

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नांची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

॥ मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया ॥

करा या स्त्रोताचे पठण:

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु: कामार्थसिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्।
तृतीयं कृष्णापिंङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥३॥

नवमं भालचंद्र च दशमं तु विनायकम्।
एकादशं गणपङ्क्षत द्वादशं तु गजानम् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य:समर्पयेत्।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

संकष्टी चतुर्थी व्रतास ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी (आज पासून ) श्रावण कृष्ण चतुर्थीपासून सुरुवात करावी असे सांगितले आहे. हे व्रत २१ वर्षांचे आहे.२१ वर्ष न जमल्यास १ वर्ष तरी हे व्रत करावे. १ वर्ष सुद्धा  न जमल्यास..

"अशक्तौ प्रतिवर्षं श्रावण कृष्णचतुर्थ्यामेव कार्यम् ।"

श्रावण कृष्ण चतुर्थी ला तरी हे व्रत करावे. कुठल्याही व्रताची सांगता शास्त्राप्रमाणे उद्यापन करावे लागते. ( व्रताला हवन सांगितले आहे , यज्ञ ही आपली संस्कृती आहे, होम हवन केले नाही तर देवतांना अन्न मिळत नाही )म्हणून कुठलेही व्रत सुरू करण्याचे पूर्वी जाणकार आणि योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

॥ मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया ॥

अक्कलकोटचा मी स्वामी समर्थ

" श्री स्वामी समर्थ "⚘👏
श्री स्वामी समर्थ महाराजांनी सद्भक्तांना दिलेले 11 वचने.

अक्कलकोटचा मी स्वामी समर्थ ।
गुरूदेव दत्त तो ही मीच ॥१॥

वटवृक्ष तळी नित्य माझा वास ।
ठेविता विश्वास मी भेटेन ॥२॥

तुमचे नी माझे जुने खूप नाते ।
म्हणूनिया येथें आला तुम्ही ॥३॥

"ज्याचे मुखी मंत्र “श्री स्वामी समर्थ"
धरितो मी हात त्याचा नित्य ॥४॥

माझे हाती आहे ब्रम्हांडाची गोटी ।
सकल ही सृष्टी माझे रूप ॥५॥

कांही न मागता देतो सर्व कांही ।
श्रीमंती अशी ही माझी न्यारी ॥६॥

माझे नाम घेता दारीद्र सरते ।
दुःख ही पळते दाही दिशा ॥७॥

खोटे नाटे मज खपणार नाही ।
माझी दृष्टी पाही सर्व कांही ॥८॥

जरी तुम्ही दूर समुंदर पार ।
होईन मी घार रक्षिण्यास ॥९॥

भिऊ नका तुम्ही मी तुमच्या पाठी ।
माझी कृपादृष्टी तुम्हांवरी ॥१०॥

*स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर ।
मग मी आतुर तेथें येण्या ॥११॥

॥ राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.! "
हम गया नहीं, जिंदा है.!!
निश्चिन्त जा, मी आहे.!!!

स्वामी ॐ माऊली ⚘👏

बाप का बापडा ?

जरुर वाचा....

*बाप का बापडा ?*

स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते.आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी असो की ठसनी !

जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते,
त्यांच्या भावना समजून घेते,
त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते,
जे पाहीजे ते मुलांना खायला देते,
नवऱ्याच्या माघारी चोरून मूलांना पैसे पुरविते ,
साहजिकच मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत, व जन्मापासून तिच्या सहवासात असतात.

*बऱ्याच परीवारात मुलं तरुण झाले, की बापाशी बोलत नाहीत.*
त्यांना जे मागायचं ते आईमार्फत वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळे पणाने बोलतात,
तीला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात.
काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण *जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात.*

मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चूका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात.

आईचं मुलावर नितांत प्रेम असावं पण ते आंधळं प्रेम असू नये .
की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य बर्बाद होतं.

मुलं विस वर्षाची झाली की, आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा! आणि ते साहजिक आहे पण या कौतुकासमवेत त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात.
ते काही बोलले तर मधेच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात.
मग मुलावर बापाचा वचक राहत नाही .
*मुलांना आई चांगली वाटते अन् बाप वैरी वाटायला लागतो.*

वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो .
मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली,नीतीवान ,शीलवान ,
बलवान बनावे .
चांगल्या लोकांमधे उठावे बसावे ,
सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा ,
अशा कितीतरी मानवी जिवन जगण्याच्या गोष्टी त्यांनी अचूकपणे कराव्या ,
यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो,
मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक  हेतू असतो,

मुलाच्या हातून काही चूकीचं घडू नये असं बापाला वाटते म्हणून तो आपल्या मुलांचे फालतू लाड करीत नाही.

पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही .
*बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत*
अशा परीस्थीतीत माणूस खिन्न होतो ,
त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही .
*ती असं कधीच म्हणणार नाही की, "बाऴा,तुझे वडिल तुला तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागावतात.ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, तुझ्या भल्यासाठीच सगळं  करतात.*
*ते तुला बोलतात पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं तर होत नाही ना ?"*

*याउलट ,अनेक आई म्हणतात*
*(मुलांच्या समोरच )*
*" बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला ,*
*घरात आले की सुरु होता, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्याचे मित्र बनायला पाहीजे तुम्ही,.....*
*पण नाही... लेकरांत जिवच नाही ना तुमचा !*
*कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्याच्याशी...*
*अशाप्रकारे ,आई नवऱ्याचा मुलांसमोर पाणउतारा करते.*
*आणि*
*मीच तुला समजून घेते, मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्वकाही करते, असा मातृत्वाच्या प्रेमाचा व श्रेष्ठत्वाचा आव आणते.*

*साहजिकच असे सतत हँमरिंग होऊन मुलं बापापासून दूर जातात.*

*म्हणून वेळेचं भान ठेवा.*

*मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे पण त्यांना घडवतांना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा.*

*कायम लक्षात ठेवा...*
*लहानपणी बापाचा हात धरला,*

*तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही*

*बाप हाच बापमाणुस असतो... त्याला बापडा बनवु नका*
....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.....