Saturday, 3 March 2018

आजार बरे करण्यास आयुर्वेदिक उपाय

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.
2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.
3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.
4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.
5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.
6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.
8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.
9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.
10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.
काही आजार नसला तरी
अनुलोमीलम 15 मी
कपालभाती 15 मी
सुर्यनमस्कार 12 आर्वतन
रोज करा

आरोग्य संवाद
स्वतः साठी एवढं तरी करा

१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.
२) भरपूर टाळ्या वाजवा.
३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.
४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )
५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.
६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )
७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.
८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.
९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.
१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.
११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा.
१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.
१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.
१४) चौरस आहार घ्या.
१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.
१६) Black Tea च प्या.
१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.
१८) ध्यानधारणा करा.
१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.
२०) सत्य बोला. समाजसेवा करा.
२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला.
२२) *नैसर्गिक जीवन जगा.*
२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.
२४) पोट साफ ठेवणे.
२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.

आरोग्य संदेश

सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट,
हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

उपाय

कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
कंबर दुखी

उपाय

१) जायफळ पाण्यात उगळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी लावा.
२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.
३) गरम पाण्याने शेक द्या.
४) हलका मसाज करा.
५) बर्फाने शेकवा.
६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.
७) नियमित प्राणायाम करा.
८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.
९) विश्रांति घ्या.
१०) दोन्ही तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर करा.
११) पोट साफ राहू द्या.
१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.
१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातून व संध्याकाळी कोमट दुधातून १ / १ चमचा मेथी दाणे घ्या.

आरोग्य संदेश

व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,
माझ्या सल्याने थांबेल कंबर दुखी.
मान दुखी - - - - -

कारणे -----

जास्त थंडीमुळे, झोपेत अवघडणे, लचकणे, झटकन वळणे, डोक्यावर जास्त ओझे घेणे, स्नायुंना त्रास होणे, इ.

उपाय -----

१) शेक द्या. ( गरम पाणी / वाळू )
२) हळद + चंदन लेप द्या.
३) लसूण रस + कापूर मिक्स करून लावा. जास्तच आग झाल्यास पाण्याने साफ करून खोबरेल तेल लावा.
४) कोमटच पाणी प्या.
५) सुंठ उगाळून लेप द्या.
६) प्रथम तेल लावा. नंतर भरपूर श्वास नाकाने घेऊन रोखून धरा. मानेचे व्यायाम सावकाश करा. किंवा हाताने हलकेसे माँलिश करा.
७) असे १० / १५ वेळा रिकाम्या पोटी सकाळी व संध्याकाळी करा. नक्कीच गुण येतो.
८) अँक्युप्रेशर करा म्हणजेच हातपाय घासा व प्रेस करा.
९) वरील योग्य तेच उपाय करा.

आरोग्य संदेश

निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.
गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.
|| ध्यान (Meditation) ||*

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

ध्यानाचे फायदे

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !

ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.

वाईट सवयी नष्ट होतात

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.

मन आनंदी होत

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

कार्यक्षमता वाढते

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

दर्जेदार नातेसंबंध

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.

विचारशक्ती वाढते

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

ध्यान का करावे?

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

लिंबाचे

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम

स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल

🙏🙏आरोग्य फाऊंडेशन, पुणे 🙏🙏

ब्लड प्रेशर आणि नियंत्रण

#  ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण
==================
ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.

▫लसूण -
ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.

▫शेवगा -
यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.

▫जवस -
जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

▫विलायची -
एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शरीराला अँटीऑक्सीडेंट मिळतात तसेच रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

▫आवळा -
दररोज आवळ्याचे सेवन केल्यास ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' असते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि कॉलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.

▫दालचिनी -
दालचिनीच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर दालचिनी आपला रक्तप्रवाह नियमित ठेवते.

▫मुळा -
ही एक साधारण भाजी आहे. मुळा खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. मुळ्याची भाजी करून किंवा कच्चा खाल्ल्यास शरीराला मिनरल्स आणि योग्य प्रमाणात पोटॅशियम मिळते.

▫कांदा -
कांद्याच्या नियमित सेवनाने कॉलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. यामध्ये क्योरसेटिन नावाचे तत्व असते, जे हृदयाच्या आजारांपासून आपले रक्षण करते.

▪▫▪▫▪▫▪▫▪

नवग्रह स्तोत्र आणि मराठी अर्थ

💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐
💐
*II नवग्रह स्तोत्र II*
🏵️
*अथ नवग्रह स्तोत्र*
🏵️
*IIश्री गणेशाय नमः II*
🏵️
*जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदद्युतिम् I तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् II १*

*IIदधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम् I नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम् II २*

*IIधरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् I कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् II ३*

*IIप्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम् I सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् II ४ II*

*देवानांच ऋषीनांच गुरुं कांचन सन्निभम् I बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् II ५ II*

*हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् I सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् II ६ II*

*नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् I छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् II ७ II*

*अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् I सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् II ८*

*IIपलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम् I रौद्रंरौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् II ९ II*

*इति, श्रीव्यासमुखोग्दीतम् यः पठेत् सुसमाहितः I दिवा वा यदि वा रात्रौ विघ्न शांतिर्भविष्यति II १० II*

*नरनारी नृपाणांच भवेत् दुःस्वप्ननाशनम् I ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् II ११*

*IIग्रहनक्षत्रजाः पीडास्तस्कराग्निसमुभ्दवाः I ता सर्वाःप्रशमं यान्ति व्यासोब्रुते न संशयः II १२ II*

*II इति श्रीव्यास विरचितम् आदित्यादी नवग्रह स्तोत्रं संपूर्णं I*
💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐
💐 *🌾🌾* 🌾* *🌾🌾*⚡️🥀🥀🥀⚡️🥀🥀🥀⚡️🥀🥀🥀⚡️🥀🥀🥀⚡️
❇️ *नवग्रह स्तोत्र मराठी अर्थः*❇️
🏵️
*१) जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.*
🏵️
*२) दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणार्या, क्षिरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणार्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला)मी नमस्कार करतो.*
🏵️
*३) धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.*
🏵️
*४) अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान,बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.*
🏵️
*५) देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अतिबुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कारकरतो.*
🏵️
*६) हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.*
🏵️
*७) निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.*
🏵️
*८) अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.*
🏵️
*९) पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.*
🏵️
*१०) याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.*
🏵️
*११) नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.*
🏵️
*१२) ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.*
🏵️
*अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.नवग्रह स्तोत्र नवग्रह स्तोत्र हे व्यास ऋषींनी रचलेले आहे.*
🏵️
*हे स्तोत्रम्हणजे नऊ ग्रहांचे नऊ मंत्रच आहेत. आपल्या आयुष्यावर नवग्रहांचा परिणाम होत असतो, असे ज्योतिषशास्त्र म्हणते.*
🏵️
*नवग्रहांचा आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा होऊन हे नवग्रह आपल्याला अनुकूल व्हावेत म्हणून या नवग्रह स्तोत्राचा एक पाठ रोज*
🏵️
*श्रद्धेने, भक्तिभावाने व मनापासून करावा. त्यामुळे आपली संकटे, अडचणी नाहीश्या होतात व वाईट स्वप्नेही पडत नाहीत.*
🏵️
*उत्तम व निरोगी आयुष्याचालाभ होतो. आपण धनवान व आयुष्यमान होतो.*
🏵️
💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐☄️☄️☄️💐
*Navagraha Stotra*

*This stotra is in Sanskrit and it is written by Shri Vyas Rushi.*

*This stotra consists of nine mantras of nine planets.*

*By reciting this stotra all troubles, difficulties get vanished from ourlife.*

*There are no bad dreams, all type of sorrow are also removed from our life.*

*Wereceive abundant pleasures, wealth and become prosperous and have a sound,*

*good health.We have to recite this stotra daily with faith, devotion and concentration.*
⚡️🥀🥀🥀⚡️🥀🥀🥀⚡️🥀🥀🥀⚡️🥀🥀🥀⚡️
*Thought for the Day*
💎
*One of the essential things in developing Listening Skill is to know when to keep our ears.*
💎
*
*Success depends upon our thinking o🥀⚡️🥀🥀🥀⚡️

Friday, 2 March 2018

रामरक्षा मराठी अनुवाद

!! #रामरक्षा #मराठी #पद्यानुवाद !!

रामरक्षा स्तोत्र रची ऋषी श्री बुधकौशिक
देवता या मंत्राची शोभे श्रीसीताराम
शक्तीस्थानी देवी सीता छंद याचा अनुष्टुभ
हनुमंत कीलक मात्री करीता याचे पठण
भक्ती मनी ठेवून हात दोन्ही जोडून
रामरक्षा स्तोत्र मंत्र ऐकता राम प्रसन्न
धरुनी शर धनुष्य दीर्घ हस्ती सुरम्य
नेसूनी पीतांबर पद्मासनी सुहास्य
सीताशशीमुखावर कमलदलासमान
नेत्र विशाल लावून बैसला दयाघन
डाव्या मांडी जानकी साजश्रृंगार करून
पाहते टक लावून डोळां पाणी आणून
प्रगट जे रामवदन जटामंडलातून
ठसो मनी आपुल्या हे श्रीसीतारामध्यान
कोटी कोटी कडव्यांची कहाणी मोठी रामाची
एकेक अक्षरही तिचे नशि पापांच्या राशी
स्मरा कमलनयन जटामुकुटधारी
कमलनीलकांती रामलक्ष्मणजानकी
खांदी धनु भाता पाठी विश्व
रक्षिण्यासाठी
खड्ग सज्ज सदा हाती राक्षसवधासाठी
भूवनी प्रगटे प्रभू जन्मही न घेताची
लीला ही वाखाणावी सूज्ञाने राम भजूनी
रामरक्षा स्तोत्र हे वा पापविनाशी जपूनी
होतील सफल साऱ्या इच्छा ज्या असती मनी
एकेक मम अंगाचे करो श्रीराम रक्षण
राखो शिर राघव भाळ दशरथनंदन
कर्ण विश्वामित्रप्रिय कौसल्यापुत्र नयन
नासिका वेदित्राता मुख सौमित्रवत्सल
राखो जिव्हा विद्यानिधी कंठ भरतवंदित
खांदे दिव्यायुधे राखो भुजा कार्मुकभंजक
सीतापती हस्तद्वय परशुरामेश हृदय
धड राखो खरहंत नाभी जांबवनेश्वर
मांड्या मारुतीस्वामी राखो सुग्रीवेश कंबर
पोटऱ्या रघूत्तम राक्षसकुलविनाशक
राखो गुडघे सेतुकारी जांघा रावणमारक
चरण बिभिषणेश सकल काया श्रीराम
जपता हा सुमंत्र रामबले होई रक्षण
लाभे सुख दीर्घायू संतती विजय विनय
पाताळी भूतळी व्योमी फिरती चर दुश्चर
दृष्टीसही त्यांच्या न पडे रामनामे जो रक्षित
घेता राम रामभद्र रामचंद्र हे श्रीनाम
टळे पाप मिळे सुख होई प्राप्त मोक्षपद
विश्वजीत रामनामे कंठी मंत्रित ताईत
बांधता लाभे सुरक्षा होती सर्व सिद्धी प्राप्त
वज्रपंजर नावाचे म्हणता हे रामकवच
मीळे मान सतत नित्य होई जय मंगल
कथिली रामरक्षा ही जशी स्वप्नी शिवहरे
लिहिली अचूक तशीच महर्षी बुधकौशिके
अलौकिक त्रिभवनी माझा प्रभू मनोहारी
राम जणू कल्पतरू हरी हरेक आपत्ती
तरुण सुस्वरूप शक्तिशाली सुकुमार
विशाल कमलनेत्र श्याम वल्कलधारीत
शाकाहारी ब्रह्मचारी तपस्वी नि जितेंद्रिय
दश रथ पुत्र दोघे बंधू आदर्श उभय
धनुर्धारी श्रेष्टतम जीवरक्षी रघूत्तम
राक्षसकुलविनाशी करो आमुचे रक्षण
मार्गी आमुच्या पुढे चालो सदा रामलक्ष्मण
भाता पाठी अक्षय हाती सज्ज चापबाण
खड्गत्राणधनुर्धारी जणू मनीचे इप्सित
करो रक्षण आमुचे राम हा लक्ष्मणासह
शूरवीर रघुश्रेष्ट प्रबळ पूर्ण पुरूष
ऐश्वर्यवान वेदज्ञ कौसल्यासुत यज्ञेश
दाशरथी लक्ष्मणेश आनंददायक राम
काकुस्थ परब्रह्म सीतावर पुरुषोत्तम
नामे ही जपता नित्य भक्ते श्रद्धा बाळगून
लाभे पुण्य निश्चित अधिक अश्वमेधाहून
दुर्वादलश्यामवर्णी राम पीतांबरधारी
दिव्यनामे स्तुती करिता त्याची नरा मिळे मुक्ती
लक्ष्मणाग्रज पद्माक्ष राम जनानंददायी
दशरथपुत्र सुंदर श्यामल नि शान्तमूर्ती
ककुस्थवंशी धार्मिक सत्यप्रिय सीतापती
राजेंद्र करुणार्णव विप्रप्रिय गुणनिधी
नमा रघुकुलश्रेष्ट राघव जो रावणारी
रामभद्र रामचंद्र सीतावर वेधस वा
राम नाथ रघुनाथ म्हणा काही आणि नमा
श्रीराम राम रघुनंदन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम
श्रीराम राम रणी कठोर राम राम
श्रीराम राम करो रक्षण राम राम
मनाने स्मरण करितो रामचंद्रचरण
वाचेने वर्णन करितो रामचंद्रचरण
मस्तके वंदन करितो रामचंद्रचरण
शरणस्थान माझे रामचंद्रचरण
माता माझी आहे राम पिताही माझा राम
राम स्वामी आहे माझा सखाही आहे राम
माझे असे जे सर्व ते एक दयाळू राम
बाकी काही न मी जाणे जाणे केवळ राम
उजवीकडे लक्ष्मण सीता डाव्या बाजूस
मारुती पुढे ज्याच्या नमस्कार त्या रामास
जनानंददायी रणधुरंधर
कमलनयन रघुकुलवर
दया मूर्तिमंत करुणासागर
तया रामचंद्रा माझा नमस्कार
झंझावाती मनासम वेगवान
जितेंद्रिय वायुतनय महान
वानरप्रमुख अती बुद्धिमान
श्रीरामदूत हनुमंता मी शरण
काव्यशाखेवर कोकीळरूपे
मधुर गुंजन अक्षर रवे
करी वाल्मिकी राम राम असे
कवी ऋषीस त्या वंदन माझे
हरणकर्ता सर्व संकटांचा
वर्षावकर्ता सुखसंपदेचा
आनंद दाता सकल जनांचा
नमस्कार शत त्या श्रीरामाला
दग्ध करण्या भवबीज अवघे
उपभोग सुख नि भोगण्या मोठे
भयभीत होण्या यमदूत तगडे
गरजा रामनाम उच्च रवाने
विजयी सदा राम राजाधिराज
रामा रमेशा मना माझ्या भज
भितो निशाचर असुरसमाज
ज्याला त्या रामाचे मी पदरज
थोर रामाहुनी नसे कोणी रामाचाची दास मी
जडो चित्त तुझ्या ठायी रामा उद्धार माझा करी
उमे सुमुखे ऐक महाजप मम हा राम राम
विष्णू सहस्त्र नामासम महामंत्र रामनाम
असे हे बुधकौशिक विरचित श्रीरामरक्षा स्तोत्र समाप्त
रामकृपेने नारायणाने जे केले मराठीत अनुवादित

!! #श्री_रामचंद्रार्पणमस्तु !!

जर कुणाला आध्यात्मिक ऑनलाईन माहिति किंवा डॉक्युमेंट हवे असल्या मला whats app वर msg करु शकता किंवा फ़ेसबुक वरील पोस्ट वेट्स app वर हवे असल्यास कॉंटेक्ट मी नाव :-प्रणव शशिकंत कुलकर्णी whats app no 8605582623

#अनंतकोटी_ब्रम्हांडनायक

केशरी गंध शोभे माझ्या स्वामीरायाला

🙏!! श्री स्वामी समर्थ!!🙏
   
केशरी गंध शोभे माझ्या स्वामीरायाला,
    रुप पाहता सद्गुरुंचे आनंद होई मनाला...
          मिटुन जाती चिंता दु:ख नुरे औषधाला,
धावुन येई योगीराज तो भक्तांच्या हाकेला...
       योगक्षेमही तोच चालवी सावरे क्षणाक्षणाला,
हळुच अर्थ येई आपुल्या जीवनाला...
      त्यांच्या कृपाशिर्वादानेच हा भक्तीनाद भरला,
दाही दिशांतुन चैतन्याचा सुवास दरवळला...
     असाच नित्य लाभो गुरुकृपेचा पान्हा वासराला
गुरुराजाच्या प्रत्यक्ष भेटीसाठी जीव आतुर झाला....
गुरूराजाच्या प्रत्यक्ष भेटीसाठी जीव आतुर झाला .....